दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
देव आनंद खरोखरच झीनत अमानच्या प्रेमात पडला होता?
हिंदी सिनेमाच्या दुनियेत ज्याचा उल्लेख हा कायम ‘आधुनिक ययाती’ म्हणून केला जातो; त्या देव आनंद (Dev Anand)चे आत्मचरित्र ‘रोमांसिंग विथ लाइफ’ २००७ साली प्रकाशित झाले. या आत्मचरित्रामध्ये त्याने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. त्यातील एक भन्नाट गोष्ट म्हणजे अभिनेत्री झीनत अमानवर असलेले त्याचे एकतर्फी प्रेम!
खरंतर झीनत अमानला पहिला मोठा ब्रेक देव आनंद यांनी दिला होता ‘हरे रामा हरे कृष्णा’ या चित्रपटात. १९७१ साली प्रदर्शित झालेला हा एक ब्लॉकबस्टर मूवी होता. या सिनेमात खरं तर देव आनंदच्या बहिणीची भूमिका झीनत अमानने केली होती. पण त्यानंतर देव आनंद (Dev Anand)ची नायिका म्हणून तिचे अनेक चित्रपट आले. इश्क इश्क इश्क, प्रेमशास्त्र, हिरा पन्ना, वॉरंट…. या दोघांबद्दल खमंग मजकूर छापला जावू लागला. मीडियामध्ये या दोघांच्या जवळीकते बद्दलच्या बातम्या लिहून येऊ लागल्या. अर्थात सिनेमाच्या प्रमोशनसाठी या गोष्टी गरजेच्या असल्यामुळे तसं छापून येत असावे असा सर्वांना वाटत होतं.
अभिनेता देव आनंद (Dev Anand) झीनत अमान बाबत बऱ्यापैकी सिरीयस होता. त्याने आपल्या आत्मचरित्रामध्ये याचा उल्लेख केला आहे. देव आनंदने त्यात सांगितले आहे की “Whenever and wherever she was talked about glowingly, I loved it; and whenever and wherever I was discussed in the same vein, she was jubilant. In the subconscious, we had become emotionally attached to each other. Suddenly, one day I felt I was desperately in love with Zeenat – and wanted to say so to her.” जेव्हा आणि केव्हा झीनतबद्दल कुठल्याही मॅगझीममध्ये तिच्या अभिनयाबद्दल तिच्या सौंदर्याबद्दल तिच्या एटीट्यूडबद्दल लिहिलं जायचं ते वाचून मला आतून खूप बरं वाटायचं. आमच्या दोघांबद्दल छापून आलेल्या मला बातम्या वाचून मी मनोमन खुश व्हायचो. कळत नकळत पणे मी तिच्या प्रेमात पडलो होतो.”
यानंतर साधारणता १९७५ साली देव (Dev Anand)ने तिला आपल्या मनातील भावना सांगायचे ठरवले. त्यासाठी त्याने तिला हॉटेल ताजमध्ये डिनर बोलावले. झीनतला जेव्हा फोन करून देव आनंद यांनी सांगितले तेव्हा ती म्हणाली, ”आपल्याला तर संध्याकाळी एका पार्टीमध्ये जायचे आहे!” देव म्हणाला, ”ठीक आहे. आधी आपण पार्टीमध्ये जाऊत आणि तिथून डायरेक्ट आपण ताज जाऊत.” त्याप्रमाणे दोघेही आधी पार्टीत गेले परंतु तिथे एक वेगळीच घटना घडली.
या पार्टीमध्ये राज कपूर उपस्थित होते. झीनत अमानला बघून त्यांनी तिला प्रेमाने जवळ घेतले. देव आनंद (Dev Anand)ला हे रुचले नाही. नंतर राज कपूर झीनत अमानला म्हणाला, ”हे काय? तू आज या कोणत्या कपड्यात आलीस ? तू मला म्हणाली होतीस ना मी जेव्हा तुम्हाला भेटेल तेव्हा पांढऱ्या साडीत असेल!” राज कपूरचे झीनतसोबत अधिकार वाणीने बोलणे देवला काट्यासारखे टोचत होते.
============
हे देखील वाचा : झीनत अमानने या सुपरहिट सिनेमात काम करायला दिला नकार !
============
झीनत अमान त्यावेळी राज कपूरच्या आगामी ‘सत्यम शिवम सुंदरम’ या चित्रपटात काम करणार अशी चर्चा मीडियामध्ये होती. कदाचित त्याला अनुसरूनच राज कपूर बोलत असावा. पण देव आनंदला मात्र ते सहन होत नव्हतं. तो तसाच पार्टीतून जायला निघाला. झीनतला त्याने बोलावलं. तेव्हा राज कपूर म्हणाला, ”देव तू कुठे जाऊ नकोस आणि झीनत तू देखील कुठेही जाऊ नकोस. पार्टी एन्जॉय करा.” पण देव आनंदचे मन पार्टीत लागणे शक्यच नव्हते. तो तिथून एकटाच निघून गेला. जाताना त्याने गाडीत खूप विचार केला की त्यांच्या या अधुऱ्या प्रेम कहानीला इथेच पूर्णविराम मिळाला! देवचे २००७ साली जेव्हा हे आत्मचरित्र प्रकाशित झाले. तेव्हा देव आनंद (Dev Anand)चे काहीतरी मिस अंडर स्टॅंडिंग झाले होते असे सांगितले.