अक्षयकुमार : जितका श्रेष्ठ अभिनेता तितकाच संवेदनशील माणूस!
ॲक्शन, इमोशन आणि कॉमेडी या तिन्ही प्रांतात जबरदस्त अभिनय करून रसिकांच्या दिलात राज करणारा कलाकार लंबी रेस का खिलाडी म्हणजे अक्षय कुमार(Akshay kumar). अलीकडच्या काही काळात त्याने देशभक्तीपर आणि सामाजिक प्रश्नांवरील चित्रपटांमुळे तो अगदी घराघरापर्यंत पोहोचला. अक्षय कुमार हा खऱ्या अर्थाने लंबी रेस का खिलाडी आहे कारण त्याचा पहिला चित्रपट ‘सौगंध’ १९९१ साली प्रदर्शित झाला होता आणि आज देखील तो प्रचंड मागणीत आहे. मध्यंतरी अक्षय कुमार यांच्या एका नोबल वर्कला जगभरातून खूप प्रशंसा मिळाली. आपल्या व्यावसायिक दुनियेत वावरताना सामाजिक भान सुद्धा ठेवायला हवं हे अक्षय कुमारकडून शिकले पाहिजे.
राजस्थानच्या जयपुरमधील भाटिया परिवारात मुदित नावाचा एक छोटा मुलगा होता. त्याला जन्मापासूनच मस्कुलर डिस्ट्रॉफी या आजाराचा तो शिकार होता. या जेनेटिकल आजाराने ती व्यक्ती फार तर अठरा वर्षे जगू शकते. आजच्या विज्ञानाच्या जमान्यात देखील या आजारावर अजून रामबाण उपाय सापडले नाही. मुदित भाटिया याच्या घरच्यांना त्याच्या मर्यादित आयुष्याची कल्पना होती पण धीराने ते परिस्थितीला सामोरे जात होते. घरचे मुदितच्या हरेक इच्छेला लगेच पूर्ण करत. कारण आपल्या मुलाचा मृत्यू त्यांना समोर दिसत होता.
एकदा मुदितने अक्षय कुमार (Akshay kumar) चित्रपट पाहिला आणि त्याने आपल्या पालकांकडे हट्ट केला की मला अक्षय कुमारला भेटायचे आहे. आता घरच्यांना मोठा पेच प्रसंग पडला. एवढ्या मोठ्या सेलिब्रिटीला कसे काय भेटायचे? पण मुलाची इच्छा. त्यांनी त्या पद्धतीने प्रयत्न सुरू केले. यातून त्यांना ‘मेक द विश’ या साईटचा पत्ता सापडला. त्यावर त्यांनी आपली सर्व स्टोरी सांगितली आणि मुलाची इच्छा देखील सांगितली आणि काय आश्चर्य! काही दिवसातच चक्रे हलली. ‘वेलकम’ या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी मुदितला तिथे बोलवण्यात आले.
आपल्या मनातील सुपर हिरोला पाहून तो प्रचंड खुश झाला. अक्षय कुमारला जेव्हा त्याच्या जीवघेण्या आजाराबद्दल कळाले त्यावेळी त्याला देखील त्याच्याबद्दल खूप प्रेम वाटायला लागले. नंतर ज्या ज्या वेळी तो दिल्ली किंवा राजस्थानला आला तो आवर्जून मुदितला भेटायला जयपुरला जाऊ लागला. मुदितचा एक वाढदिवस त्याने मुंबईला बोलवून केला. मुंबईत आल्यानंतर त्याच्या सर्व कुटुंबाचा सर्व खर्च अक्षय कुमारने केला. त्याचा वाढदिवस त्याने त्याच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये साजरा केला. या काळात अक्षय कुमार (Akshay kumar) आणि मुदित यांची चांगली मैत्री झाली.
अक्षयच्या प्रत्येक चित्रपटाच्या प्रमोशनला तो हजर राहू लागला आणि सिनेमातील अक्षय कुमारचा जो गेट अप असायचा त्याच अटायरमध्ये तो प्रीमियरला देखील उपस्थिती देत होता. व्हीलचेअरमध्ये बसून तो अक्षयच्या सिनेमाला उपस्थित राहायचा. मुदितसोबत बोलताना अक्षय कुमार (Akshay kumar) नेहमी मोटिवेशनल बोलायचा. त्याला मानसिक आधार द्यायचा. अक्षय कुमारला त्याच्या आजाराची आणि गांभीर्याची संपूर्ण कल्पना होती पण जेवढे दिवस आहे तितके त्याचे दिवस चांगले जायला हवे या भावनेतून तो त्याला प्रेरणा देत होता.
========
हे देखील वाचा : गुलजार आपल्या वडलांच्या अंत्यसंस्काराला का उपस्थित नव्हते?
========
अक्षय कुमारच्या या नोबल वर्कची त्या काळात खूप चर्चा झाली होती. या मुदित भाटिया याचा मृत्यू २०१९ साली झाला. तेव्हासुद्धा अक्षय कुमारने (Akshay kumar) त्याच्या घरच्यांकडे जाऊन त्यांचे सांत्वन केले. आपल्या ट्विटर अकौंटवरून त्याला श्रद्धांजली देखील वाहिली. या आजाराच्या सपोर्ट ग्रुपलां भरघोस आर्थिक मदत केली. यशाच्या आणि लोकप्रियतेच्या लाटेवर असताना देखील अक्षय कुमारने आपले सामाजिक भान जपले हे यातून त्याचे माणूसपण सिद्ध होते.