‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
Laapataa Ladies Entry For Oscar 2025: किरण राव यांचा ‘लापता लेडीज’ ऑस्करच्या यादीत सामील
किरण राव दिग्दर्शित लापता लेडीज ने प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श केला, या सिनेमाने पडद्यावर काही कमाल केली नाही, परंतु ओटीटीवर आल्यानंतर या चित्रपटाने प्रत्येकाच्या मनात आपला ठसा उमटवला आणि त्याच्या साध्या आणि सरळ कथेने प्रत्येक भारतीयाला आपलसं केले. या चित्रपटात ना मोठा स्टार होता ना कुठले मोठे प्रमोशन केले होते, पण त्याच्या कथेच्या जोरावर त्याने अख्ख जग जिंकले आणि आता ऑस्कर जिंकण्याची वेळ आली आहे कारण याला फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने दुजोरा दिला आहे, लापता लेडीज हा चित्रपट 2025 च्या ऑस्करसाठी पाठवला जाणार आहे.(Laapataa Ladies Entry For Oscar 2025)
किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज‘ या चित्रपटाची निर्मिती आमीर खान ने केली होती. यात प्रतिभा रांटा, स्पर्श श्रीवास्तव आणि नितंशी गोयल यांच्या प्रमुख भूमिका होत्या. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष रवी कोट्टारक्कारा यांनी ज्युरी सदस्यांची माध्यमांशी ओळख करून दिली. गेल्या वर्षी ज्युड अँथनी जोसेफ यांचा 2018 हा चित्रपट 96 व्या ऑस्कर पुरस्कारांच्या शॉर्टलिस्टमध्ये स्थान मिळवू शकला नव्हता.
दोन तरुण वधूंचे एकाच ट्रेनमध्ये अदलाबदल होण्याची गमतीशीर गोष्ट या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. नितंशी गोयल, प्रतिभा रांटा, स्पर्श श्रीवास्तव आणि रवी किशन यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘लापता लेडीज‘ हा चित्रपट खुप साधा आणि सरळ असला तरी इतर सिनेमांपेक्षा वेगळा थरला. जिओ स्टुडिओप्रस्तुत ‘लापता लेडीज या चित्रपटाचे दिग्दर्शन किरण राव यांनी केले असून आमिर खान, किरण राव आणि ज्योती देशपांडे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आमिर खान प्रॉडक्शन आणि किंडलिंग प्रॉडक्शनच्या बॅनरखाली तयार झालेला हा चित्रपट बिप्लब गोस्वामी यांच्या पुरस्कारविजेत्या कथेवर आधारित आहे. पटकथा आणि संवाद स्नेहा देसाई यांनी लिहिले आहेत, तर अतिरिक्त संवाद दिव्यनिधी शर्मा यांनी लिहिले आहेत.(Lapataa Ladies Entry For Oscar 2025)
===============================
हे देखील वाचा: Phullwanti Marathi Movie: कलाकारांच्या अदाकारीने बहरणार ‘फुलवंती’
===============================
प्रेक्षकांना लापता लेडीज या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. हा चित्रपट किरण राव यांच्या दिग्दर्शनात बनवण्यात आला आहे. चेन्नईतील एका कार्यक्रमात ९७ व्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपट श्रेणीसाठी अधिकृत घोषणा करणारी सर्वोच्च संस्था फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या सदस्यांनी अकादमी पुरस्कारांमध्ये भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून ‘लापता लेडीज‘ या नावाची घोषणा केली.