Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Dashavatar Movie Review : माणसातला अवतार दाखवणारा ‘दशावतार’

Last Stop Khanda: ‘शालू झोका दे गो मैना’, Prabhakar More

Big Boss 19: सलमान खानशिवाय होणार वीकेंड का वार; ‘हा’

Raj Kapoor आणि वहिदा रहमान यांच्या ट्रेनवर विद्यार्थ्यांनी दगडफेक का

Saiyaara आता OTT गाजवणार!

Bollywood : मुस्लिम अभिनेता पाळायचा श्रावण तर ‘ही’ मराठी अभिनेत्री

Rajesh Khanna यांचा ‘तो’ बोल्ड चित्रपट जो केवळ ९ थिएटर्समध्ये

चला Mehboob Studio मध्ये…

Mrunmayee Deshpande : ‘मना’चे श्लोक’चा भन्नाट टीझर प्रदर्शित

Tango Malhar Movie Trailer: सिनेमातून उलगडणार रिक्षा चालकाचा प्रेरणादायी प्रवास

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

मनमोहन देसाई यांचा ‘आ गले लग जा’ सिनेमा आजही अल्जिरीयात लोकप्रिय!

 मनमोहन देसाई यांचा ‘आ गले लग जा’ सिनेमा आजही अल्जिरीयात लोकप्रिय!
बात पुरानी बडी सुहानी

मनमोहन देसाई यांचा ‘आ गले लग जा’ सिनेमा आजही अल्जिरीयात लोकप्रिय!

by धनंजय कुलकर्णी 08/08/2024

दिग्दर्शक मनमोहन देसाई यांचा एक चित्रपट १९७३ साली आला होता ‘आ गले लग जा’ हा सिनेमा आज पन्नास वर्षानंतर अल्जिरीया या देशात प्रचंड लोकप्रियता टिकवून आहे ! या चित्रपटात शशी कपूर, शर्मिला टागोर, शत्रुघ्न सिन्हा, ओमप्रकाश आणि मास्टर टिटो यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटाची गाणी साहीर यांची तर संगीत राहुल देव बर्मन यांचे होते. यातील गाणी आज देखील लोकप्रिय आहेत. या चित्रपटातील एका गाण्याला फिल्मफेअरचे नॉमिनेशन मिळाले होते. गंमत म्हणजे हेच गाणं आणि हे गाणं जिने गायलं तिच्यावर पंचम सुरुवातीला फारसे खुश नव्हते. कोणतं होतं ते गाणं? आणि राहुल देव बर्मन का नाराज होते रेकॉर्डिंगच्या वेळी? (Sushma Shreshta)

‘आ गले लग जा’ या चित्रपटात किशोर कुमार आणि सुषमा श्रेष्ठ (Sushma Shreshta) यांनी एक गाणं गायलं होतं. मुळात या गाण्याचे दोन व्हर्शन होते. एक होतं किशोर कुमार यांच्या आवाजात आणि दुसरं होतं किशोर आणि सुषमा श्रेष्ठ यांच्या आवाजात. गाण्याचे बोल होते ‘तेरा मुझसे है पहले का नाता कोई युंही नही दिल लगाता कोई …’  गाणे अतिशय भावस्पर्श होते. चित्रपटात देखील या गाण्याला खूप महत्त्व होतं. त्यामुळे हे गाणं बालकलाकारावर चित्रित करायचे असले तरी ते गाणं एका ख्यातनाम गायिकेकडून गाऊन घ्यायचं होतं. (लता?) परंतु रेकॉर्डिंगच्या दिवशी नेमका प्रॉब्लेम झाला ती गायिका प्रकृतीच्या कारणामुळे रेकॉर्डिंगला येऊ शकली नाही.

