दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
प्राण यांची खरी जन्मतारीख कुणी शोधून दिली?
अभिनेता प्राण (Pran) यांनी हिंदी सिनेमातील सर्वात लोकप्रिय खलनायक अशी कीर्ती प्राप्त केली होती. १९४० पासून ते फिल्म इंडस्ट्री मध्ये होते. जबरदस्त अभिनय, डायलॉग डिलिव्हरीचा अनोखा अंदाज आणि नजरेतील जरब ! पन्नास आणि साठच्या दशकामध्ये त्यांनी जबरा व्हिलनगिरी केली. १९६७ सालच्या मनोज कुमारच्या ‘उपकार’ या चित्रपटापासून मात्र त्यांनी काहीसा रंग बदलला आणि खलनायकीचा रंग सोडून कॅरेक्टर रोलमध्ये शिरले. सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला पुन्हा त्यांनी काही व्हिलनच्या भूमिका केल्या पण सत्तर आणि ऐंशीच्या दशकात ते मुख्यत्वे पण आठवले जातात त्यांच्या चरित्र भूमिकांमधून.
चित्रपटांमध्ये प्राणसाठी स्वतंत्र अशा भूमिका लिहिल्या जात होत्या. हा फार मोठा गौरव होता. या काळात नायकापेक्षा अधिक मानधन प्राण (Pran) यांना मिळत असे. पडद्यावर खलनायक सादर करणारे प्राण वास्तविक जीवनात मात्र एक नेक दिल इन्सान होते. त्यांच्या याद दर्यादिलीचे कितीतरी किस्से आजही बॉलीवूडमध्ये सांगितले जातात. २०१३ साली त्यांना सिनेमातील सर्वोच्य अशा दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या जन्मदिनाचा एक मजेदार किस्सा मध्यंतरी वाचनात आला. प्राण यांना त्यांच्या जन्माची खरी तारीख कशी कळाली आणि कुणी सांगितली त्याचाच हा किस्सा आहे.
प्राण यांचा जन्म जुन्या दिल्लीतील बल्लीमारन इथे झाला होता. (असे म्हणतात मिर्झा गालिब यांचे वास्तव्य याच भागात होते.) प्राण (Pran) यांच्या जन्म दिवसाचा मोठा रंजक किस्सा आहे. त्या काळात वाढदिवस वगैरे असले प्रकार काही नसायचे त्यामुळे कित्येकांना आपली जन्मतारीख माहिती नसायची. प्राण यांना देखील आपली जन्मतारीख माहीत नव्हती. त्यांच्या आत्याने तुझा जन्म फेब्रुवारी १९२० ला झाला असे सांगितले होते. प्राण जेव्हा लाहोरला आपले ड्रायव्हिंग लायसन काढण्यासाठी आरटीओमध्ये गेले तेव्हा त्यांना तिथे त्यांची जन्मतारीख लिहायची होती. त्या काळात जन्म तारखेचा प्रूफ काही मागितले जायचं नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या आत्याने ज्या पद्धतीने सांगितले होते त्यानुसार फेब्रुवारी महिन्यातील एक तारीख निवडायचे ठरवले आणि २२ फेब्रुवारी १९२० ही तारीख तिथे नमूद केली.
नंतर प्राण (Pran) यांनी लाहोर येथे अनेक पंजाबी चित्रपटात भूमिका केल्या. त्या काळातील सिनेमॅगझिनमध्ये त्यांच्याविषयी छापून येऊ लागलं. त्यांचे इंटरव्यू येऊ लागले. एका मुलाखतीत त्यांनी आपली जन्मतारीख २२ फेब्रुवारी १९२० आहे सांगितले. योगायोगाने हे मासिक बल्लीमारन दिल्ली येथील एका व्यक्तीने वाचले. ही व्यक्ती बल्लीमारन दिल्ली येथे अनेक वर्षा पासून राहत होती आणि प्राणच्या कुटुंबियांची त्यांचे चांगले संबंध होते. प्राण यांचा जन्म झाला तेव्हा ती व्यक्ती त्यांच्या शेजारच्या घरात राहत होते. जेव्हा प्राण यांची जन्मतारीख २२ फेब्रुवारी १९२० आहे असे छापून आले तेव्हा त्या व्यक्तीला ही तारीख चुकीची आहे असे लक्षात आले कारण त्याचा मुलगा देखील त्याच दिवशी जन्माला आला होता!! म्हणून त्याने पुन्हा एकदा दिल्ली म्युनिसिपालिटीमध्ये जाऊन प्राण यांची जन्मतारीख चेक केली आणि कन्फर्म केली.
=============
हे देखील वाचा : ‘कस्मे वादे निभायेंगे हम…’ गाण्याच्या मेकिंगची भन्नाट गोष्ट!
=============
नंतर त्यांनी लाहोरला प्राण (Pran) यांना एक पत्र पाठवले आणि त्यात सांगितले की, ”तुम्ही तुमची जन्मतारीख जे सांगतात ती चुकीची आहे तुमची खरी जन्मतारीख १२ फेब्रुवारी १९२० आहे कारण त्याच दिवशी माझ्या मुलाचा देखील जन्म झाला होता. मी म्युनिसिपालिटी येथे जावून ही तारीख कन्फर्म केली आहे. कृपया तुम्ही यापुढे हीच तारीख वापरत जा कारण तीच खरी जन्मतारीख आहे. तुम्ही आम्हाला एक पत्र पाठवून त्याला दुजोरा द्या म्हणजे आम्हाला खूप आनंद होईल!” जेव्हा प्राण यांना हे पत्र मिळाले तेव्हा त्यांना खरोखरच खूप आनंद झाला.
आपली खरी जन्मतारीख कुणीतरी शोधून दिली याचा त्यांना आनंद झाला. त्यांनी एक मोठे पत्र पाठवले आणि आभार मानले. काही वर्षांनी पण स्वतः आपल्या जन्मस्थळी जाऊन पोहोचले बल्लीमारन येथील त्याच्या परिचितांसोबत त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला. अशा पद्धतीने प्राण (Pran) यांची कन्फर्म जन्मतारीख १२ फेब्रुवारी १९२० ही झाली!