Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Vicky Kaushal-Katrina Kaif यांनी अखेर आपल्या लेकाचं नाव केलं रिव्हील,

स्टार प्रवाहच्या ‘तुझ्या सोबतीने’ मालिकेला सुरु होण्याआधीच ब्रेक; १२ ऐवजी

Bigg Boss Marathi 6 मध्ये होणार  राजकीय नेत्याची एन्ट्री? रितेश भाऊने दिली

सत्तरच्या दशकात Dev Anand यांनी एका राजकीय पक्षाची स्थापना केली

Dharmaveer 2 मधील शिवरायांची ‘ती’ फ्रेम खास का आहे?

४००० कोटींच्या Ramayanaची धुरा ‘या’ मराठी माणसावर!

गौरव अमुलची काळजी कशी घेणार?; लवकरच Single Papa 2 प्रेक्षकांच्या

Hollywood मधून मराठीत रिमेक झालेले ‘हे’ चित्रपट माहिती आहेत का?

अखेर Shashank Ketkar ने स्क्रिन शॉट्ससह शेअर केलं 5 लाख

Border 2: ‘घर कब आओगे…’ तब्बल 28 वर्षांनंतर प्रसिद्ध गाणं

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Bad Newz Box Office Collection: विकी कौशलच्या ‘बॅड न्यूज’ ने केली कमाल; 3 दिवसात केली इतकी कमाई

 Bad Newz Box Office Collection: विकी कौशलच्या ‘बॅड न्यूज’ ने केली कमाल; 3 दिवसात केली इतकी कमाई
Bad Newz Box Office Collection
बॉक्स ऑफिस

Bad Newz Box Office Collection: विकी कौशलच्या ‘बॅड न्यूज’ ने केली कमाल; 3 दिवसात केली इतकी कमाई

by Team KalakrutiMedia 22/07/2024

विकी कौशल स्टारर ‘बॅड न्यूज’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. 19 जुलै रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये दाखल होणारा हा चित्रपट चाहत्यांना आवडत आहे. त्यामुळेच अवघ्या तीन दिवसांत या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर तब्बल २० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आणि त्याचमुळे विकी कौशलच्या हिट लिस्टमध्ये या चित्रपटाचा समावेश होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या वीकेंडमध्ये ‘बॅड न्यूज’ या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या चित्रपटाने तीन दिवसांत ३०.६२ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटाने शुक्रवारी ८.६२ कोटी, शनिवारी १०.५५ कोटी आणि रविवारी ११.४५ कोटींचा गल्ला जमवला आहे . म्हणजेच या चित्रपटाने तीन दिवसांत एकूण तब्बल ३०.६२ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. चित्रपटाच्या या शानदार सुरुवातीमुळे निर्माते ही खूप खूश आहेत.(Bad Newz Box Office Collection)

Bad Newz Box Office Collection
Bad Newz Box Office Collection

‘बॅड न्यूज’ या चित्रपटाची कथा एका अनोख्या विषयावर आधारित आहे. या चित्रपटातील विकी कौशल आणि तृप्ती डिमरी यांची जोडी प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे. चित्रपटाचे संगीतही लोकांना आवडत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद तिवारी यांनी केले आहे. ‘गो गोवा गॉन’ या चित्रपटाचे अभिनेते आनंद तिवारी यांनी ‘बॅड न्यूज’ या चित्रपटाचीची निर्मिती केली आहे. या सिनेमाचे संपूर्ण  बजेट 80 कोटी होते. आणि आता पहिल्याच दिवशी ८.६२ कोटींची कमाई करणारा ‘बॅड न्यूज’ विकी कौशलच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा ओपनर ठरला आहे.

Bad Newz Box Office Collection
Bad Newz Box Office Collection


‘बॅड न्यूज‘ हा अक्षय कुमारच्या गुड न्यूज चित्रपटाचा स्पिरिच्युअल सिक्वेल आहे. गुड न्यूजचे लाइफटाइम कलेक्शन २०१.१४ कोटी रुपये होते आणि हा चित्रपट ही बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. आता विकी कौशल स्टारर ‘बॅड न्यूज‘ बॉक्स ऑफिसवर त्याच्या प्रीक्वेलप्रमाणे कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.(Bad Newz Box Office Collection)

=========================

हे देखील वाचा: Sarfira Box office Collection: अक्षय कुमारच्या ‘सरफिरा’ने पहिल्या दिवशी कमावले ‘एवढे’ कोटी

=========================

इतर चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर कल्की 2898 एडीने भारतात 616.7 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात १००० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. हिंदुस्थानी 2 ने भारतात 75.54 कोटी आणि जगभरात 132 कोटींची कमाई केली आहे. सरफिराचे भारतात कलेक्शन २१.२२ कोटी आणि वर्ल्डवाइडमध्ये २८.२ कोटींवर पोहोचले आहे. तर किलने भारतात 20.08 कोटी आणि जगभरात 41 कोटींचा गल्ला जमवला आहे. 

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor actress Bad Newz bollywood movie Bad Newz Box Office Collection Bad Newz movie Bad Newz movie trailer Bollywood bollywood update Celebrity Celebrity News Entertainment trupti dimari Vicky Kaushal
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.