गाडीच्या टपावर पडणाऱ्या पावसाच्या थेंबाच्या आवाजातून सुचले हे गाणे!
अभिनेता अशोक कुमार यांनी चाळीस दशकात घेतली होती फेरारी कार!
इम्पोर्टेड गाड्या आता भारतीयांना काही नवीन राहिलेल्या नाहीत. आज भारतातील रस्त्यांवर अनेक परदेशी बनावटीच्या कार फिरताना दिसतात. पण एकेकाळी असे चित्र नव्हतं. फेरारी ही कार घेणं हे आजही अनेक जणांचं ड्रीम असतं.(आणि ते ड्रीमच रहातं!!!) या कारची किंमतच एवढी प्रचंड आहे किती लोक हे अफोर्ड करू शकतील? असं असतानाही चाळीसच्या दशकामध्ये एका भारतीय अभिनेत्याने चक्क फेरारी ही कार विकत घेतली होती. त्या अभिनेत्याने ही कार तर विकत घेतलीच पण दुसऱ्या दिवशीच पुन्हा ती कंपनीला विकून टाकली! का? मोठा इंटरेस्टिंग किस्सा आहे. कोण होता तो अभिनेता आणि का त्याने दुसऱ्या दिवशी आपले फेरारी कार पुन्हा कंपनीला का विकून टाकली? (Ashok Kumar)
चाळीसच्या दशकामध्ये भारतातील रस्त्यांची अवस्था पाहता तिथे परदेशी कार असणं ही दुरापास्त असलेली गोष्ट होती. असं असतानाही १९४३ साली अभिनेता अशोक कुमार (Ashok Kumar) म्हणजेच दादा मुनी यांनी चक्क फेरारी ही कार विकत घेतली होती. फेरारी कार हि कायम श्रीमंत लोकांची समजली जात होती आणि आजही आहे. कारण या कारची किंमतच कोटीमध्ये आहे. चाळीसच्या दशकातील फेरारी कारची किंमत देखील प्रचंड मोठी अशीच होती. असे असतानाही अशोक कुमार यांनी ती कार विकत घेतली. त्या काळात कार विकत घेणे ही सुद्धा एक मोठे लॉंग प्रोसेस होती पण अशोक कुमार यांना ती कार घ्यायचीच होती हे त्यांचे ड्रीम प्रोजेक्ट होते.
चाळीसच्या दशकामध्ये अशोक कुमार हे त्या अर्थाने सुपरस्टार होते. बॉम्बे टॉकीजमधील त्यांच्या चित्रपटांना जबरदस्त यश मिळत होते. झुला, कंगन, बंधन, आजाद, जीवन नैय्या हे चित्रपट संपूर्ण भारतभर प्रचंड गाजत होते. १९४३ साली त्यांचा ‘किस्मत’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने तर आधीचे सर्व लोकप्रियतेचे रेकॉर्ड्स ब्रेक करून टाकले. हा सिनेमा इतका लोकप्रिय झाला की कलकत्त्याच्या रॉक्सी थेटरमध्ये या सिनेमाने तब्बल पुढची साडेतीन वर्ष मुक्काम ठोकला होता.
भारतातील अनेक शहरांमध्ये या सिनेमाने रौप्य आणि सुवर्ण महोत्सवी यश प्राप्त केले होते. भारतीय सिनेमात अँटी हिरोची सुरुवात याच चित्रपटापासून झाली होती. या चित्रपटाने त्या काळात तब्बल एक कोटीचा धंदा केला होता असे म्हटले जाते. या चित्रपटाच्या यशानंतर अशोक कुमार (Ashok Kumar) यांनी त्यांच्या ड्रीम प्रोजेक्ट म्हणजेच फेरारी कार विकत घेण्याचा निर्णय घेतला. कार बुक करून भारतात यायला अनेक महिन्यांचा कालावधी गेला. अखेर तो दिवस उजाडला ज्या दिवशी भारतामध्ये अशोक कुमारच्या दारात फेरारी ही कार उभी राहिली. फेरारी घेणारे अशोक कुमार हे पहिले सिने कलावंत होते. अशोक कुमार यांचा आनंद तर गगनात मावेना असा झाला होता. त्यांचे अनेक वर्षांच्या स्वप्न आज पूर्ण झाले होते.
कार घेतल्यानंतर त्यांनी आपल्या कारने स्टुडिओत जायचे ठरवले. वरळी ते मालाड हे २६ किमीचे अंतर कापायला आज दोन तास सहज लागतात पण त्या काळामध्ये फेरारी कारने हे अंतर चक्क १५ मिनिटात पार केले! कारण त्या कारचा स्पीडच प्रचंड होता. अशोक कुमार (Ashok Kumar)च्या या कारचे सर्वत्र मोठे कौतुक झाले. त्या काळातल्या मीडियाने देखील याची दखल घेतली कारण फेरारी कार घेणार ते भारतातील पहिले बॉलीवूड अभिनेता होते. संध्याकाळी सुद्धा अवघ्या पंधरा वीस मिनिटात ते घरी पोहोचले.
परंतु दुसऱ्या दिवशी त्यांनी मात्र हे कार कंपनीला पुन्हा विकून टाकण्याचा निर्णय घेतला. का? कारण अशोक कुमार यांना असे वाटले या कारची स्पीड खूप जास्त आहे आणि ही कार आपल्या भारतीय रोड कंडीशनसाठी योग्य नाही. या कारने एक्सीडेंट होऊ शकतो आणि त्यात कुणाचे प्राण जाऊ शकतात त्यामुळे त्यांनी ही कार कंपनीला पुन्हा विकून टाकली.
=========
हे देखील वाचा : अमिताभ आणि जया यांना हनिमूनहून तातडीने का परत यावे लागले?
=========
या खरेदी विक्री प्रोसेसमध्ये अशोक कुमार (Ashok Kumar) यांना फायदा झाला का तोटा झाला हे माहिती नाही पण त्याने एक दिवसाच्या आत घेतलेली फेरारी कार पुन्हा कंपनीला विकून टाकली हे नक्की. अशोक कुमार यांची मुलगी भारती जाफरी (अभिनेत्री अनुराधा पटेलची आई आणि अभिनेता कंवलजीत यांची सासू) हिने ही सर्व माहिती एका व्हिडीओ मासिकाला नव्वद दशकात दिली होती. आज भारतातील अनेक कलाकारांकडे फेरारी कार आहे. संजय दत्त यांच्या मालकीची फेरारी कार आपण ‘फेरारी की सवारी’ या चित्रपटात बघितली होती.
आज भारतातील अनेक राजकारणी, उद्योगपती, कलावंत, खेळाडू, अधिकारी यांच्याकडे ही कार आहे पण ऐंशी वर्षांपूर्वी असला प्रकार नव्हता!