Mukesh : निर्मळ मनाच्या मुकेशच्या प्रेमाचा भावस्पर्शी किस्सा!
अमिताभ आणि जितेंद्र हे दोघे या एकाच सिनेमात एकत्र चमकले!
अमिताभ बच्चन आणि जितेंद्र (Jeetendra) सत्तर आणि ऐंशी च्या दशकातील दोन यशस्वी आणि बॉक्स ऑफिसवर प्रचंड कलेक्शन करून देणारे कलाकार. पण हे दोघे संपूर्ण सिनेकारकिर्दीत फक्त एका चित्रपटातच एकत्र आले होते! असं का घडलं होतं? नंतर पुन्हा हे एकत्र का आले नाहीत? आणि कोणता होता या दोघांचा एकमेव चित्रपट? याचं उत्तर शोधायचं तर बरंच मागे जावं लागेल.
१९७३ साली ‘जंजीर’ प्रदर्शित झाल्यानंतर हा सिनेमा आला होता. पण जंजीरच्या यशाचा याला काही फायदा झाला नाही. अमिताभ बच्चन आणि जितेंद्र (Jeetendra)पहिल्यांदा एकत्र आले होते. चित्रपट होता श्रीधर दिग्दर्शित ‘गहरी चाल’ हा एक सस्पेन्स फॅमिली ड्रामा होता. ज्यामध्ये अमिताभ बच्चनचा रोल निगेटिव्ह शेडचा होता. या चित्रपटात अमिताभ बच्चनने हेमा मालिनीच्या भावाची भूमिका केली होती! चित्रपटाला फारसे यश मिळालं नाही. अमिताभ आणि जितेंद्र या दोघांचे जोडी पुन्हा कधीच एकत्र आली नाही.
‘गहरी चाल’ हा चित्रपट २७ जुलै १९७३ रोजी प्रदर्शित झाला. अमिताभ बच्चनच्या फ्लॉप चित्रपटांच्या रांगेतील हा एक चित्रपट ठरला. पण तोपर्यंत जितेंद्र (Jeetendra) एक टॉप स्टार म्हणून ओळखला जात होता. त्याचे तोवर पाच सिनेमे सुपरहिट ठरले होते. फर्ज, जीने की राह ,जैसे को तैसा, कांरवा आणि वारीस! ११ मे १९७३ रोजी ‘जंजीर’ प्रदर्शित झाला आणि अमिताभ बच्चनचे स्टार बदलले, अँग्री यंग मॅन या विशेषणाने तो आता गाजू लागला. तिथून पुढे अमिताभने कधीही मागे बघितले नाही. अमिताभचा उदय हा राजेश खन्नाच्या ‘रोटी’ या चित्रपटाच्या नंतर आणखी मोठ्या प्रमाणावर दिसू लागला. राजेश खन्नाचे सुपरस्टार पद अलगदपणे अमिताभ बच्चनच्या हाती आले.
या काळात जितेंद्र, विनोद खन्ना, धर्मेंद्र यांची एक समांतर कारकीर्द चालू होती. जितेंद्र (Jeetendra) यांच्या चित्रपटाचा जॉनर वेगळा असायचा. ते एका सॉफ्ट रोमँटिक इमेज मध्ये पडद्यावर अवतरत. कौटुंबिक सिनेमा/ प्रेमपट हा त्याच्या सिनेमाचा आत्मा होता. त्यामुळे अनेक म्युझिकल सिनेमे त्याच्या नावावर आहेत. तिकडे अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटाचा साचा आता ठरला होता. या चौकटीत आता अमिताभ आणि जितेंद्र एकत्र येणं शक्य नव्हतं. तरी १९७८ साली दिग्दर्शक दुलाल गुहा यांनी या दोघांना घेऊन ‘पानी’ या चित्रपटाची निर्मिती सुरू केली होती. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे या चित्रपटाला संगीत होतं. पण काही कारणाने हा चित्रपट डब्यात गेला.
त्यानंतर पुन्हा या दोघांना एकत्र येण्याचा योग आला नाही. १९८४ साली अमिताभ बच्चन राजकारणात गेले. १९८२ साली जितेंद्र निर्मित दिदार ए यार या चित्रपटाला फार मोठे अपयश लाभले होते. त्यामुळे जितेंद्रने (Jeetendra) साऊथ कडील सिनेमात काम करण्याचा सपाटाच लावला. साऊथ कडील अनेक गाजलेल्या रिमेक सिनेमांचा तो नायक होता. तिकडे सिनेमे कमी वेळात बनत. ‘हिम्मतवाला’ पासून सुरू झालेल्या त्याचा हा प्रवास ऐंशीच्या दशकाच्या अखेरपर्यंत चालू होता. या काळात अमिताभ बच्चन राजकारणात गेल्यामुळे हिंदी सिनेमाला मरगळ आली होती. पण साउथ कडील जितेंद्रचे चित्रपट ज्यात त्याच्या सोबतीला श्रीदेवी आणि जयाप्रदा असायच्या, संगीत बप्पी लहरी यांचे असायचे. हे सर्व सिनेमे सुपर डुपर हिट होत होते.
१९८४ साली तर ‘मवाली’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतकी प्रचंड कमाई केली अमिताभ बच्चनच्या ‘शराबी’ला देखील मागे टाकले होते. जितेंद्रच्या (Jeetendra) चित्रपटाचे बजेट कमी असायचे ; पण त्यातून मिळणारे उत्पन्न मोठे असायचे पन्नास लाखात तयार झालेला आशा या चित्रपटाने तब्बल चार कोटी ची कमाई केली होती. तर दुसरीकडे दोन कोटी रुपये खर्च केलेला ‘शान’ अवघे चार कोटी रुपये कमवू शकला होता. जितेंद्रच्या चित्रपटाची यशस्वी होण्याची खात्री जास्त असायची.
जितेंद्रने २०० हून अधिक चित्रपटातून प्रमुख भूमिका केली त्यापैकी १२१ चित्रपटांना मोठे यश मिळाले. नव्वदीच्या अखेरीस पुन्हा एकदा जितेंद्र (Jeetendra) आणि अमिताभ यांना एकत्र घेऊन चित्रपट काढण्याचा प्रयत्न झाला पण तो देखील यशस्वी चित्रपट बनलाच नाही. १९८८ साली प्रदर्शन झालेल्या शहेनशहा या चित्रपटाच्या वेळी अमिताभ बच्चन गंभीर आजारामुळे चित्रपटापासून दूर होता.
===============
हे देखील वाचा : या गाण्याबाबतचा निर्णय महिलांनी चक्क मतदान करून घेतला!
===============
त्या काळातील या चित्रपटात जितेंद्रला घेण्याची विनंती केली. परंतु जितेंद्रने नम्रपणे याला नकार दिला आणि ‘या भूमिकेसाठी अमिताभ बच्चन हेच एकमेव योग्य कलाकार आहेत’ असे टिनू आनंद आणि अमिताभ बच्चन या दोघांना सांगितले. नव्वदच्या दशकानंतर जितेंद्रने (Jeetendra) चित्रपटात काम करणे कमी केले. अमिताभ बच्चन यांनी मात्र चरित्र भूमिका आणि त्यानंतर ‘कौन बनेगा करोडपती’ यामुळे प्रेक्षकांमध्ये आजही आपली लोकप्रियता अबाधित ठेवली आहे. नाही म्हणायला ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ या राष्ट्रभक्ती गीतात अमिताभ आणि जितेंद्र एकत्र आले होते.