सुबोध भावे, तेजश्री प्रधान आणि शेकडो प्रेक्षकांच्या उपस्थितीत रंगला ‘हॅशटॅग
‘गीत गाता हूं मै…’ गाण्याच्या रेकोर्डिंगचा अफलातून किस्सा!
गीतकार Dev Kohli यांनी फार जास्त गाणी लिहिली नाहीत पण जी लिहिली ती खूपच भावस्पर्शी आणि लोकप्रिय ठरली. त्यांच्या पहिल्या गाण्याचा किस्सा खूप इंटरेस्टिंग आहे. हे गाणं हरफ़नमौला Kishore Kumar (Kishore Kumar) यांनी गायलं होतं. या गाण्याच्या रेकॉर्डिंगला त्यांचे पुत्र अमित कुमार उपस्थित होते. अलीकडेच त्यांनी एका कार्यक्रमात हा किस्सा सांगितला होता. गीतकार Dev Kohli मायानगरीमध्ये साठच्या दशकाच्या उत्तरार्धात जेव्हा आले तेव्हा त्यांचा संघर्ष सुरू झाला.
एका संगीतकाराकडून दुसऱ्या संगीतकाराकडे. एका दिग्दर्शकाकडून दुसऱ्या दिग्दर्शकाकडे ते आपल्या कवितांची वही दाखवत फिरत होते. पण ब्रेक मिळत नव्हता. या दरम्यान त्यांची भेट संगीतकार Shankar Jaikishan यांच्याशी झाली. त्या काळात शंकर आणि जय किशन हे दोघे नाव जरी एकत्र लावत असले तरी वेगवेगळे काम करत होते. संगीतकार शंकर यांना Dev Kohli भेटले. देव कोहलींना शंकरने आश्वासन दिले की, ”मला जेव्हा गरज असेल तेव्हा मी नक्की तुम्हाला बोलवतो.” पण Dev Kohli यांना काम काही मिळेना. जवळपास एक वर्ष संघर्षात गेलं काम काही मिळाले नाही.
सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला एकदा Dev Kohli असेच बॉम्बे रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये गेले होते. तिथे त्यांची भेट अचानकपणे पुन्हा संगीतकार शंकर यांच्याशी झाली. त्यांनी पुन्हा त्यांना आपली ओळख सांगितली. शंकर यांनी लगेच Dev Kohli यांना विचारले की,” बरं झालं आज भेटलात. तुम्हाला मी जर एखादी ट्यून दिली तर त्यावर तुम्ही गाणे लिहू शकाल का? Dev Kohli म्हणाले, ”असला प्रकार मी कधी केला नाही. पण प्रयत्न नक्कीच करेन.” शंकर जी म्हणाले ,”ठीक आहे.” त्यावेळी संगीतकार शंकर ‘लाल पत्थर’ या चित्रपटाला संगीत देत होते. (Kishore Kumar)
हा चित्रपट एका बंगाली सिनेमाचा हिंदी रिमेक होता. राजकुमार, हेमा मालिनी, राखी गुलजार, विनोद मेहरा, अजित यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटात एक सिच्युएशनल सॉंग होते. नायक पियानोवर बसून गाणं गातो अशी सिच्युएशन होती. नायकाची भावना या गाण्यातून व्यक्त करायची होती. संगीतकार शंकर यांनी गाण्याची सिच्युएशन आणि ट्यून Dev Kohli यांच्याकडे दिली. आणि सांगितलं,” मी लंच करण्यासाठी घरी जात आहे. तोवर यावर काही गाणं लिहिता आलं तर बघा.” Dev Kohli लगेच कामाला लागले. पण काही केल्या त्यांना जमेना. (Kishore Kumar)
एकतर त्यांना टेन्शन आलं होतं कारण एवढ्या कमी वेळात गाणं कसं लिहिणार? ते सुद्धा दिलेल्या सिच्युएशनवर आणि दिलेल्या ट्यून वर. त्यांनी वाहेगुरूची मनोमन प्रार्थना केली आणि शांतपणे डोळे मिटले. हळूहळू मन एकाग्र झालं आणि मन: पटलावर शब्द उमटू लागले. ‘गीत गाता हू मै गुनगुनाता हू मै मैने हंसने का वादा किया था कभी इसलिये सदा मुस्कुराता हू मै…’ मुखडा तयार झाला होता. दुपारी चार वाजता संगीतकार शंकर स्टुडिओमध्ये आले. त्यांनी Dev Kohli ना विचारलं. Dev Kohli यांनी त्यांना गाण्याचा मुखडा दाखवला.
संगीतकार शंकरजी खूष झाले. त्यांनी सांगितलं, ”आगे बढो.” संगीतकाराची तारीफ ऐकल्यानंतर Dev Kohli यांना आणखीन हुरूप आला आणि लगेच त्यांनी पुढची तीन-चार कडवी लिहून काढली. गाणं मस्त बनवलं होतं. आता हे गाणं गाणार कोण यावर चर्चा सुरू झाली. चित्रपटात आधीच रफी आणि मन्ना डे यांनी गायलं होतं. आणि ‘लाल पत्थर’ या चित्रपटात हे गाणं एक नवोदित कलाकार विनोद मेहरा यांच्यावर चित्रित होणार होतं. त्यामुळे त्यांच्यासाठी एक वेगळा स्वर घ्यावा असे संगीतकार शंकर यांना वाटले.
त्यावेळी Kishore Kumar (Kishore Kumar) यांची चांगली चलती होती. त्यांनी ठरवले हे गाणे Kishore Kumar (Kishore Kumar) करून गाऊन घ्यायचे. त्या पद्धतीने त्यांनी Kishore Kumar यांना दुसऱ्या दिवशी रेकॉर्डिंग स्टुडिओला बोलावले. Kishore Kumar यांना फार रिहर्सल करायची गरज नसायची. संगीतकार शंकर यांनी सांगितले की या गाण्या तील ‘वादा’ या शब्दावर जरा भर द्या. Kishore Kumar यांनी विचार केला आणि ते म्हणाले, ”मी माझ्या पद्धतीने गातो. वादा हा शब्द मी वेगळ्या पद्धतीने गातो. जर तुम्हाला योग्य वाटले तर राहू द्या नसता पण तुम्ही सांगाल तसे रेकॉर्डिंग करू.”
===========
हे देखील वाचा : ‘ऐ दिल ए नादान…’ या गाण्याच्या प्रेमात बिग बी पडले होते!
===========
त्याप्रमाणे संगीतकार शंकर यांनी Kishore Kumar (Kishore Kumar) ने सांगितलेल्या पद्धतीने गाण्याची रेकॉर्डिंग सुरू केली आणि किशोरने काय भन्नाट गाणं गायलं होतं. त्याचा आवाज वादा या शब्दाला थोडासा स्लो केला होता. त्यामुळे गाण्याचं वजन इतकं जबरदस्त वाढलं आणि प्रभाव तर प्रचंड वाढला. रेकॉर्डिंग संपलं. Kishore Kumar जेव्हा बाहेर आला तेव्हा त्याने पहिल्यादा शंकर यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा पहिल्या. त्यांनी किशोरला लगेच मिठी मारली आणि म्हणाला किशोरदा तुम्ही खरोखरच ग्रेट आहात. अशा प्रकारे ‘गीत गाता हू मै गुन गुनाता…’ हे गाणे ध्वनिमुद्रित झाले. हे गाणं Kishore Kumar (Kishore Kumar)आणि Dev Kohli यांचं पहिलं गीत होतं.