कांची रे कांची रे प्रीत मेरी सांची …
हिंदी सिनेमाच्या संगीतात राहुल देव बर्मन नावाचा जो चमत्कार मागच्या शतकात होऊन गेला त्याला खरोखरच तोड नाही. आज पंचमदा यांना आपल्यातून जाऊन तीस वर्षाहून अधिक कालावधी जरी लोटला असला तरी त्यांच्या संगीताची, त्यांच्या गाण्याची आणि त्यांनी संगीतात केलेल्या प्रयोगाची आजदेखील चर्चा होत असते. (Ranjit Gazmer)
पंचमदा यांच्याकडे अतिशय गुणी अशा म्युझिशियन रत्नांची खाण होती. यात पंचमदाने सर्व गुणसंपन्न असे वादक आपल्यासोबत घेतले होते. यात एक होते रणजीत गजमेर. नेपाळहून भारतात आलेल्या रणजीत गजमेर (रणजीत गजमेर) यांना या नावाने कुणीच ओळखत नाही. त्यांना अख्खी फिल्म इंडस्ट्री ओळखते ‘कांचा’ या नावाने. रणजीत गजमेर यांनी राज्यसभा टीव्ही ला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या या ‘कांचा’ नावाच्या बारशाबद्दल विस्तृतपणे सांगितले. रणजीत गजमेर (Ranjit Gazmer) यांचे ‘कांचा’ हे बारसे खुद्द राहुल देव बर्मन यांनी केले होते आणि त्याला कारणदेखील तसेच होते! काय होते ते कारण? आणि काय होता तो किस्सा?
रणजीत गजमेर लहानपणापासूनच दार्जिलिंग, कलकत्ता, नेपाळ, काठमांडू इथे संगीतातील विविध वाद्य वाजवत होते. तबला, गिटार आणि मादल ही त्यांची आवडीची वाद्य होती. राहुल देव बर्मन यांचे संगीत संयोजक मनोहरी सिंह एकदा कलकत्त्याला एचएमव्ही स्टुडिओमध्ये आले होते. तिथे त्यांची भेट रणजीत गजमेर (रणजीत गजमेर) यांच्यासोबत झाली. त्यांना रणजीत यांनी वाजवलेले मांदल खूप आवडले. त्यांनी रणजित यांना मुंबईत मादल हे वाद्य घेवून येण्याचे निमंत्रण दिले.
काही दिवसांनी रणजीत गजमेर (रणजीत गजमेर) मुंबईत पोहोचले आणि त्यांनी मनोहरी सिंह यांना कॉन्टॅक्ट केला. तेव्हा मनोहरी हे त्यांना आर डी बर्मन यांच्याकडे घेऊन गेले. तेव्हा देव आनंदच्या ‘हरे रामा हरे कृष्णा’ या चित्रपटाच्या म्युझिकची सेटिंग चालू होती. हा संपूर्ण चित्रपट नेपाळमध्ये चित्रित होणार होता. त्यामुळे देव आनंद आणि पंचम यांना तिथल्या फोक म्युझिकवर आधारित गाणी बनवायची होती. मनोहरी सिंह यांनी रणजीत गजमेर (रणजीत गजमेर) यांना तिथे बोलावले.
देव आनंद यांनी रणजीत गजमेर (रणजीत गजमेर) यांच्याकडील मांदल हे वाद्य पाहिले. त्यांनी विचारले ‘ये क्या है? कैसे बजता है?” त्यांनी मग मांदल वाजवायला सांगितले. हे वाद्य आपल्याकडील ढोलकी सारखे असते पण आकाराने छोटे असते. रणजीत गजमेर (Ranjit Gazmer) यांनी नेपाळचे एक लोकसंगीत मांदलद्वारे वाजवून दाखवले. सोबत एक लोकगीतदेखील गाऊन दाखवले. देव आनंद यांना ते खूपच आवडले. ते जोरात ओरडले,” धिस थिंग आय वॉन्ट!!” आर डी बर्मन देखील खूष झाले. लगेच त्यांनी आनंद बक्षी यांना बोलावून त्या धूनवर शब्द लिहायला सांगितले.
रणजीत गजमेर (Ranjit Gazmer) यांनी गायलेल्या लोकगीतातील ‘कांचा’ हा शब्द घेऊन गाणे तयार झाले. लगेच दोन दिवसांनी मुंबईच्या फेमस स्टुडीओमधील रेकॉर्डिंग रूममध्ये ते ध्वनिमुद्रित झाले. या रेकॉर्डिंगला लता मंगेशकर आणि किशोर कुमार उपस्थित होते. मनोहरी सिंह, बासु दा यांनी रणजीत गजमेरला सर्वात समोर ठेवले आणि त्याच्या मांदलला प्रॉमिनंटपणे संगीतात वापरले. या गाण्यांमध्ये प्रमुख वाद्य मांदल हेच होते. गाणे होते ‘कांची रे कांची रे…’
ते रेकॉर्डिंग संपले. आर डी बर्मन प्रचंड खूष झाले. ते शाबासकी देत रणजीत गजमेर (Ranjit Gazmer) यांना म्हणाले,”आजपासून तुझे नाव रणजीत गजमेर नाही. तुझे नाव आता ‘कांचा’! ये तुम्हारा गाना है और ये गाना अगले पचास साल तक गुंजता रहेगा!” अशा पद्धतीने रणजीत गजमेर (रणजीत गजमेर) यांचे नाव ‘कांचा’ झाले. म्युझिक इंडस्ट्रीमध्ये त्यांना सर्वजण आजदेखील ‘कांचा भाई’ या नावानेच ओळखतात. आशा भोसले तर अजूनदेखील त्यांना याच नावाने बोलावते!
३ ऑक्टोबर १९४१ साली दार्जीलिंग येथे जन्मलेल्या रणजीत गजमेर (Ranjit Gazmer) यांना संगीताची लहानपणापासूनच आवड होती. मांदल, व्हायब्रोफोन, तबला, ड्रम, हार्मोनियम, कि बोर्ड या सर्व वाद्यांवर त्यांचे प्रभुत्व होते. १९६६ साली ते काठमांडूला आपल्या बँड सोबत गेले. तिथे रेडिओ नेपाल आणि नेपाल रॉयल फॅमिलीने उभ्या केलेल्या म्युझिकल अकॅडमीमध्ये त्यांनी काम केलं. लुईस बँक्स यांचे वडील जॉर्ज बँक्स यांच्यासोबत देखील काम करत होते. नंतर मनोहारी सिंग यांनी त्यांना मुंबईत बोलावून घेतले आणि ते इथेच रमले.
============
हे देखील वाचा : जेव्हा दिलीप कुमारसाठी लिहिलेलं गाणं अक्षय कुमारवर चित्रित झाले!
============
काही नेपाळी सिनेमा, अल्बम्स त्यांनी स्वतंत्ररित्या स्वरबध्द केले. आशा भोसले यांनी गायलेल्या पहिल्या नेपाळी गाण्याला कांचा यांनीच स्वरबध्द केले होते. राजेश खन्ना आणि यांच्यावर चित्रित ‘अजनबी’ चित्रपटातील ‘हम दोनो दो प्रेमी दुनिया छोड चाले…’ हे गाणे तर वादकांचा संप चालू असल्याने काही मोजक्या वाद्यांसोबत रेकॉर्ड झाले होते. त्यात प्रमुख वाद्य होते मांदल आणि वादक होते ‘कांचा भाई’ अर्थात रणजीत गजमेर! (Ranjit Gazmer)