Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

Lata Mangeshkar, आशा भोसले आणि गीता दत्त यांची एकाच ट्यूनवरील

Big Boss Marathi Sesaon 6 : “माझ्या आई-बाबांना हे आवडणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

तेजस्विनी पंडितचा बहुप्रतिक्षित सिनेमा ‘येक नंबर’च्या टिजर ने वाढवली उत्सुकता…

 तेजस्विनी पंडितचा बहुप्रतिक्षित सिनेमा ‘येक नंबर’च्या टिजर ने वाढवली उत्सुकता…
Yek Number Marathi Movie
मिक्स मसाला

तेजस्विनी पंडितचा बहुप्रतिक्षित सिनेमा ‘येक नंबर’च्या टिजर ने वाढवली उत्सुकता…

by Team KalakrutiMedia 05/09/2024

झी स्टुडिओज् आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत सह्याद्री फिल्म्स निर्मित, राष्ट्रीय पुरस्कार विजेते राजेश मापुस्कर दिग्दर्शित ‘येक नंबर’ येत्या १० ऑक्टोबर रोजी दसऱ्याचे अवचित्य साधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाशी इतके दिग्गज जोडले गेले आहेत की, चित्रपटाच्या घोषणेपासूनच याची जोरदार चर्चा सुरु होती. त्यात काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या पोस्टरने ही उत्सुकता अधिकच वाढवली. प्रेक्षकांना या पोस्टरमधील तरुण कोण, हे जाणून घेण्याची प्रचंड इच्छा होती. तर आता या गोष्टीवरून पडदा उठला असून हा रांगड्या व्यक्तिमत्वाचा तरुण धैर्य घोलप असल्याचे समोर आले आहे.( Yek Number Marathi Movie)

Yek Number Marathi Movie
Yek Number Marathi Movie

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये चित्रपटाचा नायक धैर्य घोलप एका वेगळ्याच रूपात पाहायला मिळत असून, त्याच्या देहबोलीतूनच मनातील क्रोध व्यक्त होत आहे. याव्यतिरिक्त या पोस्टरमध्ये लक्षवेधी ठरत आहे, ती एक करारी नजर, जी महाराष्ट्राच्या परिचयाची आहे. या सगळ्यात अधिक भर घालत आहे, ते गूढ, रहस्यमयी संगीत. त्यामुळे या सगळ्यामागे नेमके काय दडले आहे, हे जाणून घेण्यासाठी मात्र थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. तेजस्विनी पंडित आणि वरदा साजिद नाडियाडवाला ह्या ‘येक नंबर‘ चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. तर या चित्रपटाला, मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीला आपल्या संगीतावर ठेका धरायला लावणारे, अजय -अतुल यांचे धमाकेदार संगीत लाभले आहे. या चित्रपटाच्या छायाचित्रणाची धुरा संजय मेमाणे यांनी सांभाळली आहे.

Yek Number Marathi Movie
Yek Number Marathi Movie

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक राजेश मापुस्कर म्हणतात की, “या चित्रपटासाठी मला एक असा नवीन चेहरा हवा होता, जो प्रेक्षकांना आपल्यातलाच एक वाटेल. त्यामुळे धैर्यचा रांगडा लूक मला या व्यक्तिरेखेसाठी अतिशय योग्य वाटला. त्यानेही या व्यक्तिरेखेला उत्तम न्याय दिला आहे.”तर निर्माती तेजस्विनी पंडित म्हणते की, ”प्रेक्षकांची अनेकदा तक्रार असते की, मराठी चित्रपटांमध्ये तांत्रिकदृष्ट्या, सादरीकरणात भव्यता नसते. हाच समज दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या चित्रपटात अनेक कुशल, सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञांचा सहभाग आहे. ही भव्यता प्रेक्षकांना पडद्यावर नक्कीच दिसेल. या सगळ्याचे श्रेय या चित्रपटाशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकाला जाते.”(Yek Number Marathi Movie)

==========================

हे देखील वाचा: निवेदिता सराफ आणि मंगेश जाधव यांची’आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

===========================

 झी स्टुडिओजचे बिझनेस हेड बवेश जानवलेकर म्हणतात, ‘’सुरूवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत आणि अशा चित्रपटाशी आम्ही जोडले गेलो आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे. झी स्टुडिओजने नेहमीच प्रेक्षकांना सर्वोत्कृष्ट, दर्जेदार आणि हिट चित्रपट दिले आहेत. आमची ही परंपरा या चित्रपटातही कायम राहील, याची आम्हाला खात्री आहे.’’ बहुप्रतीक्षित असलेला “येक नंबर‘ हा चित्रपट १० ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. दसऱ्याच्या सोन्यासोबतच चित्रपटाचाही आनंद प्रेक्षकांना लुटता येणार आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: ajay atul songs dhairya Gholap tejswini pandit yek number marathi movie yek number movie
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.