दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
अखेर कंगना रणौतच्या Emergency सिनेमाला ग्रीन सिग्नल; सेन्सॉर बोर्डाकडून ‘UA’ प्रमाणपत्र मिळाले…
कंगना रणौतचा ‘इमर्जन्सी‘ हा चित्रपट बराच काळ वादाच्या भोवऱ्यात अडकला होता, त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही पुढे ढकलण्यात आली होती. ६ सप्टेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने कात्री लावली आहे. केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाने (सीबीएफसी) या चित्रपटाला ३ कट आणि एकूण १० बदलांसह ‘UA‘ प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे परंतु निर्मात्यांना त्यासाठी काही अटींचे पालन करावे लागणार आहे. सेन्सॉर बोर्डाने ‘इमर्जन्सी’च्या निर्मात्यांना काही दृश्ये कापण्यास, तसेच डिस्क्लेमर देण्यास सांगितले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. चित्रपटात दाखवण्यात आलेल्या सर्व ऐतिहासिक घटना आता डिस्क्लेमरमध्ये टाकण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.(Emergency Movie Release Date)
8 जुलै रोजी निर्मात्यांनी हा चित्रपट बोर्डाकडून पास होण्यासाठी सादर केला आणि 8 ऑगस्ट रोजी 3 कटसह चित्रपटात 10 बदल करण्याच्या सूचना पाठविण्यात आल्या. सीबीएफसीने मणिकर्णिका फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेडला पत्र लिहून ‘यूए’ प्रमाणपत्रासाठी आवश्यक असलेल्या १० ‘कट/इन्सर्शन/मॉडिफिकेशन्स’ची यादी पाठवली होती.
माजी राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी भारतीय महिलांविषयी केलेले आक्षेपार्ह वक्तव्य आणि विन्स्टन चर्चिल यांनी भारतीय सशांसारखी प्रजनन करतात, असे वक्तव्य यासह वादग्रस्त ऐतिहासिक विधानांसाठी केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाने कंगनाच्या ‘इमर्जन्सी‘ चित्रपटाच्या निर्मात्यांकडून सूत्रांची मागणी केली आहे. निर्मात्यांना हे दोन्ही स्टेटमेंट सार्स सीबीएफसीकडे सादर करावे लागतील. निर्मात्यांनी जुलैमध्ये हा चित्रपट प्रमाणपत्रासाठी सादर केला आणि 8 ऑगस्ट रोजी सीबीएफसीने चित्रपटात 3 कट आणि 10 बदलांची मागणी केली.(Emergency Movie Release Date)
============================
============================
वादामुळे कंगनाच्या ‘इमर्जन्सी’च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. या आधी हा सिनेमा ६ सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता, पण आता सेन्सॉर बोर्डाने त्यात काही कट आणि बदल केले आहेत. त्यामुळे कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. आता सिनेमा कोणत्या दिवशी रिलीज होणार हे अजून समोर आले नाही. तुर्तास सिनेमाला केवळ सेंसर बोर्डकडून सर्टिफिकेट मिळाले आहे.