Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Wagh Aala Marathi Rap: कोल्हापुराचा यंग रॅपर ‘ए किंग’चा हटके

Sonalee kulkarni वर कोसळला दुःखाचा डोंगर; भावाच्या निधनाने अभिनेत्री भावूक,

Khote Sikkay : हॉलीवूड ‘करी वेस्टर्न’ टाईप सिनेमाचा भारतीय अवतार!

Virosh Wedding: व्हॉलीबॉल पूल पार्टी,जपानी खाद्यपदार्थांचा बेत अन् बरंच काही!

आई -मुलीच्या नात्याचा हळवा प्रवास उलगडणारा Tigheeचा ट्रेलर प्रदर्शित

Sai Tamhankar : “अमराठी कलाकारांच्या ग्लॅमरच्या नादात आपण आपल्याच मातीतील

Sanjay Leela Bhansali :वडील दारुच्या नशेत, साड्यांना फॉल लावून भागवला

Bigg Boss Marathi 6: चहावरून घरातलं वातावरण तापणार; अनुश्री आणि

“The Kerala Story 2 एक प्रोपोगंडा चित्रपटआ आहे”; अनुराग कश्यपने

Bigg Boss Marathi 6 : सदस्यांच्या डोळ्यात धूळ फेकत प्रभूने

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ३’ मध्ये सिद्धार्थ चांदेकर सूत्रसंचालकाच्या भूमिकेत !

 ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ३’ मध्ये सिद्धार्थ चांदेकर सूत्रसंचालकाच्या भूमिकेत !
Actor Siddharth Chandekar
टीव्ही वाले मिक्स मसाला

‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ३’ मध्ये सिद्धार्थ चांदेकर सूत्रसंचालकाच्या भूमिकेत !

by Team KalakrutiMedia 13/07/2024

मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादचं तिसरं पर्व १३ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले छोटे उस्ताद आपल्या सुरांनी संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणार आहेत. सुप्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ चांदेकर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे. पहिल्या पर्वातही सिद्धार्थने सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली होती. तिसऱ्या पर्वात पुन्हा एकदा ही जबाबदारी नव्याने पेलण्यासाठी सिद्धार्थ सज्ज आहे. सिद्धार्थचा हजरजबाबीपणा सर्वांनाच परिचित आहे. यंदाच्या पर्वात सिद्धार्थचा सिद्धांतही पाहायला मिळेल. जगातला असा कोणताच प्रॉब्लेम नाही ज्यावर सिद्धार्थचा सिद्धांत तोडगा देऊ शकत नाही. जेव्हा जेव्हा स्पर्धकांना स्पर्धेत काय करायचं? पुढे कसं जायचं? असे प्रश्न सतावतील तेव्हा सिद्धार्थचे सिद्धांत मदतीला धावतील.(Actor Siddharth Chandekar)

Actor Siddharth Chandekar
Actor Siddharth Chandekar

सिद्धार्थचे सिद्धांतं फक्त स्पर्धकांची अडचण सोडवण्यासाठीच नाही तर प्रेक्षकांना सुद्धा जीवनभराचं ज्ञान देऊन जातील. आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी तुम्ही या सिद्धांतांचा वापर करून तुमचं जगणं सोपं आणि समृद्ध करू शकता. त्यामुळे मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादच्या या तिसऱ्या पर्वात काय मिळणार? या प्रश्नावर सिद्धार्थचा सिद्धांत सांगतो…सुरेल गाणी, परीक्षकांची टिपण्णी, यासोबतच ऐकायला मिळणार सिद्धार्थची सिद्धांत वाणी.

Actor Siddharth Chandekar
Actor Siddharth Chandekar

मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद हा कार्यक्रम सिद्धार्थसाठी खुपच खास आहे. या कार्यक्रमाविषयी सांगताना सिद्धार्थ म्हणाला, ‘पहिलं पर्व जेव्हा मी केलं तेव्हा सगळ्या छोटया उस्तादांच्या आणि परिक्षकांच्या मी प्रेमात पडलो. परिक्षक ज्याप्रकारे काळजीने त्या लहान मुलांशी बोलतात, चांगल्या गोष्टी समजावून सांगतात तेव्हा खरंच असं वाटतं की हे फक्त टीव्ही शोजचे जज नाही तर खरच गुरु आहेत. ज्यांचा अनुभव आणि ज्ञान खूप मोलाचं आहे. कार्यक्रमात कुठेही औपचारिकता नाही. आमचं छान कुटुंब तयार झालं आहे. या मंचावर संपूर्णपणे मराठी गाणी ऐकायला मिळतात. स्पर्धक मंचावर अशी गाणी सादर करतात जी त्यांच्या जन्माच्या कित्येक वर्ष आधी आली असतील. तरीसुद्धा त्यांच्या तोंडपाठ आहेत. ही जुनी नवी सगळी गाणी या लहान मुलांकडून जर का नव्या पीढीपर्यंत पोहोचणार असतील तर याहून चांगली गोष्ट नाही.”

==============================

हे देखील वाचा: ‘बाबू’च्या २५ फूट भव्य पोस्टरचे अनावरण करत टायटल सॉन्ग लाँच सोहळा दिमाखात संपन्न !

==============================

सिद्धार्थ म्हणाला पुढे असं ही म्हणाला की ,”सूत्रसंचालक म्हणून माझं काम हेच आहे की सगळ्या छोट्या उस्तादांचा मोठा भाऊ व्हायचं. सोबतीला माझे सिद्धांत पण असतीलच. जेव्हा जेव्हा टेन्शनचं वातवरण असेल तेव्हा माझे सिद्धांत येतील आणि माहोल हलकाफुलका करतील. गाण्यासोबतच खूप सारी धमाल या कार्यक्रमात अनुभवायला मिळणार आहे.” मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद पर्व तिसरे १३ जूलैपासून शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता स्टार प्रवाहवर पाहता येणार आहे. 

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Actor Siddharth Chandekar marathi singing show Mi Honar Superstar Chote Ustad Mi Honar Superstar Chote Ustad 3 singing show Star Pravah star Pravah serial
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.