
KBC 16 ला मिळाला पहिला’करोडपती’, पण हातातून निसटले तब्बल 7 कोटी; कोण आहे 22 वर्षीय चंद्र प्रकाश?
बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेल्या अमिताभ बच्चन यांच्या क्विझ रिअॅलिटी शो ‘कौन बनेगा करोडपती’च्या १६ व्या सीझनला अखेर पहिला करोडपती मिळाला आहे, ज्याने १ कोटीच्या योग्य प्रश्नाचे उत्तर देऊन १ कोटींची रक्कम आणि कार जिंकली. हा सीझन १२ ऑगस्टपासून सुरू झाला असून आतापर्यंत त्याचे ३२ भाग झाले प्रसारीत झाले आहेत. आतापर्यंत या गेममध्ये अनेकांनी लाखो रूपये जिंकले पण एक ही स्पर्धक १ कोटीच्या प्रश्नापर्यंत पोहोचला नव्हता. (Kaun Banega Crorepati 16 winner)

गेल्या एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांच्या समोर हॉट सीटवर 22 वर्षीय जम्मू-काश्मीरचे चंद्र प्रकाश बसला होता. चंद्रप्रकाश याने सांगितले की, तो यूपीएससीची तयारी करत आहे आणि या शोमध्ये येऊन तो खूप आनंदी आहे. केबीसी 16 चा पहिला करोडपती स्पर्धक असल्याबद्दल चंद्र प्रकाश देखील खुप खूश आहे. आणि अखेर केबीसी 16 च्या 32 व्या एपिसोडमध्ये पहिला करोडपती स्पर्धक मिळाला आहे. चंद्र प्रकाश याने हे ही सांगितले की, त्याला आतड्यात समस्या असून आतापर्यंत त्याच्यावर 8 शस्त्रक्रिया ही करण्यात आल्या आहेत.

कोणत्या देशाचे सर्वात मोठे शहर त्याची राजधानी नाही तर एक बंदर आहे, ज्याचे अरबी नाव शांततेचे निवासस्थान आहे? हा प्रश्न चंद्र प्रकाश याला 1 करोडसाठी विचारण्यात आला होता. आणि पर्यायांमध्ये सोमालिया, ओमान, टांझानिया, ब्रुनेई हे देशाचे पर्याय देण्यात आले होते. या प्रश्नाचे योग्य उत्तर तर चंद्रप्रकाश यांनी यावर अचूक उत्तर देत 1 कोटी रुपये जिंकले.(Kaun Banega Crorepati 16 winner)
=================================
हे देखील वाचा: ‘क्रिमिनल्स-चाहूल गुन्हेगारांची’ ही मालिका सोनी मराठीवर पून्हा अनुभवता येणार
=================================
7 कोटी जॅकपॉटसाठी , उत्तर अमेरिकेत 1587 मध्ये इंग्रज आई-वडिलांच्या पोटी जन्मलेले पहिले मूल कोण होते? हा प्रश्न विचारण्यात आला होता. ज्याचे व्हर्जिनिया डेअर, व्हर्जिनिया हॉल, व्हर्जिनिया कॉफी, व्हर्जिनिया सिंक हे पर्याय होते. चंद्र प्रकाश याला या प्रश्नाच्या उत्तराची कल्पना नव्हती आणि मग पराभवाच्या भीतीने त्याने खेळ सोडला. तेव्हा बिग बींनी चंद्र प्रकाश यांना उत्तर दिले तर काय होईल असा प्रश्न विचारला. त्यावर चंद्रा यांनी व्हर्जिनिया डेअर हे उत्तर दिले, जे बरोबर ठरले. जिंकलेली सर्व रक्कम आई-वडिलांना देणार असल्याचे चंद्र प्रकाश यांनी सांगितले आहे.