दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ यांनी गुपचूप केले लग्न; दोघांचे फोटो पाहून तुम्हीही व्हाल फिदा…
चित्रपटसृष्टीत गेल्या काही दिवसांपासून गुपचूप लग्न करण्याची जणू फॅशन झालेली पहायला मिळत आहे. याआधी तापसी पन्नूने गुपचूप लग्न करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाबद्दल सर्वांना माहिती असली तरी आता अदिती राव हैदरीने तिचा बॉयफ्रेंड आणि अभिनेता सिद्धार्थसोबत गुपचूप लग्न करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. दोघेही बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. या वर्षी जूनमध्ये दोघांचा साखरपुडा झाला होता. आता अखेर दाक्षिणात्य अभिनेत्री अदिती राव हैदरीने तिचा प्रियकर सिद्धार्थ सोबत लग्न केले आहे. चाहते त्यांच्या लग्नाची वाट पाहत होते आणि आता त्यांनी आपल्या लग्नाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.(Aditi Rao Hydari And Siddharth Wedding Photo)
नुकतेच अदिती राव हैदरीने तिच्या इन्स्टाग्रामवर लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात दोघेही दक्षिण भारतीय रीती रिवाजांनी लग्न करताना दिसत आहेत. या दोघांनी दक्षिण मंदिरात लग्न केले. यावर्षी जून महिन्यात दोघांनी गुपचूप साखरपुडा केला, ज्यामुळे चाहत्यांमध्ये खळबळ उडाली होती, त्यानंतर त्यांच्या लग्नाच्या अफवा ही पसरल्या होत्या. मात्र आता अशा तऱ्हेने दोघांनी गुपचूप लग्न करून चाहत्यांना धक्का दिला.
दोघांच्या अचानक लग्नाचे फोटो पाहून चाहते ही हैराण झाले आहेत. आणि तितकेच आनंदी आहेत. तसेच कमेंट करून चाहते त्यांना लग्नाच्या शुभेच्छा देत आहेत. अदिती-सिद्धार्थने हे क्यूट फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘तू माझा सूर्य, चंद्र आणि सर्व तारे आहेस. कायम माझा जीवनसाथी बनणे, हसणे, कधीही मोठे न होणे , प्रेम करणे आणि जीवनात प्रकाश आणणे. तुझ्यासोबत राहण्याचा प्रवास नेहमीच खास राहील.”
===============================
================================
शेअर केलेल्या फोटोंमध्ये ते एकमेकांसोबत रोमँटिक पोज देताना दिसत आहेत. फोटोंमध्ये दोघांची जबरदस्त बॉन्डिंग आणि जबरदस्त केमिस्ट्री अप्रतिम दिसत आहे. या फोटोंमध्ये हे कपल लग्नाचे विधी करताना दिसत आहे. (Aditi Rao Hydari And Siddharth Wedding Photo) शेअर केलेल्या फोटोंवरून स्पष्ट अंदाज बांधता येतो की, दोघांच्या लग्नाला फक्त कुटुंबीय, मित्र आणि जवळचे लोकच उपस्थित होते. आणि त्यांनी दक्षिण परंपरेनुसार लग्न केले.