निर्मात्याचे प्रेशर असे होते की ते गाणं त्याच दिवशी रेकॉर्डिंग करणे गरजेचे होते. किशोर कुमार वेळीच रेकॉर्डिंगला आले. ती गायिका मात्र आली नाही. आता ऐन वेळी काय करायचे? आर डी बर्मन यांनी किशोर कुमारचा पोर्शन रेकॉर्ड करून घेतला आता या छोट्या मुलांसाठी कुणाचा प्लेबॅक घ्यायचा याच्यावर चर्चा झाली आणि राहुल देव बर्मन यांना आठवण झाली सुषमा श्रेष्ठ (Sushma Shreshta) या बाल गायिकेची! त्यांनी तिच्या घरी फोन लावला आणि ताबडतो तिला यायला सांगितले. परंतु त्यावेळी ती नेमकी शाळेत गेली असल्यामुळे तिच्या मोठ्या बहिणीने तिला शाळेतून थेट सरळ रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये आणले.

आर डी बर्मनसोबतचे सुषमा श्रेष्ठ हे पहिलेच गाणं होतं तिला पाहून आर डी बर्मन मात्र नाराज झाले कारण त्यांच्या डोक्यात मूळ गायिका होती. त्यामुळे त्यांनी त्यांचे असिस्टंट भूपेंद्र सिंग आणि उत्तम सिंग यांना हे गाणे रेकॉर्ड करायला सांगितले. त्या दोघांनी लहानग्या सुषमा श्रेष्ठला (Sushma Shreshta) गाणं समजावून सांगितलं. आज रेकोर्डिंग करू नंतर त्या गायिकेच्या आवाजात डब करू असे ठरले. दोन चार रिहर्सल घेतल्या आणि लगेच रेकॉर्डिंग सुरू केलं. तिने अतिशय सुंदर रित्या हे गाणे गायले!

गाणं ऐकल्यानंतर आर डी बर्मन एकदम खुश झाले आणि त्यांनी सुषमा श्रेष्ठला उचलून घेतलं आणि म्हणाले, ”बेटा, आज तू जिंकलंस. आता हे गाणं तुझ्याच आवाजात राहील.” त्यानंतर या चित्रपटात आणखी एक गाणं होतं ज्यामध्ये किशोर सोबतच सुषमा श्रेष्ठचा स्वर होता. गाण्याचे बोलवते ‘ऐ मेरे बेटे सून मेरा कहना…’  या गाण्यासाठी सुषमा श्रेष्ठला नॉमिनेशन मिळालं होतं. सुषमा श्रेष्ठ (Sushma Shreshta)ने त्या काळातील सर्व आघाडीच्या संगीतकारांकडे गाणं गायले. नौशाद, सी  रामचंद्र, मदन मोहन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, कल्याणजी आनंदजी, रोशन…. त्यानंतर मात्र तिने काही काळ ब्रेक घेतला आणि १९९२ सालच्या ‘दिवाना’ चित्रपटापासून तिने नाव बदलून पुन्हा गायला सुरुवात केली. आता मात्र सुषमा श्रेष्ठने स्वतःच बदलून पुर्णिमा ठेवले!

========

हे देखील वाचा : किशोर कुमारने ‘लव्ह स्टोरी’ची गाणी गायला का नकार दिला?

========

मनमोहन देसाई यांचा ‘आ गले लग जा’ सुपर हिट ठरला. यातील ‘वादा करो नही छोडोगे तुम मेरा साथ‘, ’ना कोई दिल में समाया’, ’तेरा मुझसे है पहले का नाता कोई’, ’ऐ मेरे बेटे सून मेरा कहना’ ही सर्वच गाणी आजही आवडीने ऐकली जातात. या सिनेमात फक्त भारतातच नाही तर परदेशात देखील चांगले यश मिळाले. अरब देशातील अल्जिरीयामध्ये मागच्या पन्नास वर्षापासून या सिनेमाची मोठी क्रेझ आहे. तिथे  JANITOU. या नावाने हा सिनेमा आजाही पुन्हा पुन्हा पहिला जातो. मिथुन, पद्मिनीचा ‘प्यार झुकता नही’ हा सिनेमा देखील याच कथानकावर आधारीत होता.

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Celebrity News Entertainment Featured R D Burmen sushma shreshta
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.