पुरुषाच्या रूपातील मीनाक्षीने कुणाला घाबरवले?
चित्रपट चित्रीकरणाच्या वेळी काही गमतीशीर घटना घडतात. या घटना आज देखील पुन्हा वाचल्या तर मनोरंजक वाटतात. त्यातलीच ही एक घटना. दिग्दर्शक बी सुभाष ऐंशीच्या दशकामध्ये ‘आंधी तुफान’ नावाचा चित्रपट दिग्दर्शित करीत होते. हा सिनेमा मल्टीस्टारर होता. यात शत्रुघ्न सिन्हा, मिथुन चक्रवर्ती, हेमा मालिनी, शशी कपूर, मीनाक्षी शेषाद्री (Meenakshi) यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या सिनेमाचे बरेचसे शूटिंग नेपाळमधील काठमांडू येथे झाले होते.
त्या काळात काठमांडू येथे कॅसिनोची जबरदस्त हवा होती , क्रेझ होती. जगभरातील पर्यटक केवळ कॅसिनो खेळण्यासाठी काठमांडू येथे येत असत. साहजिकच ‘आंधी तुफान’ या सिनेमाचे जेव्हा शूटिंग चालू होतं तेव्हा यातील काही कलाकारांना आणि टेक्निशियन यांना कॅसिनो खेळायचे होते. काहीना कॅसिनो क्लब पाहायचे होते. त्या पद्धतीने त्यांनी तिथल्या लोकल गाईडला याबाबत विचारले. त्याने कॅसिनोबद्दल भरपूर माहिती सांगितली.
सर्वांची उत्सुकता खूपच वाढली. ही सर्व चर्चा अभिनेत्री मीनाक्षी (Meenakshi) शेषाद्री देखील ऐकत होती. तिची देखील कॅसिनोबाबत उत्सुकता खूपच वाढली. तिने तसे आपल्या सहकाऱ्यांना बोलून दाखवले. आणि मी सुध्दा कॅसिनो क्लब मध्ये येणार हा हट्ट करू लागली. परंतु तिच्या सहकाऱ्यांनी एका मुलीने कॅसिनो मध्ये येणे योग्य नाही आणि तिथल्या काही गोष्टी तिने पाहणे योग्य नाही असे सांगितले.
आता असं सांगितल्यानंतर मीनाक्षीचा आणखी उत्साह वाढला. परंतु तिच्या सहकार्याने तिला सोबत घेऊन जाण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. मीनाक्षी (Meenakshi) हिरमुसून होऊन आपल्या रूमवर आली. तिचा मूडच गेला. परंतु तिचे मेकअपमन आणि त्यांनी डॅनी डेंज्झपा मेकअपमन तिच्याकडे आले आणि नाराजीचे कारण विचारले. तिने कारण सांगितल्यावर ते हसले आणि म्हणाले, ”तुला तुझ्या सहकाऱ्यांनी जर नकार दिला असला तरी तू कॅसिनोला जाऊ शकतेस!” मीनाक्षी (Meenakshi) आनंदाने ओरडली, ”कसे काय?” त्यावर मेकअप मन म्हणाले, ”आम्ही तुला मुलाचा मेकअप करतो तू मुलगी म्हणून जाणारच नाही तर एक मुलगा बनून कॅसिनो जा.. बिनधास्त!” त्यांची हि भन्नाट आयडिया तिला खूप आवडली.
ताबडतोब त्यांनी मीनाक्षीला मुलाचा मेकअप करायला सुरुवात केली. आणि काही तासातच मीनाक्षी (Meenakshi)आता एक मुलगा बनली! तिने जेव्हा आरशात स्वतःकडे पहिले तेंव्हा तिला खूप आश्चर्य वाटले. कारण तिचा कम्प्लीट मेक ओव्हर झाला होता. परंतु तोपर्यंत तिचे सहकारी कॅसिनो निघून गेले. आता काय करायचे? एकटीने कॅसिनोला जाणे शक्य नव्हते. तेव्हा तिने एक आयडिया करायची ठरवले.
त्या ज्या हॉटेलमध्ये उपस्थित होत्या तिथल्या महिला सहकलाकारांची गंमत घ्यायची तिने ठरवले. त्यात पहिल्यांदा ती अभिनेत्री काजल किरण हिच्या रूमकडे गेली. एक हँडसम पण अनोळखी तरुण आपल्याकडे येतोय प्रचंड घाबरली तिने दारच उघडले नाही! नंतर ती शेजारच्या हेमामालिनीच्या रूम मध्ये गेली तिथे ईशा देओल जी केवळ चार वर्षाची होती ती देखील खूप घाबरली आणि पटकन आत आईला बोलवायला गेली.
एक अनोळखी तरुण आपल्या रूममध्ये घुसला आहे हे पाहून हेमामालिनी देखील खूप घाबरली आणि तिने ताबडतोब सिक्युरिटीला फोन करायला सुरुवात केली. हेमाने आरडा ओरडा करायला सुरुवात केली. तेंव्हा मीनाक्षी तिच्या जवळ जावून हसायला लागेली. आता मात्र लहानग्या इशा देओल ने मीनाक्षीचे (Meenakshi) खरे रूप ओळखले आणि तिने आईला सांगितले,” घाबरू नकोस हा मुलगा नाही तर ही तर मीनू दिदी आहे. तेव्हा कुठे हेमा मालिनीचा जीव भांड्यात पडला!”
==================
हे देखील वाचा : जेव्हा सुपरहिट ‘शोले’ सिनेमाला फक्त एकच फिल्मफेअर ॲवार्ड मिळाले!
==================
जाता जाता थोडंस : या ‘आंधी तुफान’ या सिनेमा बद्दल. हा सिनेमा म्हणजे ‘शोले’ या सिनेमाची भ्रष्ट नक्कल होता. कारण शोलेची थीम जरी घेतली असली तरी बाकी सिनेमा निव्वळ बकवास होता. या तब्बल दोन डझनहून अधिक कलावंत होते. शशी कपूर, हेमा मालिनी , शत्रुघ्न सिन्हा, मिथुन चक्रवर्ती, मीनाक्षी, (Meenakshi) डॅनी डेंज्झपा, मजहर खान, काजळ किरण, राजकिरण,ओम शिवपुरी, सुलोचना, माणिक इराणी,तेज सप्रू, पेंटल, जगदीश राज, दुलारी,सुधीर, सज्जन, पिंचू कपूर… बप्पी लहरी यांचं संगीत होते. संपूर्ण मसाला ठासून भरला होता पण कलाकारांच्या भाऊ गर्दीने सिनेमाची पटकथा आणि दिग्दर्शन याने हा सिनेमा पार झोपला होता. २२ मार्च १९८५ या दिवशी हा सिनेमा रिलीज झाला.