सूरज हुआ मद्धम चांद जलने लगा…
करण जोहर यांचा कभी खुशी कभी गम (kabhi khushi kabhie gham) हा २००१ साली प्रदर्शित झालेला एक मल्टीस्टार, बिग बजेट, मेगा सिनेमा होता. या चित्रपटाला तीन संगीतकारांनी संगीत दिले होते. जतीन ललित, संदेश शांडील्य आणि आदेश श्रीवास्तव यांनी. या चित्रपटातील सर्व गाणी समीर अंजान यांनी लिहिली होती फक्त एक गाणे सोडून! का? कारण हे गाणं या चित्रपटासाठी लिहिलंच गेलं नव्हतं. कोणतं होतं हे गाणं? काय होते ही स्टोरी?
करण जोहर जेव्हा या मास्टरपीस चित्रपटाला दिग्दर्शित करत होते तेव्हा सर्व गोष्टी लार्ज स्केलवर बनत होत्या. त्यामुळे चित्रपटाला संगीत देताना देखील त्यांनी तीन तीन संगीतकार निवडले होते. या चित्रपटात एक गाणं होतं जे शाहरुख खान आणि काजोल यांच्यावर चित्रित झालं होतं. सोनू निगम आणि अलका याज्ञिक यांनी गायलेले ह्या गाण्याचे बोल होत ‘सूरज हुआ मद्धम चांद जलने लगा…’ हे गाणं त्या काळात तुफान हिट झालं होतं.
प्रत्येकाने हे गाणं कधी ना कधी गुणगुणलं असणार इतकं हे रोमँटिक बनलं होतं. पण तुम्हाला माहिती आहे का? हे गाणं मुळात ह्या चित्रपटासाठी लिहिले गेले नव्हते. मग हे चित्रपटात आलं कसं आलं? याची कहाणी दोन वर्ष आधीची आहे. संगीतकार संदेश शांडील्य आणि गीतकार अनिल पांडे हे तेंव्हा मुंबईमध्ये स्ट्रगल करत होते. अनिल पांडे यांनी हिंदी साहित्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं होतं आणि मायानगरीत हातपाय मारण्यासाठी ते आले होते. संदेश शांडील्य आणि अनिल पांडे रोज रात्री गप्पा मारत आपली पुढची स्वप्न रंगवत असंत.
एकदा अनिल पांडे यांनी एक गाणं संदेश यांना ऐकवलं त्यांना ते खूप आवडलं. त्यांनी लगेच त्या गाण्याला चाल लावली. अनिल यांनी याचे पाच-सहा अंतरे करून दिले. नंतर दोघेही आपापल्या मार्गाने गेल्यानंतर त्या गाण्याला ते चक्क विसरून गेले होते. पण दरम्यानच्या काळात हे गाणं संदेश शांडिल्य यांनी करण जोहरला कधीतरी ऐकवलं होतं. ‘कभी खुशी कभी गम’ (kabhi khushi kabhie gham) या चित्रपटाचे चित्रिकरण चालू असताना करण जोहरला त्या गाण्याची आठवण झाली. त्यांनी संदेशला फोन करून हे गाणे या चित्रपटासाठी घेता येईल असे सांगितले.
पुन्हा अनिल पांडे यांचा शोध सुरू झाला. तिघांची मिटींग झाली गाण्यात सिनेमाच्या दृष्टीने हवे ते बदल करून घेण्यात आले आणि सोनू निगम व अलका याज्ञिक यांच्या स्वरात हे गाणं रेकॉर्ड झालं. या गाण्याचे चित्रीकरण देखील करण जोहर यांनी अफलातून केलं होतं. शाहरुख खान याचं स्वतःचं हे अत्यंत आवडीचं गाणं होतं. काजोल आणि शाहरुख खान यांची अनेक गाणी प्रेक्षकांना आज देखील दर्शकांना कायम आठवतात. त्यापैकीच हे एक गाणं होतं. गीतकार अनिल पांडे यांनी पुढे काही काळ पत्रकारिता केली. चित्रपटासाठी गाणी लिहिली पण त्यांच्या पहिल्याच गाण्याला जे यश मिळालं ते पुढे त्यांना फास्ट मिळालं नाही.
या चित्रपटात Geri Halliwell यांच्या It’s raining men हे गाणे वापरल्याबद्दल करण जोहर यांना इंग्लंडच्या न्यायालयाने समन्स पाठवून बोलावून घेतले होते. कारण हे गाणे या म्युझिक कंपनीच्या परवानगी शिवाय तसेच ‘कभी खुशी कभी गम’ (kabhi khushi kabhie gham) या चित्रपटात वापरले होते. या चित्रपटात करीना कपूर हिच्यावर या गाण्याच्या काही ओळी चित्रीत केल्या होत्या. करण जोहर यांना इंग्लंडच्या न्यायालयात उपस्थित राहून रीतसर माफी मागून दंड भरावा लागला होता!
=========
हे देखील वाचा : यांचं गाणं ऐकून लता मंगेशकर झाल्या भावुक…
========
या सिनेमातील अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांच्या भेटीचा प्रसंग हृदयस्पर्शी बघून हृतिक रोशन खूपच भावविवश झाला होता. इतका की तो त्याचे डायलॉग विसरत होता. करण जोहर आणि अमिताभ बच्चन यांनी त्याला समजावून घेतले आणि त्याचे त्या दिवसाचे शूट दुसऱ्या दिवशी पूर्ण केले! १४ डिसेंबर २००१ या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि सुपर डुपर हिट ठरला!