आर.के.च्या ‘हीना’ सिनेमाचे संगीत रवींद्र जैन यांना कसे मिळाले?
वाढदिवस खास : रितेशला पहिल्याच सिनेमाच्या निमित्ताने मिळाली आयुष्याची जोडीदार
बॉलिवूडच्या मोठ्या इतिहासामध्ये आपण पाहिले तर अनेक मराठी कलाकारांनी या इंडस्ट्रीमध्ये आपले मोठे आणि अढळ स्थान निर्माण केले. अगदी दुर्गाबाई खोटे यांच्यापासून ते मृणाल ठाकूरपर्यंत अनेक मराठी कलाकार या क्षेत्रात आले आणि त्यांनी विपुल काम करत ओळख कमावली. आजच्या काळात देखील बॉलिवूडमध्ये आपला मराठी बाणा अभिमानाने मिरवणारे अनेक कलाकार काम करत आहे. यातला एक अतिशय लोकप्रिय आणि प्रसिद्ध चेहरा म्हणजे रितेश देशमुख.
बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा डंका वाजवणारा आपला मराठमोळा अभिनेता म्हणजे रितेश देशमुख. रितेशने बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारत या क्षेत्रात आपली एक मोठी ओळख निर्माण केली. एक विनोदी कलाकार म्हणून ओळख आसल्या रितेशने आपल्या विविध भूमिकांनी चतुरस्र अभिनेता अशी ओळख कमावली आहे. आज हाच रितेश त्याचा ४५ वा वाढदिवस साजरा करत आहे.
१७ डिसेंबर १९७८ रोजी लातूर येथे रितेशचा जन्म झाला. दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा असलेल्या रितेशने इंटिरियर डेकोरेशनचे शिक्षण घेतले होते. मात्र त्याचे मन या कामात कधी रमलेच नाही. त्याला अभिनयाचे क्षेत्र खुणावू लागले. या क्षेत्रात काम करण्याचा निर्धार करून रितेशने काम मिळवण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याला त्याचा पहिला सिनेमा मिळाला ‘तुझे मेरी कसम’ हा सिनेमा तर फ्लॉप झाला, मात्र त्याच्या आयुष्याची गाडी हिट झाली.
‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली. या पहिल्याच चित्रपटात रितेशला त्याची आयुष्याची जोडीदार भेटली ती म्हणजे जिनिलीया. तब्बल १० वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर रितेश आणि जिनिलीयाने लग्न केले. या जोडीकडे बॉलिवूडमधील एक बेस्ट कपल म्हणून पाहिले जाते. आज हे कपल एक आदर्श कपल म्हणून ओळखले जाते. एकमेकांची साथ, त्यांचे विचार, मुलांना दिलेले संस्कार आदी सर्वच गोष्टींबद्दल नेहमीच रितेश आणि जिनिलिया यांचे कौतुक होताना दिसते. आज रितेशच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया याच्या हटके प्रेमकहाणीबद्दल.
‘तुझे मेरी कसम’ या सिनेमात हे दोघे मुख्य भूमिकेत होते. त्याच सिनेमाच्या शूटिंगच्या निमित्ताने दोघे हैद्राबादला पोहचले होते. रितेश आणि जिनिलीया यांची पहिली भेट हैदराबाद एअरपोर्टवर झाली होती. यावेळी १६ वर्षीय जिनिलीया तिच्या आईसोबत होती. रितेश हा मुख्यमंत्र्याचा मुलगा आहे हे तिला दोन दिवस आधीच समजले होते. आता तो एवढ्या मोठ्या व्यक्तीचा मुलगा म्हटल्यावर त्याच्यात फार अॅटीट्युड असणार असे तिला वाटले.
त्यामुळे जेव्हा रितेशने तिला पाहिल्यावर तिच्याशी हातमिळवणी करण्यासाठी गेला तेव्हा तिने त्याला अॅटीट्युड द्यायला सुरुवात केली. रितेशला जिनिलीया ऑकवर्ड असल्याचे वाटले. पण जिनिलीयाच्या आईसमोर रितेश अतिशय नम्रपणे वागला. त्याने त्यांची आपुलकीने चौकशी केली. त्यानंतर सेटवरच्या लोकांशीही रितेशचे वागणे बोलणे सामान्यच होते. ते पाहून जिनिलीयाला त्याच्या चांगल्या स्वभावाची ओळख पटली आणि हळूहळू त्यांच्यात मैत्री झाली.
चित्रटपटाच्या शूटिंगनिमित्त एकत्र घालवायचे वेळ रितेश आणि जिनिलीयाने तुझे मेरी कसम या चित्रपटाचे संपूर्ण शूटिंग हैदराबाद येथे केले. शूटिंग पूर्ण झाल्यावर रितेश जेव्हा मुंबईत परतला तेव्हा तो आणि जिनिलीया एकमेकांना मिस करु लागले आणि त्यांचे एकमेकांसोबत फोनवर बोलणे सुरू झाले. यानंतर हे दोघे एकमेकांच्या प्रेमात कधी पडले ते त्यांनाच समजले नाही त्यामुळे एकमेकांना कोणी प्रपोज केले हे त्यांना अजूनही लक्षात नाही, असे दोघे सांगतात. दोघे एकमेकांना भेटण्यासाठी नेहमी कारण शोधत आणि सोबत वेळ घालवत होते.
आतापर्यंत दोघांनाही समजले होते की, ते एकमेकांच्या प्रेमात आहे. रितेशला जिनिलियाशी लग्न करायचे होते पण दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा अर्थात रितेशच्या वडिलांचा या लग्नाला विरोध होता. विलासराव हे महाराष्ट्रातच्या राजकारणाचे एक मोठे नाव होते. रितेश हिंदू आहे तर जिनिलीया ख्रिश्चन आहे. विलासरावांनी प्रथम या लग्नाला विरोध केला, असे म्हटले जाते. पण कालांतराने रितेशने त्याच्या घरच्यांची संमती मिळवली आणि जिनिलीया डिसूजा जिनिलीया देशमुख झाली.
रितेश-जिनिलीया अडकले विवाहबंधनात रितेश आणि जिनिलीयाने ३ फेब्रुवारी २०१२ रोजी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघे दोन वेळा विवाहबंघनात अडकले. त्यांचे कारण म्हणजे, जिनिलीया ख्रिश्चन आहे आणि रितेश हिंदू. त्यामुळे दोघांनी हिंदू आणि ख्रिश्चन या दोन्ही पद्धतीने विवाह थाटला. त्यांच्या रिलेशनशिपच्या काळापासून ते लग्नापर्यंत त्यांनी त्यांच्या नात्यात अनेक चढ- उतार पाहिले. मात्र दोघांनी एकमेकांची साथ सोडली नाही. आज या दोघांना दोन मुलं असून त्यांना दिलेल्या संस्कारांमुळे रितेश आणि जिनिलिया यांचे नेहमीच कौतुक होत असते.
दरम्यान रितेशने फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर मराठीमध्ये देखील उत्तम काम केले आहे. ‘लय भारी’, ‘माऊली’, ‘वेड’ आदी हिट चित्रपट त्याने मराठीमध्ये केले. यासोबतच वेड सिनेमाच्या निमित्ताने रितेशने दिग्दर्शनात देखील पाऊल टाकले आहे.