किशोर कुमार यांनी संगीतकारासोबत भांडून अनुपमा देशपांडे सोबत गाणे गायले!
तबल्यावर पडणारी थाप शांत! झाकीर हुसैन यांचे निधन
आज मनोरंजन जगतातून एक मोठी आणि दुःखद बातमी आली आहे. जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांचे १५ डिसेंबर २०२४ रविवार रोजी अमेरिकेत निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७३ होते. झाकीर हुसैन हे मधल्या काही काळापासून हृदय आणि फुफ्फुसाशी संबंधित आजाराने ग्रस्त होते. त्यांच्यावर अमेरिकेतील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
झाकीर हुसैन यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि दोन मुली असे कुटुंब आहे. झाकीर हुसैन यांना अमेरिकेतील सॅनफ्रॅन्सिस्को येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते, मात्र त्यांची प्रकृती गंभीरच होती. मात्र दुर्दैवाने उपचारांदरम्यान झाकीर हुसैन यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक वर्षांपासून झाकीर हुसैन हे अमेरिकेतच वास्तव्यास होते. त्यांनी अमेरिकेचे नागरिकत्वही घेतले होते. त्यांच्या निधनामुळे भारतीय किंबहुना जागतिक संगीत विश्वावर मोठी शोककळा पसरली आहे.
झाकीर हुसैन यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर कलाकार आणि नेटकऱ्यांकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे संगीतप्रेमी आणि कलाकार हळहळ व्यक्त करत आहेत. उस्ताद झाकीर हुसेन हे तबला वादनाच्या जगात त्यांच्या अभूतपूर्व योगदानासाठी ओळखले जात होते.
झाकीर हुसैन यांनी त्यांच्या तबला वादनाच्या कलेच्या जोरावर संपूर्ण जगात मोठी ओळख कमावली. त्यांची तबल्यावर पडणारी पहिली थाप प्रेक्षकांच्या कानात प्राण भरून दयायची. तबल्यावर लीलया फिरणारी त्यांची बोटं आपल्याला मंत्रमुग्ध करून द्यायची आणि तोंडातून केवळ वाह….! एवढेच निघायचे.
झाकीर हुसैन हे एक तबलावादक म्हणून खूप महान आणि मोठे कलाकार होते. मात्र यासोबतच ते एक उत्तम माणूस देखील त्यांच्यात असणारी शांतात, नम्रपणा कायम त्यांना एक माणूस म्हणून मोठे करायची. झाकीर हुसैन यांनी बॉलिवूड आणि जगभरातील विविध भाषांच्या चित्रपटांमधील गाण्यांसाठी संगीत दिले आणि तबला देखील वाजवला होता.