Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 : सदस्यांच्या डोळ्यात धूळ फेकत प्रभूने

Tanya Mittal लवकरच अडकणार लग्नबंधनात? ब्राइडल लेहंग्यातील व्हिडिओमुळे चर्चांना उधाण…

Aetashaa Sansgiri Wedding: ‘दख्खनचा राजा’ने जुळवलेली जोडी अडकली लग्नबंधनात; एतशा-निषाद

‘खूबसूरत’; अभिनेत्री Rekha हिला पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळवून देणारा चित्रपट

लक्ष्मीकांत बेर्डेंनी Jeetendra यांच्यामुळे खाल्लेला वडिलांचा मार!

Anandi New Serial: जिद्द आणि सकारात्मकतेने आयुष्याचा सामना करणारी ‘आनंदी’

Bigg Boss Marathi 6: सहाव्या आठवड्यानंतर घराबाहेर पडताच Sachin Kumavat

VIROSH चं लग्न! विजय देवरकोंडा आणि रश्मिकाने अखेर आपल्या नात्याची

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

‘छोट्या बयोची मोठी स्वप्नं’ मालिकेने केला ६०० भागांचा टप्पा यशस्वीरीत्या पार!

 ‘छोट्या बयोची मोठी स्वप्नं’ मालिकेने केला ६०० भागांचा टप्पा यशस्वीरीत्या पार!
Chotya Bayochi Mothi Swapna
टीव्ही वाले मिक्स मसाला

‘छोट्या बयोची मोठी स्वप्नं’ मालिकेने केला ६०० भागांचा टप्पा यशस्वीरीत्या पार!

by Team KalakrutiMedia 01/08/2024

बयोच्या स्वप्नपूर्तीचा प्रवास रेखाटणारी ‘छोट्या बयोची मोठी स्वप्नं’ ही सोनी मराठीवरील लोकप्रिय आणि मौलिक संदेश देणारी मालिका प्रेक्षकांनी चांगलीच उचलून धरली आहे. शिक्षणाच्या ध्यासाने कोकण ते मुंबई असा खडतर प्रवास करणारी बयो आता डॉक्टर होण्याच्या प्रवासात पुढची वाटचाल करते आहे. तिला आजवर वडिलांचा पाठिंबा आणि डॉ. विशालची साथ मिळाली. आजवरच्या सगळ्या अडचणींना सामोरं जात बयोचा डॉक्टर होण्याचा प्रवास सुरू आहे. वडिलांसोबत ती गरजू रुग्णांची सेवा घरच्या घरी करू लागली होती, पण आता हॉस्पिटलमध्येच रुग्णांची सेवा‌ करून बयो आपले शिक्षणही घेते आहे. मुंबईसारख्या स्वप्नांच्या नगरीत येऊन आपले स्वप्न पूर्ण करू पाहणारी बयो अनेक संकटांना सामोरी गेली.(Chotya Bayochi Mothi Swapna)

Chotya Bayochi Mothi Swapna
Chotya Bayochi Mothi Swapna

सोबतच वडिलांचा शोध आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी झटणारी बयोही आपण पहिली. ही भूमिका अभिनेत्री विजया बाबर चोख बजावते आहे. मालिकेने आता ६०० भागांचा टप्पा पार केला. या वेळी मालिकेतील सगळे कलाकार उपस्थित होते. इराची भूमिका साकारणारी अभिनेत्री ऋचा गायकवाड ही उपस्थित होती. त्याशिवाय ६०० भागांचं निमित्त म्हणून लहानपणीच्या बयो आणि इरा यांनीही उपस्थिती लावली आणि एकत्र साजरा केला ६००वा भाग. या वेळी अभिनेत्री विजया बाबर म्हणाली की, ”हा ६०० भागांचा टप्पा प्रेक्षकांच्या प्रेमाशिवाय पूर्ण करू शकलो नसतो.”

Chotya Bayochi Mothi Swapna
Chotya Bayochi Mothi Swapna

”प्रेक्षकांचे प्रेम जर असेच पाठीशी राहिले तर आम्ही अजून जोमाने काम करू. मालिकेच्या संपूर्ण चमूने एकत्र येऊन हा महत्त्वपूर्ण टप्पा साजरा केला आणि आनंद व्यक्त केला.” आजवरचा बयोचा प्रवास खडतर होता, पण यापुढला तिचा प्रवास कसा असेल, हे मालिकेतल्या पुढल्या भागांत पाहायला मिळेल.(Chotya Bayochi Mothi Swapna)

=================================

हे देखील वाचा: संतोष जुवेकर पूर्ण करणार पाठीराखा बनून इंदूची इच्छा? ‘इंद्रायणी’ मालिकेत विठू पंढरपूरकर पुन्हा झळकणार!

=================================

इरा आणि बयो यांच्यामधील वाद पुढे आता काय वळण घेईल हेही आता आपल्याला मालिकेत पाहायला मिळेल आणि हे समजून घेण्यासाठी आपल्याला मालिका पाहावी लागेल. या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी , ‘छोट्या बयोची मोठी स्वप्नं‘ ही मालिका सोम. ते शनि. रात्री ८.३० वा. सोनी मराठी वाहिनीवर तुम्हाला पाहता येईल.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actress Vijaya Babar Chotya Bayochi Mothi Swapna Entertainment Marathi Serial Sony marathi sony marathi serial
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.