Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 : सदस्यांच्या डोळ्यात धूळ फेकत प्रभूने

Tanya Mittal लवकरच अडकणार लग्नबंधनात? ब्राइडल लेहंग्यातील व्हिडिओमुळे चर्चांना उधाण…

Aetashaa Sansgiri Wedding: ‘दख्खनचा राजा’ने जुळवलेली जोडी अडकली लग्नबंधनात; एतशा-निषाद

‘खूबसूरत’; अभिनेत्री Rekha हिला पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळवून देणारा चित्रपट

लक्ष्मीकांत बेर्डेंनी Jeetendra यांच्यामुळे खाल्लेला वडिलांचा मार!

Anandi New Serial: जिद्द आणि सकारात्मकतेने आयुष्याचा सामना करणारी ‘आनंदी’

Bigg Boss Marathi 6: सहाव्या आठवड्यानंतर घराबाहेर पडताच Sachin Kumavat

VIROSH चं लग्न! विजय देवरकोंडा आणि रश्मिकाने अखेर आपल्या नात्याची

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Phullwanti Trailer: दमदार कथा,उत्कृष्ट निर्मितीमूल्य आणि नृत्य- संगीताचा नेत्रसुखद अविष्कार… ‘फुलवंती’

 Phullwanti Trailer: दमदार कथा,उत्कृष्ट निर्मितीमूल्य आणि नृत्य- संगीताचा नेत्रसुखद अविष्कार… ‘फुलवंती’
Phullwanti Marathi Movie Trailer Out
मिक्स मसाला

Phullwanti Trailer: दमदार कथा,उत्कृष्ट निर्मितीमूल्य आणि नृत्य- संगीताचा नेत्रसुखद अविष्कार… ‘फुलवंती’

by Team KalakrutiMedia 06/10/2024

‘अख्खा हिंदुस्थान गाजवला, आता पुण्याला नादावणार आपली फुला’ अशा ठसकेबाज तोऱ्यात आपल्या मनमोहक अदाकारीने, नृत्याच्या सुंदर आविष्काराने सर्वांना भुरळ पाडणारी ‘फुलवंती’ आपल्या भेटीला येतेय. तिच्या येण्याची उत्सुकता शिगेला पोहचली असतानाच ; फुलवंती’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लक्ष वेधून घेतोय. ट्रेलरमध्ये ‘फुलवंती’च्या भूमिकेतील प्राजक्ता माळी आणि प्रकांडपंडीत व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री भूमिकेतील गश्मीर महाजनी यांच्यावरून नजर हटत नाही. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून उतरलेली ‘फुलवंती’ कादंबरी, चित्रपटरूपात ११ ऑक्टोबरला आपल्यासमोर येणार आहे.(Phullwanti Marathi Movie Trailer Out)

Phullwanti Marathi Movie Trailer Out
Phullwanti Marathi Movie Trailer Out

उत्तम कथानक, नृत्य- संगीत, मराठी संस्कृती आणि पेशवेकाळातील भव्यता ; यांचा सुंदर मिलाफ असणारी ही कलाकृती रसिकांसाठी मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे. “मराठीत सिनेसृष्टीत नेहमीच उत्तमोत्तम आशयाचे चित्रपट बनतात. त्यातूनच प्रेरणा घेऊन मीही एका मराठी चित्रपटाची निर्मिती करतेय, याचा मला आत्यंतिक आनंद आहे. प्रादेशिक सिनेमे आशयघन असतात, ही बाब मला फार आवडते. एका चांगल्या संकल्पने सोबतच; ताकदीच्या कलाकारांची फौज, उत्तमोत्तम तंत्रज्ञ, संवेदनशील दिग्दर्शन आणि वेगळ्या धाटणीचा तरीही कौटुंबिक असणारा ‘फुलवंती’ हा चित्रपट; लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना आवडेल,”असा विश्वास प्राजक्ताने व्यक्त केला.

Phullwanti Marathi Movie Trailer Out
Phullwanti Marathi Movie Trailer Out

‘फुलवंती’ ही भारतभर किर्ती असलेली नर्तिका; कार्यक्रमाच्या निमित्तानं तिचं पुण्यात – पेशवे दरबारात येणं होतं. तिथे तिची व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री यांच्याशी भेट होते. त्यांच्या भेटीनंतर तिच्या आयुष्याला अनपेक्षित वळण लागतं.
नृत्यांगना ‘फुलवंती’ आणि प्रकांडपंडीत ‘व्यंकट शास्त्री’ यांच्यातील पैज व आव्हानावर हा चित्रपट बेतला आहे. कला व बुद्धिमत्तेतील युद्ध आपण यात पाहणार आहोत.(Phullwanti Marathi Movie Trailer Out)

=============================

हे देखील वाचा: Pani Trailer: महाराष्ट्राच्या भीषण परिस्थितीवर प्रकाशझोत टाकणाऱ्या ‘पाणी’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

=============================

या दोघांसह या चित्रपटात प्रसाद ओक, ऋषिकेश जोशी, स्नेहल तरडे, वैभव मांगले, मंगेश देसाई, जयवंत वाडकर, समीर चौघुले, चिन्मयी सुमित, सविता मालपेकर, विभावरी देशपांडे, क्षितीश दाते, गौरव मोरे, वनिता खरात, रोहित माने, पृथ्वीक प्रताप, चेतना भट,विजय पटवर्धन, सुखदा खांडकेकर, अदिती द्रविड, निखिल राऊत, दीप्ती लेले, राया अभ्यंकर आदि मराठीतील कलाकारांची फौज दिसणार आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Actor Gashmir mahajani Celebrity Entertainment Marathi Movie Phullwanti Marathi movie Phullwanti Marathi Movie Trailer Out prajakta mali
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.