आर.के.च्या ‘हीना’ सिनेमाचे संगीत रवींद्र जैन यांना कसे मिळाले?
आर.के.च्या ‘हीना’ सिनेमाचे संगीत रवींद्र जैन यांना कसे मिळाले?
Raj Kapoor, व्ही शांताराम, गुरूदत्त आणि Vijay Anand यांना सिनेमातील गाणी, संगीत व त्यांचे सादरीकरण याचा जबरदस्त सेन्स होता. त्यामुळे बघा यांच्या सिनेमातील गाणी अजूनही दृष्यासमवेत नजरेसमोर येतात. Raj Kapoor (Raj Kapoor) तर तासंतास संगीतकाराच्या खनपटीला बसून त्याचं समाधान होईपर्य़ंत तिथून हलत नसे. राजच्या सिनेमातील संगीत त्यामुळेच आजही तितक्याच चवीने ऐकलं जातं. १९७१ साली जयकिशन गेला आणि वीस वर्षापासूनचा त्याचा Shankar Jaykishan सोबतचा संगीताचा प्रवास थांबला. (Ankahi Baatein)
पुढे एल.पी (बॉबी, सत्यम शिवम सुंदरम,प्रेमरोग) आर के कॅम्पसमध्ये दाखल झाले. पण १९८५ सालच्या ’राम तेरी गंगा मैली’ साठी राजने Ravindra Jain यांना पाचारण करून सर्वांनाच धक्का दिला. राजच्या डोक्यात कायम सिनेमाचे विचार असायचे. त्यामुळे राम तेरी…च्या वेळेसच त्याच्या मनात पुढच्या ’हिना’ या चित्रपटाची नांदी वाजू लागली होती. या सिनेमाच्या शीर्षक गीताचा किस्सा खूप महत्वाचा या करीता आहे की, राज (Raj Kapoor) किती बारकाईने सर्व बाबींचा विचार करायचा हे यातून दिसते. राम तेरी हिट झाल्यावर ’हिना’ ला संगीत जैन यांचेच असणार हे नक्की होतं.
त्यावेळी Ravindra Jain रामानंद सागर यांच्या मेगा सिरीयल ’रामायण’ ला संगीत देत होते. एके दिवशी Ravindra Jain राज सोबत गाण्याच्या सीटींगला बसले असताना त्यांनी Ramanand Sagar यांच्या सिरीयल मधील एक नवीन गाण्याची चाल गावून दाखवली. राजला (Raj Kapoor) ती बेहद आवडली तो जैन यांना म्हणाला ’आपकी ये धुन सुनकर मेरे रोंगटे खडे हो गये’ जैन खूष झाले. पण राजच्या पुढच्याच वाक्याने त्यांचा चेहरा खर्रकन उतरला. राज म्हणाला ’लेकीन अब आप मेरी हिना का संगीत नही दे सकते!’ जैन यांना कळेचना. एक गोष्ट मात्र त्यांना नक्की कळली राजचे हे प्रोजेक्ट आपल्या हातातून गेले. निराश अवस्थेत ते घरी परतले. (Ankahi Baatein)
आठव्या दिवशी आर के मधून फोन आला ’आपको अभी राजजी के साथ श्रीनगर जाना है’. जैन निघाले. राज (Raj Kapoor) सोबत पुढचे पंधरा दिवस ते कश्मीरच्या निसर्गरम्य वातावरणात होते. पण एक चकार शब्दही सिनेमा बाबत बोलले नाही. जैन यांना तिथल्या स्थानिक लोकांशी बोलायला लावले. तिथल्या समाजासोबत राहून त्यांची गाणी, संगीत ऐकायला लावलं. सीमेवरील ग्रामीण भागात हिंडवून तिथल्या संस्कृतीची ओळख करवून दिली आणि मग मुंबईला प्रयाण केलं.
==========
हे देखील वाचा : मैने चांद और सितारोंकी तमन्ना की थी……!
==========
दुसर्या दिवशी जैन यांना बोलावून राज (Raj Kapoor) म्हणाले ’अब आपके मन से रामायण का संगीत पुरी तरहसे हट गया होगा अब आप बडे इत्मिनान के साथ ’हिना’ के म्युझिक के बारे मे सोच सकते हो’ जैन यांचा कश्मीर दौरा हा ‘हिना’ साठीचा अभ्यास दौरा होता! रामायण सिरीयल संपली तरी जैन अजूनही त्याच स्मृतीगंधात होते. हिनाचा जॉनर मात्र एकदम वेगळा होता. पहिली पाटी पुसल्याशिवाय नवं काही घडणार नव्हतं. राजच्या कल्पकतेची दाद द्यायला हवी कारण जैन यांनी एका बैठकीत लगेच ’मैं हूं खूष रंग हिना…..’ हे गाण लिहून काढलं व त्याची धून बनवून राजकडून शाबासकी मिळवली. पण दुर्दैव असे की हिनाचे यश पहायला राजच राहिला नाही.