‘उदे गं अंबे… कथा साडेतीन शक्तिपीठांची’ मालिकेने रचला नवा विक्रम
स्टार प्रवाहवर नुकत्याच सुरु झालेल्या ‘उदे गं अंबे… कथा साडेतीन शक्तिपीठांची’ मालिकेला पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. पहिल्या दिवशी ४.५ टीव्हीआर मिळवत उदे गं अंबे ही मालिका टेलिव्हिजनच्या इतिहासात सायंकाळी ६.३० वाजता सर्वोच्च टीव्हीआर मिळवणारी एकमेव मालिका ठरली आहे. देवी आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठं ही महाराष्ट्रवासियांची असीम श्रद्धास्थानं. महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात साडेतीन शक्तिपीठांपैकी कुठल्या ना कुठल्या देवीचं कुलदेवता म्हणून पूजन केलं जातं. ही आदिशक्ती आईप्रमाणे कुटुंबाचं रक्षण करते. आपल्या कुटुंबासाठी पूजनीय असलेल्या या आईसमान देवीचं महात्म्य आणि इतिहास सविस्तरपणे आणि रोचक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न उदे गं अंबे…कथा साडेतीन शक्तिपीठांची या भव्यदिव्य पौराणिक मालिकेतून करण्यात येत आहे.(Ude Ga Ambe Katha Sadein Shaktipeethanchi Serial)
सुप्रसिद्ध अभिनेता देवदत्त नागे या मालिकेत भगवान शिवशंकर साकारत आहे. उदे गं अंबे कथा साडेतीन शक्तीपीठांची या मालिकेला मिळणाऱ्या प्रेमाविषयी भावना व्यक्त करताना देवदत्त नागे म्हणाले, ‘देवीच्या आशीर्वादामुळेच हा इतिहास घडवू शकलो. मालिकेला भरभरुन प्रेम दिल्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राचे आभार. प्रेक्षकांपर्यंत मालिकेच्या निमित्ताने साडेतीन शक्तीपीठांची गोष्ट पोहोचवण्याची संधी मिळत आहे हे मी माझं भाग्य समजतो. शिव-शक्तीचं नातं अतूट आहे. जिथे शिव आहे तिथे शक्ती आहे. त्यामुळे साडे-तीन शक्तीपीठींच्या या गोष्टीमध्ये शिवशंकराचे नेमके कोणते अवतार होते आणि त्यामागे नेमकी कोणती कथा दडली आहे हे या मालिकेतून साकारण्याचा प्रयत्न असेल.’
या भव्यदिव्य मालिकेत आदिशक्तीची रुपं साकारत आहे अभिनेत्री मयुरी कापडणे. मयुरीची देवीवर प्रचंड श्रद्धा आहे. योगायोगाने कोल्हापुरच्या अंबाबाईचं दर्शन घेत असतानाच मयुरीला आदिशक्तीचं रुप साकारण्यासाठी विचारणा झाली. हा दैवी अनुभव असल्याची भावना मयुरीने व्यक्त केली. मी पहिल्यांदाच पौराणिक मालिकेत काम करतेय. सगळ्यात महत्त्वाचं माहुरची देवी रेणुका, कोल्हापुरची देवी अंबाबाई, तुळजापुरची देवी भवानी, वणीची देवी सप्तशृंगी, सती, पार्वती ही देवीची वेगवेगळी रुपं मी साकारणार आहे. मी जेव्हा स्वत:ला देवीच्या रुपांमध्ये पाहिलं तेव्हा माझाच माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. हा देवीचाच आशीर्वाद आहे असं मला वाटतं अशी भावना मयुरी कापडणेने व्यक्त केली.(Ude Ga Ambe Katha Sadein Shaktipeethanchi Serial)
==============================
हे देखील वाचा:
==============================
उदे गं अंबे मालिकेत लवकरच माहुरच्या रेणुकामातेच्या अवताराची गोष्ट पाहायला मिळणार आहे. तेव्हा न चुकता पाहा उदे गं अंबे कथा साडे तीन शक्तिपीठांची सायंकाळी ६.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर पाहता येईल.