मिलिंद गवळींनी ‘समृद्धी’ बंगल्यातून बाहेर पडताना आठवण म्हणून नेली ‘ही’
‘अल्याड पल्याड’ नंतर दिग्दर्शक प्रीतम एसके पाटील ‘अल्याड पल्याड २’ घेऊन येणार?
‘अल्याड पल्याड’ या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जोरदार घोडदौड चालू आहे. या चित्रपटाने आपली यशस्वी वाटचाल ५ व्या आठवड्यातही सुरुच ठेवली आहे. चित्रपटाचे यश साजरे करीत असताना आपल्याला पाठिंबा देणाऱ्या प्रसारमाध्यमांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘अल्याड पल्याड’ चित्रपटाच्या टीमने एका विशेष सोहळ्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी, तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रसारमाध्यमांनी केलेल्या अमूल्य सहकार्याची दखल घेत ‘अल्याड पल्याड’ टीमने उपस्थित माध्यम प्रतिनिधींचा भेटवस्तू देत सन्मान केला.या चित्रपटाच्या निमित्ताने मराठीत वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि त्यात प्रसारमाध्यमांनी सिंहाचा वाटा उचलला ही आमच्यासाठी आनंदाची बाब असल्याचे एस.एम.पी प्रोडक्शन्चे निर्माते शैलेश जैन आणि महेश निंबाळकर यांनी सांगितले.(Alyad Palyad Movie Success)
रहस्यमय गोष्टींचे सुप्त आकर्षण प्रत्येकाला असतेच. पोस्टरपासूनच उत्सुकता निर्माण करणाऱ्या ‘अल्याड पल्याड’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच संपन्न झाला. प्रदर्शित झालेल्या या ट्रेलर मधून जबरदस्त झलक दिसून येत आहे. अल्पावधीतच हा ट्रेलर ट्रेंडिंगला आला आहे. दुर्गम भागातल्या एका गावाची, तिथल्या माणसांची रहस्यमय कथा असलेला ‘अल्याड पल्याड’ हा थरारपट आहे. एका रहस्याची उकल करताना त्यांच्या भोवती वेगवेगळ्या धक्कादायक घटनांची मालिका सुरु होते. सरतेशेवटी एकदम ध्यानीमनी नसलेली गोष्ट समोर येते. या घटनेची उकल कशी होते ? सत्य काय आहे? उत्कंठा, शोध, यातून कोणतं ‘रहस्य’ उलगडणार? हे ‘अल्याड पल्याड’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आणले आहे.
या सोहळ्यात ‘रसिकांच्या प्रेमापोटी निर्माते शैलेश जैन, महेश निंबाळकर व दिग्दर्शक प्रीतम एसके पाटील आता ‘अल्याड पल्याड २’ आपल्या भेटीला घेऊन येणार आहोत. ‘अल्याड पल्याड’ चित्रपटाचा सिक्वेल ही रसिकांना मनोरंजनाचा नक्कीच आनंद देईल, ‘ असा विश्वास दिग्दर्शक प्रीतम एसके पाटील यांनी व्यक्त केला.
=================================
==================================
या चित्रपटाची निर्मिती शैलेश जैन आणि महेश निंबाळकर यांनी केली असून दिग्दर्शन प्रीतम एस के पाटील यांचे आहे. मकरंद देशपांडे, गौरव मोरे, संदीप पाठक, सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, चिन्मय उदगीरकर, भाग्यम जैन, अनुष्का पिंपुटकर आदि कलाकारांच्या भूमिका ‘अल्याड पल्याड’ चित्रपटात आहेत.