हरीकिशन गिरी गोस्वामीचा मनोजकुमार कसा झाला?
आयुष्याच्या शंभराव्या वर्षात पदार्पण केल्यानंतर शतक पूर्ण व्हायच्या काही महिने आधीच एक्झिट घेतलेल्या अभिनेता दिलीप कुमार (Dilip Kumar) यांचे भारतीय सिनेमातील योगदान फार मोठे आहे. त्यांच्या नावाशिवाय भारतीय सिनेमाचा इतिहास लिहिलाच जाऊ शकत नाही. पंचावन्न वर्षाच्या कारकिर्दीत दिलीप कुमार यांनी अवघे ६० ते ६२ चित्रपट केले. ते आपल्या भूमिकांबाबत अतिशय चुझी होते. दिलीप कुमार खऱ्या अर्थाने अभिनयाचे व्यासपीठ होते. (Dilip Kumar)
त्यांचा अभिनय पाहून अनेक जण चित्रपटात आले आणि त्यांच्या अभिनयाची कॉपी करत अनेक कलाकारांनी आपली कारकीर्द इथे घडवली ही वस्तुस्थिती आहे. आजच्या तरुण पिढीतील कलाकार देखील जेव्हा आपला आदर्श दिलीप कुमार (Dilip Kumar) आहे असे सांगतात तेव्हा दिलीप कुमारच्या कार्यकर्तृत्वाची साक्ष पडते !
एक मुलगा तर दिलीप कुमार (Dilip Kumar) यांचे चित्रपट पाहून इतका भारावून गेला की त्याने वयाच्या १२ व्या वर्षीच असे मनोमन ठरवले की जर उद्या मी चित्रपटात गेलो तर दिलीप कुमार (Dilip Kumar) सारखाच अभिनय करेन आणि दिलीप कुमारच्याच एखाद्या कॅरेक्टर चे नाव स्वतःसाठी वापरेन. त्याने केले देखील तसेच! हा कलाकार होता अभिनेता मनोज कुमार. मनोज कुमारचे खरे नाव हरीकिशन गिरी गोस्वामी. मग त्याचे मनोज कुमार हे नाव कसे झाले? त्याचाच हा इंटरेस्टिंग किस्सा !
अभिनेता मनोज कुमार यांचा जन्म २४ जुलै १९३७ रोजी आज पाकिस्तानात असलेल्या अबोटाबग इथे झाला. (हेच ते अबोटाबाद जिथे ओसामा बिन लादेनचा अमेरिकेने खातमा केला होता.) त्याकाळी हा भाग ब्रिटिश इंडिया नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिंसचा भाग होता. आता तो भाग खैबर पख्तून म्हणून ओळखला जातो. १९४७ साली भारताची फाळणी झाली आणि पाकिस्तानातून गोस्वामी कुटुंबीय दिल्लीत आले. तिथे काही दिवस ते निर्वासितांच्या छावणीत रहात होते. (Dilip Kumar)
लहान असलेल्या हरीकिशन गिरी गोस्वामीला आयुष्यात पहिला चित्रपट पाहायला मिळाला दिलीप कुमार (Dilip Kumar) आणि नूरजहाँचा ‘जुगनू’. आयुष्यात पाहिलेला हा पहिला चित्रपट त्याला इतका आवडला की त्याने त्याची पारायणं केली. परंतु प्रत्येक वेळी चित्रपट पाहिल्यानंतर तो घरी रडत रडत यायचा. कारण या चित्रपटातील नायकाचा चित्रपटाच्या शेवटी मृत्यू होतो हे त्याला आवडत नसे. घरचे त्याला सांगायचे अरे हे सर्व खोटं असतं. पण लहानग्या पोराला यातलं काही पटत नसे. (Dilip Kumar)
पुढे १९४८ साली दिलीप कुमारचा ‘शहीद’ हा चित्रपट आला. हा चित्रपट देखील लहान गोस्वामीने पाहिला. त्याला हा चित्रपटसुद्धा खूप आवडला. परंतु पुन्हा तेच. या चित्रपटाच्या शेवटी देखील दिलीप कुमारच्या कॅरेक्टरला शहीद होताना दाखवले होते. त्यामुळे हा पुन्हा हळवा झाला. पण या हळवेपणातूनच दिलीप कुमार (Dilip Kumar) सोबतचे त्याचे नाते आणखी गहिरे झाले.
