किशोर कुमार यांनी संगीतकारासोबत भांडून अनुपमा देशपांडे सोबत गाणे गायले!
तो आला…त्यानं जिंकून घेतलं सारं…लक्ष्मीकांत बेर्डे
भारतात चित्रपटांची सुरुवातच मराठी असलेल्या दादासाहेब फाळके यांनी केली. त्यामुळे या मराठी सिनेसृष्टीला १०० पेक्षा जास्त वर्षांचा इतिहास आहे. या एवढ्या मोठ्या कालखंडामध्ये अनेक दिग्गज आणि प्रतिभावान कलाकार होऊन गेले, ज्यांनी आपल्या अभिनयाने या मनोरंजनविश्वाला पुढे नेले. मात्र मराठी सिनेसृष्टीचा सुवर्ण काळ होता ७०, ८०, ९० चे दशकं. या काळात तयार झालेले सिनेमे आजही सर्वोत्तम कलाकृती म्हणून गणले जातात.
याच काळात मराठी सिनेसृष्टीला एक उत्तम तारा मिळाला, ज्याने त्याच्या अभिनयाने आणि प्रतिभेने लोकांना खळखळून हसवले आणि रडवले देखील. हा तारा होता लक्ष्मीकांत बेर्डे अर्थात आपल्या सर्वांचा लाडका लक्ष्या. लक्ष्मीकांत यांनी मराठी चित्रपटांना मोठी उंची मिळवून दिली. त्यांनी त्यांच्या विनोदाने प्रेक्षकांचे अफाट मनोरंजन केले. आज याच लक्ष्मीकांत यांची २० वी पुण्यतिथी आहे. आजच्या दिवशी २००४ साली लक्ष्मीकांत यांनी या जगाचा निरोप घेतला. चला तर त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी जाणून घेऊया लक्ष्मीकांत यांच्याबद्दल अधिक माहिती.
मराठी चित्रपटांचा सुपरस्टार असे बिरुद मिळवलेल्या लक्ष्मीकांत पांडुरंग बेर्डे ऊर्फ लक्ष्या यांचा जन्म २६ ऑक्टोबर १९५४ साली झाला. त्यांचे बालपण हे मुंबईतच गेले. गिरगावातल्या कुंभारवाड्यात मोठे झाले. युनियन हायस्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. तर भवन्स कॉलजेमध्ये त्यांनी तात्यांचे उच्च शिक्षण पूर्ण केले. सुरुवातीपासूनच लक्ष्मीकांत यांना अभिनयाची आवड होती. ते नेहमीच नाटक, एकांकीका यामध्ये रमायचे. अभिनय करताना त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान आणि आनंद दिसायचा.
लक्ष्मीकांत पांडुरंग बेर्डे ऊर्फ लक्ष्या. लक्ष्मीकांत यांचा जन्म २६ ऑक्टोबर १९५४ साली झाला. त्यांचं बालपण हे मुंबईतच गेलं. गिरगातल्या कुंभारवाड्यात ते लहानाचे मोठे झाले.युनियन हायस्कूलमध्ये त्याचं शिक्षण झालं. तर भवन्स कॉलजेमध्ये त्यांनी पुढचं शिक्षण घेतलं. त्यांना सुरुवातीपासूनच अभिनयाची आवड होती. नाटक , एकांकीका यामध्ये ते रमायचे.
भाऊ बेर्डे ही बेर्डे बंधूंची एक संस्था होती, त्या संस्थेमार्फत ते कोकणात एकांकिका, नाटक करायचे. लक्ष्मीकांत यांचे चुलतभाऊ म्हणजे पुरुषोत्तम बेर्डे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘टुरटुर’ या नाटकामुळे लक्ष्मीकांत बेर्डेंना खरी ओळख आणि प्रसिद्धी मिळाली. यापूर्वी त्यांनी बरीच संगीत नाटकं, बालनाटकं केली पण, त्यांना म्हणावं तसं यश मिळतं नव्हते. मग त्यांच्या करियरला कलाटणी देणारे नाटक ठरले ‘टुरटुर’. या नाटकाने सर्वच समीकरणं बदलवली आणि लक्ष्मीकांत यांना अमाप लोकप्रियता मिळवून दिली. लक्ष्मीकांत यांनी सुरुवातीला सात वर्षं साहित्य संघात नोकरी करीत नाटकं केली.
