Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

“मला टोळी-काटा फरक पडत नाही, मी स्वत:साठी खेळणार”; Ruchita Jamdar

Wagh Aala Marathi Rap: कोल्हापुराचा यंग रॅपर ‘ए किंग’चा हटके

Sonalee kulkarni वर कोसळला दुःखाचा डोंगर; भावाच्या निधनाने अभिनेत्री भावूक,

Khote Sikkay : हॉलीवूड ‘करी वेस्टर्न’ टाईप सिनेमाचा भारतीय अवतार!

Virosh Wedding: व्हॉलीबॉल पूल पार्टी,जपानी खाद्यपदार्थांचा बेत अन् बरंच काही!

आई -मुलीच्या नात्याचा हळवा प्रवास उलगडणारा Tigheeचा ट्रेलर प्रदर्शित

Sai Tamhankar : “अमराठी कलाकारांच्या ग्लॅमरच्या नादात आपण आपल्याच मातीतील

Sanjay Leela Bhansali :वडील दारुच्या नशेत, साड्यांना फॉल लावून भागवला

Bigg Boss Marathi 6: चहावरून घरातलं वातावरण तापणार; अनुश्री आणि

“The Kerala Story 2 एक प्रोपोगंडा चित्रपटआ आहे”; अनुराग कश्यपने

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागील कहाणी

 ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागील कहाणी
आठवणींच्या पानावर कलाकृती तडका कलाकृती विशेष

‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागील कहाणी

by Jyotsna Kulkarni 18/09/2024

आज कोणत्याही मराठी माणसाला विचारले की, त्याचा आवडता मराठी चित्रपट कोणता तर सगळ्यांचे एकच उत्तर असेल आणि ते म्हणजे ‘अशी ही बनवाबनवी’. या सिनेमाने अमाप लोकप्रियता आणि प्रसिद्धी कमावली. आज प्रदर्शनाच्या तब्बल ३५ वर्षांनंतरही या सिनेमाची क्रेझ प्रेक्षकांमध्ये कायम आहे. या चित्रपटाने जी लोकप्रियता मिळवली तो कोणत्याही दुसऱ्या सिनेमाच्या नशिबात नाही. आजही या सिनेमाचे सर्व संवाद किंबहुना सर्वच चित्रपट सगळ्यांना तोंडपाठ आहे.

या सिनेमातील संवाद तर अजरामर मानले जातात. त्यावर नेहमीच विविध प्रकारचे मीम्स देखील नेहमीच बनतात. याच सिनेमातील असाच तुफान लोकप्रिय आणि प्रसिद्ध संवाद म्हणजे ‘७० रुपये वारले’. या संवादावर तर नेहमीच सिनेमा बघताना हशा पिकतो. असा हा सुपरहिट डायलॉग लेखकाला सुचला कसा असेल? असा प्रश्न अनेकदा बऱ्याच लोकांना पडतो. नुकतेच या प्रश्नाचे उत्तर या सिनेमाचे दिग्दर्शक असलेल्या सचिन यांनी एका मुलाखतीदरम्यान दिले आहे.

सध्या सचिन पिळगांवकर त्यांच्या आगामी ‘नवरा माझा नवसाचा २’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याचवेळेस त्यांनी एका मुलाखतीमध्ये या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. एका प्रसिद्ध यूट्यूबरला दिलेल्या मुलाखतीत सचिन पिळगावकरांनी ७० रुपये आणि इस्त्रायलचं औषध यामागची खरी कहाणी सांगितली आहे. बनवाबनवी सिनेमाचे लेखक वसंत सबनीस यांच्या खऱ्या आयुष्यात घडलेली ही खरी घटना होती. वसंत सबनीस यांना डायबिटीस होता. त्यामुळे त्यांनी त्यांच्या इस्त्रायलमध्ये राहणाऱ्या मित्राला ७० रुपये देऊन डायबिटीसचे औषध मागवले होते. आयुष्यात घडलेल्या या खऱ्या घटनेचा वापर लेखक वसंत सबनीस यांनी ‘अशी ही बनवाबनवी’ सिनेमात केला आहे.

==============================

हे देखील वाचा: बाप्पाचा आशीर्वाद घेत ‘पाणी’सिनेमाचा टिझर लाँच; आदिनाथ कोठारेचा लूक ही आला समोर…

==============================

‘अशी ही बनवाबनवी’ सिनेमामध्ये हा सीन असा आहे, धनंजय माने (अशोक सराफ) यांचे घरमालक विश्वास सरपोतदार (सुधीर जोशी) यांना डायबिटीस असतो. एकदा धनंजय माने खोटे कारण देत विश्वास सरपोतदार यांच्याकडून ७० रुपये उकळतो. मित्र इस्त्रायलला असून तो तिकडून डायबिटीसचे औषध पाठवेल, अशी थाप तो मारतो. पुढे जेव्हा धनंजय माने सरपोतदारांचे घर सोडतात तेव्हा विश्वास सरपोतदार त्यांना ७० रुपये परत मागत इस्त्रायलच्या औषधाबद्दल विचारतात. तेव्हा माझा मित्र इस्त्रायलला वारला, त्यासोबत तुमचे ७० रुपयेही वारले, असे खोटे सांगतो. हा डायलॉग आजही ऐकला की आपल्या चेहऱ्यावर हसू येतं.

हा सिनेमा म्हणजे मराठी मनोरंजनविश्वातील एक कल्ट सिनेमा ओळखला जातो. फक्त मराठीच नाही तर अनेक इतर भाषांतील लोकांचा बनवाबनवी हा आवडता सिनेमा आहे. या सिनेमाने जे यश आणि लोकप्रियता पाहिली ती कोणालाही मिळालेली नाही.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: अशी ही बनवाबनवी अशोक सराफ सचिन
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.