सत्य घटनेवर आधारित ‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर जाहीर!
प्रदीर्घ संघर्षानंतर अखेर बंगालमधील सत्य घटनेवर आधारित ‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’ हा चित्रपट प्रदर्शिनाची तारीख अखेर जाहीर करण्यात आलेली आहे. हा चित्रपट ३० ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात पश्चिम बंगालमध्ये पसरलेला हिंदूंविरोधातील हिंसाचार, लव्ह जिहाद आणि ढासळत चाललेली कायदा व सुव्यवस्था केंद्रस्थानी ठेवण्यात आली आहे. आज देशापासून तुटण्याच्या तयारीत असलेल्या देशाच्या समस्यांवर प्रकाश टाकत हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. सामान्य जीवन, धर्मांतर, धार्मिक हिंसेच्या नावाखाली राजकीय महत्त्वाकांक्षा आणि एका विशिष्ट समाजाला व्होट बँकेसाठी प्रोत्साहन देण्याची भीती या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.(The Dairy of West Bengal Movie)
‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल: अ बोल्ड एक्सप्लोरेशन ऑफ हिस्ट्री, कल्चर अँड कॉन्ट्रोवर्सी’ या चित्रपटात अर्शिन मेहता, यजुर मारवाह आणि गौरी शंकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अर्शिन मेहता, यजुर मारवाह, गौरी शंकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल‘ हा चित्रपट समृद्ध इतिहास आणि गुंतागुंतीच्या सांस्कृतिक गतिशीलतेने नटलेल्या प्रदेशाच्या मध्यभागी खोलवर उलगडतो. म्यानमारमधील रोहिंग्या निर्वासित आणि बांगलादेशातून आलेल्या अवैध घुसखोरांच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या या चित्रपटात पश्चिम बंगालमधील जीवनाचे ज्वलंत चित्र रेखाटण्यात आले असून, या भागातील परंपरेला आधुनिक काळातील आव्हानांची जोड देण्यात आली आहे. कथेत कुतूहल आणि वादाचा थर जोडणाऱ्या ‘लव्ह जिहाद’सारख्या संवेदनशील मुद्द्यालाही या कथेने हात घातला आहे.
‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’ या चित्रपटाचे दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी मुंबईत सांगितले की, ‘हा चित्रपट बनवण्यासाठी आम्हाला जेवढी मेहनत घ्यावी लागली, त्यापेक्षा जास्त मेहनत तो प्रदर्शित करण्यासाठी घ्यावी लागली. चित्रपटातील अनेक सीन-सीक्वेंस पुन्हा शूट करावे लागले. आम्ही हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडे रिव्ह्यूसाठी खूप लवकर दिला होता, ज्यासाठी आम्हाला बराच काळ वाट पाहावी लागली होती. अखेर आता आमच्या चित्रपटाला सर्व बाजूंनी प्रदर्शनासाठी हिरवा कंदील मिळाला आहे.(The Dairy of West Bengal Movie)
====================================
====================================
हा चित्रपट ३० ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे संगीत झी म्यूजिक वर उपलब्ध आहे.
‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर कथा आणि आशयावरून बराच वाद निर्माण झाला होता.अखेर एवढ्या दिवसांच्या प्रतिक्षेनंतर सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख आता समोर आली आहे.