‘टुरटुर’ या नाटकानंतर लक्ष्मीकांत यांनी ‘शांतेचं कार्ट चालू आहे’ हे नाटक केले. या नाटकामुळे त्यांना त्यांचा पहिला सिनेमा मिळाला. ‘हसली की फसली’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. मात्र काही कारणामुळं तो प्रदर्शितच झाला नाही. त्यानंतर त्यांनी ‘लेक चालली सासरला’ या सिनेमात काम केले. हा सिनेमा खूप गाजला. त्यानंतर त्यांनी ‘धुमधडाका’ हा सिनेमा केला जो तुफान गाजला. पुढे लक्ष्मीकांत यांचा चित्रपटांचा प्रवास भरधाव सुरु झाला. एका पाठोपाठ एक हिट सिनेमे लक्ष्मीकांत यांनी केले.
८०, ९० च्या काळात तर मराठी सिनेमासृष्टीमधे लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे आणि अशोक सराफ हे सुपरहिट त्रिकुट तयार झाले होते. तर दुसरे हिट त्रिकुट म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन आणि अशोक सराफ. सचिन आणि महेश कोठारे यांच्या प्रत्येक सिनेमात लक्ष्मीकांत यांची भूमिका असायचीच आणि तो चित्रपट ब्लॉकबस्टर व्हायचाच. या दोन्ही त्रिकुटाने मिळवून अनेक सुपर हिट सिनेमे दिले आणि लक्ष्मीकांत हा सगळ्यांचा लक्ष्या झाला आणि एक विनोदी अभिनेता म्हणून ओळखला जाऊ लागला.
फक्त चित्रपटच नाही तर लक्ष्मीकांत यांनी अनेक मालिका आणि नाटकांमध्ये देखील भरपूर काम केले. त्यांनी हिंदी चित्रपटांमध्ये देखील उत्तम भूमिका केल्या. आजही त्यांची हम आपके है कौन! मधील ‘लल्लू’ ही भूमिका प्रसिद्ध आहे. हिंदीमध्ये देखील लक्ष्मीकांत यांनी अनेक विनोदी भूमिका साकारल्या त्यांना फिल्मफेयरचे नॉमिनेशन देखील मिळाले होते. मराठी सिनेसृष्टीमधे मोठी ओळख मिळवलेल्या लक्ष्मीकांत यांनी हिंदीमध्ये देखील उत्तम काम करत एक प्रतिभावान अभिनेता अशी ओळख मिळवली.
लक्ष्मीकांत यांनी आपल्या विनोदाचे श्रेय त्यांच्या आईला दिले होते. लक्ष्मीकांत यांनी एका मुलाखतीमध्ये त्यांच्या आईबद्दल सांगितले होते. त्यांच्या आईचे नाव रजनी होते. त्यांचे संपूर्ण आयुष्य गरीबीत गेले. तरीही त्यांनी अफाट कष्ट करुन आपल्या मुलांना लहानाचे मोठं केले. बिकट आर्थिक परिस्थितीमुळं त्यांना कधीही आपली स्वप्न पूर्ण करता आली नाही.
मात्र याची खंत त्यांच्या चेहऱ्यावर कधीही दिसली नाही. त्या कायम हसतमुख राहायच्या. त्यांचा स्वभाव फार मिष्किल होता. अगदी लहान लहान गोष्टींमध्ये त्या आनंद शोधायच्या. आई कडूनच विनोदाचा हा वारसा लक्ष्मीकांत यांना मिळाला. त्यामुळं विनोद करण्यासाठी भव्य दिव्य डायलॉग्स असलायला हवेत असं त्यांना कधी वाटायचं नाही. त्यांनी कायम आपल्या आईसारखाच विनोद करण्याचा प्रयत्न केला.
लक्ष्मीकांत यांनी प्रेम करूया खुल्लम खुल्ला, आम्ही दोघे राजा राणी, दे दणादण, गडबड गोंधळ, अशी ही बनावाबनवी, एक गाडी बाकी अनाडी, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी, भुताचा भाऊ,हमाल दे धमाल, कुठं कुठं शोधु मी तुला, धमाल बाबल्या गणप्याची, शेम टू शेम, आयत्या घरात घरोबा, मुंबई ते मॉरिशस, येडा की खुळा, एक होता विदूषक, जिवलागा, झपाटलेला, खतरनाक, चिकट नवरा, बजरंगाची कमाल, जमलं हो जमंल, नवरा मुंबईचा, सत्त्वपरिक्षा, खतरनाक, देखनी बायको नाम्याची, मराठा बटालियन, दागिना, आधारस्तंभ , पछाडलेला आदी असंख्य चित्रपटांमध्ये काम केले.