Bigg Boss OTT 3 मध्ये येणार ट्वीस्ट; शोमध्ये होणार पहीली वाइल्ड कार्ड एंट्री!
21 जून रोजी अनिल कपूर यांनी बिग बॉस ओटीटी सीझन 3 चा ग्रँड प्रीमियर एपिसोड होस्ट केला होता. आता या शोला पूर्ण 15 पेक्षा जास्त दिवस झाले आहेत. या 15 दिवसांत बिग बॉसच्या घरातून तीन स्पर्धक बाहेर पडले आहेत. सर्वप्रथम हरयाणाचा बॉक्सर नीरज गोयतला शोमधून बाहेर काढण्यात आलं, त्यानंतर पायल मलिक बाहेर पडली. नुकताच शोमध्ये नवीन ट्विस्ट आल्यानंतर टीव्ही अभिनेत्री पौलोमी दास देखील बिग बॉसमधून बाहेर पडली आहे. एकीकडे निर्माते एका आठवड्यात दोन स्पर्धकांना घराबाहेर काढत आहेत, तर दुसरीकडे वाइल्ड कार्ड स्पर्धकांना बिग बॉसच्या घरात पाठवण्याची तयारीही पूर्ण झाली आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ब्रिस्टी समद्दार या शोमध्ये सहभागी होणारी पहिली ‘वाइल्ड कार्ड एन्ट्री‘ ठरू शकते.(Brishti Samaddar in Big Boss Ott )
आपल्या बोल्ड व्हिडिओने इंटरनेटवर खळबळ माजवणारी ब्रिस्टी समद्दार सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. सध्या तिला इन्स्टाग्रामवर 9 लाख लोक त्याला फॉलो करतात. आपल्या सोशल मीडिया प्रोफाइलवर बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करणाऱ्या ब्रिस्टीला अनेकदा लोकांच्या ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. पण ब्रिस्टी नेहमीच आपल्या ट्रोलरकडे दुर्लक्ष करते. लव कटारिया आणि विशाल पांडे यांच्या ‘बिग बॉस ओटीटी’ ३ मध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा खुद्द कोलकात्यातील ब्रिस्टीने गुजरात ट्रिपदरम्यान केली आहे.
केवळ ब्रिस्टी समद्दारच नाही तर राखी सावंत आणि जोगिंदर यादव यांनीही बिग बॉस ओटीटीच्या या सीझनमध्ये प्रवेश करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. परंतु अद्याप जिओ सिनेमाकडून ब्रिस्टी समद्दारच्या या शोमध्ये एन्ट्रीबाबत किंवा राखी सावंत आणि जोगिंदर यादव यांच्याबद्दल कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही. अनेकदा अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएंसर स्वत:ला लाईमलाइटमध्ये राहण्यासाठी बिग बॉसमध्ये जाणार असल्याचे जाहीर करतात, पण या स्वयंनिर्मित अफवांमध्ये कितपत तथ्य आहे? हे जाणून घेण्यासाठी अधिकृत घोषणेची वाट पाहावी लागणार आहे.(Brishti Samaddar in Big Boss Ott)
=================================
=================================
बिग बॉस ओटीटी 3 बद्दल बोलायचे झाले तर या शोमध्ये सध्या कृतिका, अरमान मलिक, रणवीर शौरी, चंद्रिका गेरा, दीपिका चौरसिया, विशाल, मुनीषा, लव कटारिया, शिवानी कुमारी, सई केतनपासून सना मकबूल आणि सना सुलतानपर्यंत आहेत.