१९४९ साली दिलीप कुमारचा ‘शबनम’ हा चित्रपट आला. या चित्रपटात मात्र दिलीप कुमारच्या कॅरेक्टरचा मृत्यू होत नाही. ही एक प्रणय कथा होती. नायिका कामिनी कौशल होती. (या सिनेमात दिलीप कुमारने जी बॅग आपल्या खांद्याला लटकवली होती ती बॅग इतकी सुप्रसिद्ध झाली की त्या बॅग ला शबनम बॅग असे म्हणू लागले! पुढे साहित्यिक, कवी, पत्रकार यांच्या खांद्याला ही बॅग लटकलेली दिसायची!) हा चित्रपट देखील लहान गोस्वामीला खूप आवडला. (Dilip Kumar)
या चित्रपटात दिलीप कुमारच्या कॅरॅक्टरचे मनोज हे नाव त्याला खूप आवडले त्याने तिथेच ठरवले की आपण सिनेमात जर गेलो तर आपले नाव मनोज ठेवायचे आणि दिलीप कुमार (Dilip Kumar) लावतो त्याप्रमाणे मागे कुमार लावायचे ! आपले नाव करायचे मनोज कुमार!पुढे झाले सुद्धा तसेच हा मुलगा मोठा झाल्यानंतर मुंबईत आला आणि सिनेमात आल्यानंतर त्याने स्वतःचे नामकरण केले मनोज कुमार.
पन्नासच्या दशकाच्या उत्तरार्धात त्याने रुपेरी पडद्यावर पदार्पण केले पण यश मात्र साठच्या दशकातील ‘हरियाली और रास्ता’ या सिनेमापासून मिळू लागले. देशभक्तीपर चित्रपट काढण्यामध्ये मनोज कुमार कायम अग्रेसर होते. त्यामुळे त्यांचा उल्लेख भारत कुमार म्हणून देखील होतो. शहीद, उपकार, पूरब और पश्चिम, रोटी कपडा और मकान हे त्यांचे चित्रपट प्रचंड गाजले.(Dilip Kumar)
=============
हे देखील वाचा : जेव्हा दिलीप कुमारसाठी लिहिलेलं गाणं अक्षय कुमारवर चित्रित झाले!
=============
दिलीपकुमार (Dilip Kumar) यांचा त्यांच्यावर प्रचंड प्रभाव होता. दिलीपच्या गाजलेल्या ‘दिदार’ या सिनेमाच्या कथानकावर ‘दो बदन’ हा सिनेमा आला होता. ज्यात मनोजकुमार ने दिलीप कुमारने साकारलेली भूमिका केली होती. १९६८ साली ‘आदमी’ या सिनेमात दिलीप आणि मनोज पहिल्यांदाच समोरासमोर आले. दिलीप कुमारने (Dilip Kumar) जेव्हा कॅरेक्टर रोल करायचे ठरवले तेंव्हा पहिली भूमिका त्याने मनोज कुमार यांच्या ‘क्रांती’ या चित्रपटात केली होती. ज्याचा अभिनय पाहून सिनेमात काम करायचे मनोजकुमार ने ठरवले होते त्याच दिलीपकुमार ला ‘क्रांती’ (१९८१) या सिनेमात दिग्दर्शित करण्याचे भाग्य मनोजला लाभले. पुढे २०१६ साली भारत सरकारचा ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार मनोज कुमारला मिळाला होता. (Dilip Kumar)