Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    sadhana and manoj kumar

    Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Dheeraj Kumar : संघर्षातून यशाकडे

अखेर प्रतीक्षा संपली! ‘या’ दिवशी रिलीज होणार ‘Family Man 3’;

‘दिवसाला ४० चपात्या आणि १.५ लीटर दूध’ Actor Jaideep Ahlawaचा

Aatali Batmi Phutali Teaser : खुनाच्या सुपारीभोवती फिरणारी भन्नाट कथा; १९

‘या’ कारणामुळे Mrunal Dusanis ने कलविश्वातल्या मुलाशी लग्न नाही केलं;

Parinati: अमृता सुभाष आणि सोनाली कुलकर्णी ही भन्नाट जोडी एकत्र झळकणार !

Jaideep Ahlawat : “‘नटसम्राट’ हिंदीत करण्याची इच्छा”

सिनेमाचा हिरो Rajesh Khanna पण किशोर कुमार यांचे गाणे दुसऱ्याच

Maalik : राजकुमार रावच्या मालिक चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर हवा?

Dheeraj Kumar : ‘रोटी, कपडा और मकान’ चित्रपट फेम ज्येष्ठ

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार अजय- अतुल यांच्या संगीताची जादू; ‘येक नंबर’चे पहिले प्रेमगीत प्रदर्शित

 पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार अजय- अतुल यांच्या संगीताची जादू; ‘येक नंबर’चे पहिले प्रेमगीत प्रदर्शित
Yek Number Marathi Movie
मिक्स मसाला

पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार अजय- अतुल यांच्या संगीताची जादू; ‘येक नंबर’चे पहिले प्रेमगीत प्रदर्शित

by Team KalakrutiMedia 21/09/2024

झी स्टुडिओज आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत, सह्याद्री फिल्म्स निर्मित ‘येक नंबर’ चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढवली आहे. ‘ती’ करारी नजर, ‘तो’ कणखर आवाज यांनी चित्रपटाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले असतानाच आता या चित्रपटातील पहिलेवहिले रोमँटिक गाणे प्रदर्शित झाले आहे. ‘जाहीर झालं जगाला…’ असे बोल असणारे हे प्रेमगीत धैर्य घोलप आणि सायली पाटीलवर चित्रित करण्यात आले आहे. या गाण्याचे बोल जितके भावपूर्ण आहेत तितकेच या गाण्याचे सादरीकरणही अप्रतिम आहे. गुरु ठाकूर यांच्या लेखणीतून साकारलेल्या या गाण्याला श्रेया घोषाल आणि अजय गोगावले यांनी आपल्या गायकीने चारचांद लावले आहेत. अजय -अतुल यांनी संगीतबद्ध केलेल्या या जबरदस्त गाण्याला स्टॅनली डिकोस्टा यांचे नृत्य दिग्दर्शन लाभले आहे. तेजस्विनी पंडित, वरदा साजिद नाडियाडवाला, बवेश जानवलेकर ‘येक नंबर’ चित्रपटाचे निर्माते आहेत.(Yek Number Marathi Movie )

Yek Number Marathi Movie
Yek Number Marathi Movie

चित्रपटाची घोषणा, पोस्टर, टिझर पाहाता हा एक ॲक्शनपट असल्याचा अंदाज आतापर्यंत प्रेक्षकांना आला असेलच. परंतु नुकत्याच प्रदर्शित झालेल्या गाण्यावरून या चित्रपटात प्रेक्षकांना सुंदर प्रेमकथाही पाहायला मिळणार आहे. या गाण्यात धैर्य प्रथमच एका वेगळ्या अंदाजात दिसत असून सायली -धैर्यची कमाल केमिस्ट्री यातून पाहायला मिळत आहे. प्रत्येकाच्या स्वप्नातील प्रेमकहाणी असावी, इतक्या सुंदररित्या हे गाणे चित्रित करण्यात आले असून प्रत्येक प्रेमीयुगुलाला जादुई नगरीची सफर घडवणारे हे गाणे आहे. चित्रपटाची ही दुसरी बाजूही प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारी आहे.

Yek Number Marathi Movie
Yek Number Marathi Movie

गाण्याबद्दल अजय -अतुल म्हणतात की, ” हे एक प्रेमगीत असल्याने या गाण्यातून मनातील प्रेमभावना हळुवार व्यक्त होणे खूप गरजेचे होते. त्यानुसार गुरु ठाकूर यांनी या गाण्याचे बोल रचले आणि संगीतामध्ये आम्हीही थोडं वेगळं काही करण्याचा प्रयत्न केला आहे. उत्तम बोल, तरलता, आवाज, नृत्य दिग्दर्शन लाभल्याने हे गाणे अतिशय उत्कृष्ट बनले आहे. प्रेमात पडलेल्या प्रत्येकाच्या भावना व्यक्त करणारे हे गाणे आहे.”(Yek Number Marathi Movie)

================================

हे देखील वाचा: पुरेपूर मनोरंजन करणारा ‘नवरा माझा नवसाचा 2’ चित्रपटात दिसणार दमदार कलाकारांची फौज

================================

या गाण्याबद्दल गीतकार गुरू ठाकूर म्हणतात, ‘’ मुळात चालीत दडलेला रोमान्स केवळ शब्दरूपाने कागदावर मांडायचे काम मी केले आहे. अतिशय आनंददायी असा अनुभव होता आणि अजय अतुल सोबत काम करताना प्रत्येकवेळी ही टीमवर्कची जादू अनुभवायला मिळते आणि मला खात्री आहे, गाणे ऐकताना रसिकही ती अनुभवतील.’’

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor ajay atul song Celebrity dhairya Gholap Marathi Movie marathi romantic song yek number marathi movie
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.