दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
या गाण्याबाबतचा निर्णय महिलांनी चक्क मतदान करून घेतला!
भारतीय चित्रपट संगीतातील एक महत्त्वपूर्ण नाव म्हणजे संगीतकार नौशाद (Naushad). चित्रपटाला संगीत देताना त्या गाण्यांमध्ये सिच्युएशन लक्षात घेऊन अगदी परफेक्ट भारतीय शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीत याचा आधार घेत इथल्या मातीतील अस्सल संगीत ते देत असंत. एका गाण्याच्या शूटिंगच्या वेळी मात्र दिग्दर्शकाला त्यांचे गाणे आवडले नाही आणि त्यानी दुसरे गीत बनवायला सांगितले!
संगीतकार नौशाद (Naushad) त्यांनी त्या पद्धतीने दुसरे वेगळे गाणे बनवले पण नंतर दिग्दर्शक पुन्हा कन्फ्युज झाले कोणते गाणे सिनेमात ठेवायचे? आधीचे की नंतरचे? आणि हा निर्णय मग चक्क महिलांना बोलावून घेण्यात आले. आणि सर्वांच्या सहमतीने पहिलेच गाणे फायनल झाले. मग त्या दुसऱ्या गाण्याचे काय झाले? खूप इंटरेस्टिंग असा हा किस्सा आहे.
१९६८ साली प्रदर्शित झालेल्या ‘साथी’ या चित्रपटातील एका गाण्याचा हा किस्सा आहे. साठच्या उत्तरार्धात आलेल्या या सिनेमाच्या वेळी भारतीय चित्रपट संगीतातील ट्रेंड बदलत चालला होता. संगीतामध्ये आता पाश्चात्य प्रवाह देखील येऊ लागले होते. संगीतकार नौशाद (Naushad) मात्र आपल्या भारतीय संस्कृतीला पोषक असे संगीत आपल्या चित्रपटांना देत होते. ‘साथी’ या सिनेमाचे निर्माते कृष्णस्वामी होते आणि दिग्दर्शक होते ‘श्रीधर’. चित्रपटात एक सिच्युएशन अशी होती चित्रपटाची नायिका लग्न झाल्यानंतर आपल्या नवऱ्याच्या घरी येते आणि त्यांच्या सुहाग रात्रीच्या वेळी ती आपल्या रूम मध्ये जाते. तिथे तिला कृष्णाची मूर्ती दिसते.
त्या मूर्तीला हात जोडून तिथे ठेवलेले सिंदूर आपल्या भांगेत भरते. मनोभावे देवाला नमस्कार करते आणि नायक तिथे येतो. तो तिचा हात पकडतो आणि गाणं सुरू होतं. नौशाद (Naushad) यांनी ही सिच्युएशन गीतकार मजरूह सुलतानपूरी यांना सांगितली. आणि त्यांनी त्या पद्धतीने गाणे लिहिले. गाण्याचा प्रसंग. भगवान कृष्णाची मूर्ती, एकंदरीत पावित्र्य राहण्यासाठी संगीतकार नौशाद (Naushad) यांनी तबला, बासरी आणि हार्मोनियम या मोजक्या वाद्यांचा उपयोग करून लता मंगेशकर यांच्याकडून ते गाणे रेकॉर्ड करून घेतले. भैरवी रागातील हे गाणे खरोखरच सुंदर झाले होते. गाण्याचे बोल होते ‘मै तो प्यार से तेरे मांग सजाऊंगी तेरे आंगनामें सारी उमरीया बिताउंगी…’
हे गाणे रेकॉर्ड करून नौशाद (Naushad) यांनी मद्रासला पाठवून दिले. सिनेमाचे शूट तिथेच होणार होते. तिथे चित्रपटाचे निर्माते कृष्णस्वामी आणि दिग्दर्शक श्रीधर यांनी हे गाणे ऐकले. निर्मात्याना गाणे तर आवडले. पण दिग्दर्शक श्रीधर यांना मात्र ते आवडले नाही. त्यांनी नौशाद यांना मद्रास बोलून घेतले त्यांनी सांगितले की,” मला या गाण्यांमध्ये मॉडर्न लुक पाहिजे आहे. पाश्चात्त्य वाद्यांचा वापर पाहिजे आहे. नौशाद म्हणाले, ”हे कसे शक्य आहे ? ती नायिका आपल्या सुहागरात्री भगवान कृष्णाच्या मूर्तीला नमस्कार करून आपल्या भांगेमध्ये सिंदूर भरते इथे तुम्हाला गिटार, कोंगो ड्रम कसे चालतील? “ पण श्रीधर यांनी हट्ट धरल्यामुळे नौशाद (Naushad) म्हणाले, “ ठीक आहे. तुम्ही म्हणता आहात तर मी नवीन गाणे बनवून पाठवतो.”
ते मुंबईला गेले त्यांनी मजरूह कडून दुसरे गाणे लिहून घेतले आणि त्याला पाश्चात्य शैलीत संगीत देवून मद्रासला पाठवून दिले. या गाण्यात नौशाद (Naushad) यांनी इलेक्ट्रिक गिटार, पियानो,चेलो,व्हायोलिन्स, कोंगो यांचा मुबलक वापर केला होता.मद्रास ला ही दोन्ही गाणी ऐकल्यानंतर निर्माता दिग्दर्शक पुन्हा कन्फ्युज झाले! कोणते गाणे सिनेमात ठेवायचे ? त्यांनी पुन्हा नौशाद (Naushad) यांना मद्रासला बोलावले. नौशाद म्हणाले,” मला तर पहिलंच गाणं आवडलेलं आहे.” पण सर्वांचं एकमत होत नव्हतं. तेव्हा नौशाद यांनीच तोडगा सांगितला ते म्हणाले ,” तुम्ही तुमच्या परिचयातील २५-३० महिलांना बोलवा त्यांना दोन्ही गाणी त्यांना ऐकवा. त्याची सिच्युएशन सांगा आणि त्यांना जे गाणे आवडेल ते गाणे आपण चित्रपटात ठेवूत.”
============
हे देखील वाचा : संगीतकार रोशन यांना आत्मविश्वास दिला होता अनिल विश्वास यांनी!
============
अशा पद्धतीने समाजातील विविध स्तरातील महिलांना बोलवण्यात आले. त्यांना दोन्ही गाणे ऐकवण्यात आली. सिच्युएशन सांगण्यात आली. शंभर टक्के महिलांनी पहिल्या गाण्याला पसंती दिली. अशा पद्धतीने पहिले गाणे चित्रपटात राहिले! मग दुसऱ्या गाण्याचं काय करायचं? नौशाद म्हणाले ,”काही काळजी करू नका. चित्रपटात आणखी एक सिच्युएशन तयार करू. “ नवीन प्रसंग क्रियेट केला. मग सिम्मी गरेवाल वर गाणे चित्रीत झाले या गाण्याचे बोल होते ‘मेरे जीवन साथी कली थी मै तो प्यासी….’