India’s Got Latent Case Update: Ranveer Allahbadia आणि Apoorva Mukhija च्या

Big Boss Ott 3 चा फिनाले कुठे आणि कधी पाहू शकाल?बक्षीसाची रक्कम किती? जाणून घ्या सर्व डीटेल्स
बिग बॉस ओटीटी 3 अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. बिग बॉस ओटीटी 3 चे चाहते आणि स्पर्धक ग्रँड फिनालेसाठी सज्ज झाले आहेत. आणि आज त्याचा ग्रँड फिनाले होणार आहे. वेळ जस जशी पुढे पुढे सरकत आहे. तसतसा या सीझनचा विजेता कोण असेल हे जाणून घेण्याची प्रत्येकाची इच्छा वाढत असून स्पर्धकांबरोबरच चाहत्यांनाही यावेळी विजयाचा मुकुट कोण जिंकणार याची उत्सुकता लागली आहे. लवकेश कटारिया आणि अरमान मलिक बाहेर पडल्याने अनिल कपूरच्या या शोला टॉप 5 स्पर्धक मिळाले आहेत. या यादीत सना मकबूल, रॅपर नेझी, रणवीर शरी, कृतिका मलिक आणि साई केतन यांच्या नावांचा समावेश आहे. मतदानाचा टप्पा सुरू असून आपल्या आवडत्या स्टार्सना जिंकण्यासाठी चाहते जोरदार मतदान ही करत आहेत. चला तर मग जाणून घेऊया हा बिग बॉस ओटीटी 3 शोचा ग्रँड फिनाले तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता.(Big Boss Ott 3 Finale)

बिग बॉस ओटीटी 3 चा ग्रँड फिनाले 2 ऑगस्ट म्हणजे आजच होणार आहे. या दिवशी महिनाभर घरात राहील्यानंतर प्रवास केल्यानंतर कोण जिंकण्यास पात्र आहे हे कळेल. ग्रँड फिनाले प्रेक्षकांना जिओ सिनेमावर लाइव्ह पाहता येणार आहे. आणि हा संपूर्ण सीझन जिओ सिनेमावर स्ट्रीम करण्यात आला आहे. बिग बॉस ओटीटी 3 चा फिनाले पाहण्यासाठी प्रेक्षकांना जिओ सिनेमा प्रीमियम सब्सक्रिप्शन घ्यावे लागेल. यासह तुम्ही हा संपूर्ण शो लाईव्ह पाहू शकता.

बिग बॉस ओटीटीच्या मागील दोन सीझनप्रमाणे या सीझनची बक्षिसाची रक्कमही २५ लाख रुपये असणार आहे. पहिला सीझन दिव्या अग्रवालने जिंकला होता, तर एल्विश यादवने दुसऱ्या सीझनमध्ये रिअॅलिटी शोची ट्रॉफी पटकवणारा पहिला वाइल्डकार्ड स्पर्धक बनून इतिहास रचला होता. आता ‘बिग बॉस ओटीटी ३‘ या सीझनचा विजेता कोण असेल, हा सस्पेन्स 2 ऑगस्ट म्हणजे आ़जच समोर येणार आहे.
================================
================================
यावेळी ‘बिग बॉस ओटीटी ३’ची ट्रॉफी अतिशय रंजक पद्धतीने डिझाइन करण्यात आली आहे. ट्रॉफीमध्ये एक मुखवटा घातलेला चेहरा दिसत आहे. जो सिंहासनावर विराजमान आहे. ट्रॉफीची डिझाईन शोच्या घराच्या प्रवेशद्वारासारखीच आहे. ट्रॉफी सोनेरी रंगाची दिसते जी खूप आकर्षक आहे. तसेच ट्रॉफी वर खाली एक डोळा आणि विजेता असे लिहिलेला आहे.