ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
‘माझी ओळख ‘मदर इंडिया’ म्हणूनच रहावी’ असे नर्गीस का म्हणत ?
१९५७ साली अभिनेत्री नर्गीसने (Nargis) मेहबूब यांच्या ‘मदर इंडिया’ या चित्रपटात भूमिका केली आणि या भूमिकेला देश विदेशात प्रचंड लोकप्रियता मिळाली. भारतातर्फे ऑस्करला ‘मदर इंडिया’ हा चित्रपट पाठवण्यात आला होता. नर्गीस (Nargis) करीता हा लाईफ टाईम ग्रेट चित्रपट ठरला. हि भूमिका तिच्या रुपेरी कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट भूमिका ठरली. या चित्रपटानंतर मात्र नर्गिसने चित्रपटात काम करणे बंद केले कारण या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान लागलेल्या आगीत सुनील दत्तने तिला वाचवले होते आणि त्यानंतर हे दोघे जवळ आले होते.
हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधीच दोघांनी लग्न केले होते आणि त्यावेळी तिने या पुढे चित्रपटात काम न करण्याचा निर्णय घेतला होता. केवळ हातात असलेले चित्रपट तिने पूर्ण केले होते. पण ‘मदर इंडिया’ च्या अभूतपूर्व यशानंतर देशभरातील चित्रपट निर्माते नर्गिसला (Nargis) आपल्या चित्रपटात काम करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर्स देत होते. ईव्हीएम प्रोडक्शनचे ए व्ही मय्यप्पन यांनी तर नर्गिसला भेटून पुढच्या त्यांच्या आगामी चित्रपटात काम करण्यासाठी मोठे आमिष दाखवले.
या चित्रपटाचे बजेट जेवढे होते तेवढीच रक्कम ते नर्गिसला मानधन म्हणून देणार होते! जर हा चित्रपट पूर्ण झाला असता आणि एवढे पैसे जर नर्गीसने (Nargis) घेतले असते तर तो एक रेकॉर्ड झाला असता! कारण त्या काळात अभिनेत्रीला अभिनेत्या पेक्षा पैसे कमीच मिळायचे कधीकधी मात्र अभिनेत्या एवढेच पैसे देखील मिळायचे. पण संपूर्ण चित्रपटाच्या बजेट इतके पैसे कधीच कुठल्याही अभिनेत्याला आणि अभिनेत्रीला मिळत नव्हते. नर्गीसने (Nargis) मय्यप्पन यांना नम्र नकार दिला.
त्यांनी त्याचे कारण विचारले असताना ती म्हणाली की, ”मी माझ्या प्रेक्षकांच्या मनात एक ‘मदर इंडिया’ म्हणूनच राहू इच्छिते. माझ्या नावावर तोच रेकॉर्ड पुरेसा आहे. तुमच्या चित्रपटात काम केल्यानंतर सर्वाधिक पैसे घेणारी अभिनेत्री अशी माझी ओळख निर्माण होईल जी मला नको आहे! मी माझ्या कामामुळे लोकांच्या लक्षात राहायला हवे, नाही की दामामुळे! त्यामुळे मय्यप्पन साहेब मी आपला चित्रपट करू शकत नाही. मला माफ करा!” मय्यप्पन साहेबांनी देखील नर्गिसचा (Nargis) हा ग्रेटनेस पाहून तो चित्रपटात बनवणे बंद केले.
नर्गिसला (Nargis) ‘मदर इंडिया’ या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यावर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला. त्या काळातील फिल्म इंडिया या सिने मासिकात संपादक बाबूराव पटेल यांनी तोंडभरून कौतुक केले. डिसेंबर १९५७ च्या अंकात त्यांनी लिहिले “the greatest picture produced in India” and wrote that “no other actress would have been able to perform the role as well as Nargis”. त्या काळात परदेसी, लाजवंती, घरसंसार आणि अदालत या सिनेमात नर्गिस (Nargis) काम करत होती.
‘परदेसी’ हा चित्रपट भारत आणि रशिया यांच्या सौजन्याने बनला होता. या सिनेमाचे कथानक पंधराव्या शतकातील होते. एक रशियन पर्यटक भारतात आल्यावर त्याचे इथल्या ग्रामीण भागातील मुलीवर प्रेम जडते असे कथानक होते. हा सिनेमा के ए अब्बास यांनी दिग्दर्शित केला होता. नरेंद्र सुरी दिग्दर्शित ‘लाजवंती‘ या सिनेमात तिचा नायक बलराज सहानी होता. या सिनेमाला संगीत सचिनदा यांचे होते. व्ही एम व्यास दिग्दर्शित ‘घर संसार’ हा सिनेमा १९५८ साली प्रदर्शित झाला. यात नर्गीस सोबत बलराज सहानी आणि राजेंद्रकुमार यांच्या भूमिका होत्या. (Nargis)
=============
हे देखील वाचा : “मी दुसरी नर्गीस तयार करेन!” असं दिग्दर्शक मेहबूब का म्हणाले?
=============
प्रदीपकुमार सोबतचा ‘अदालत’ हा नर्गीसचा (Nargis) सिनेमा मदनमोहन यांच्या संगीतासाठी आठवला जातो. हे सिनेमे तिने हात वेगळे केले आणि पूर्णपणे सुनील दत्तच्या पाठीशी उभी राहिली.राजकपूर सोबतचा तिचा भूतकाळ तिने स्वत:च्या हाताने पूसून टाकला. अजंता आर्ट्स हि सुनील दत्तची चित्रपट निर्मिती संस्था केवळ तिच्या मुळे उभी राहू शकली. साठच्या दशकात तिच्या भावाची निर्मिती असलेल्या ‘रात और दिन’ या चित्रपटात तिने डबल रोल केला. या भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर आणि राष्ट्रीय असे दोन्ही पुरस्कार मिळाले! (Nargis)