Idli Kadai : धनुषच्या ‘इडली कडाई’चं नवं पोस्टर न्या प्रदर्शनाच्या

मुकेश खन्ना यांच्या ‘त्या’ टीकेला सोनाक्षी सिन्हाने दिले सणसणीत उत्तर
बॉलिवूडमधील कलाकारांना नेहमीच विविध कारणांवरून ट्रोल केले जाते. त्यातही जर स्टार किड्स असतील तर त्यांना ट्रोल करणे खूपच सामान्य झाले आहे. कलाकार कधी कधी सार्वजनिक ठिकाणी जे बोलतात, वागतात किंवा इतर अनेक गोष्टींवरून त्यांच्यावर निशाणा साधला जातो. कधी कधी काही कलाकार या ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करतात तर कधी कधी काही कलाकार ट्रोलर्सला सणसणीत उत्तर देखील देतात.
मध्यंतरी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात पोहचली होती. या शोमध्ये तिला रामायणावर आधारित एक प्रश्न विचारण्यात आला त्या एका प्रश्नाचे ती उत्तर देऊ शकली नव्हती. त्यावरून जेष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांनी सोनाक्षीच्या वडिलांवर, ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्यावरही टीका केली आहे. एका मुलाखतीमध्ये त्यांनी याबद्दल भाष्य केले.
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत मुकेश खन्ना हे त्यांनी साकारलेली आणि अजरामर झालेली प्रसिद्ध ‘शक्तिमान’ ही भूमिका आजच्या पिढीसाठी किती महत्त्वाची आहे यावर बोलत होते. तेव्हा ते म्हणाले. “आजच्या मुलांना शक्तिमानच्या मार्गदर्शनाची खूप गरज आहे. १९७० च्या पिढीपेक्षा आजच्या काळात ही गरज जास्त आहे. कारण आजची मुलं इंटरनेटमुळे चुकीच्या दिशेने वाटचाल करत आहेत. त्यांना फक्त गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड यातच रस आहे. मला वाटते की पुढील काही दिवसांत तर आजच्या तरुणांना त्यांच्या आजी-आजोबांची नावेही आठवणार नाहीत. एका मुलीला तर हेही माहिती नव्हते की भगवान हनुमानाने संजीवनी बुटी कुणासाठी आणली होती.”

यावर सिद्धार्थने लगेच विचारले की, “तुम्ही सोनाक्षी सिन्हाबद्दल बोलत आहात का?” यावर मुकेश यांनी होकार दिला. ते म्हणाले, “हो, आणि हे त्या मुलीच्या संस्कारांच्या अभावामुळे झाले आहे. तिच्या वडिलांचे नाव शत्रुघ्न सिन्हा आहे तिच्या भावांची नावे लव आणि कुश आहेत तरी तिला रामायणाबद्दल साधी माहिती देखील नाहीये. यात कदाचित तिची नाही तर तिच्या वडिलांची चूक आहे त्यांनी तिला हे शिकवलेच नाही. ते खूप आधुनिक झाले आहे. मी जर आज खरंच शक्तिमान असतो तर आजच्या मुलांना बसवून आपली भारतीय संस्कृती आणि सनातन धर्म शिकवला असता.” त्यांच्या या टीकेला आता अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने थेट आणि स्पष्ट उत्तर दिले. तिचे तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये तिचे मत लिहीत पोस्ट केले आहे.
सोनाक्षीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले, “प्रिय सर, मुकेश खन्ना जी… मी नुकतेच तुम्ही माझ्याबद्दल आणि वडिलांबद्दल केलेले वक्तव्य वाचले. काही वर्षांपूर्वी मी एका शोमध्ये रामायणसंदर्भातील एका प्रश्नाचे बरोबर उत्तर देऊ शकले नव्हते, ही माझी नाही तर माझ्या वडिलांची चूक आहे, असे तुम्ही म्हणालात. कदाचित तुम्ही विसरलात असाल मी तुम्हाला आठवण करून देते की त्या दिवशी हॉट सीटवर दोन दुसऱ्या महिला देखील होत्या, ज्यांना त्याच प्रश्नाचे उत्तर माहीत नव्हते, पण तुम्ही फक्त माझे नाव घेतले. याचे कारणही तसे स्पष्टच आहे.
हो, मी त्या दिवशी त्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकले नाही. विसर पडणे ही एक आपल्या मनुष्याची वृत्ती आहे आणि संजीवनी बुटी कोणासाठी आणली गेली, हे मी विसरले. प्रभू श्रीराम यांनी माफ करण्याची आणि विसरून जाण्याची देखील शिकवण दिलेली आहे. जी तुम्ही सपशेल विसरल्याचे स्पष्ट दिसत आहे. प्रभू श्रीराम जर मंथराला माफ करू शकतात, कैकेयीला माफ करू शकतात आणि युद्ध झाल्यावर दृष्ट रावणाला देखील माफ करू शकतात तर तुम्हीही ही अत्यंत छोटी गोष्ट विसरू शकत नाही?
तसे पाहिले तर मला तुमच्या माफीची गरज नाही. पण माझे आणि माझे कुटुंबाच्या नाव घेत तुम्ही बातम्यांमध्ये येत आहात. तुम्ही आता ते विसरावं आणि तीच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगणे बंद करावे. असे मला वाटते. यापुढे तुम्ही माझ्या वडिलांनी माझ्यावर केलेल्या संस्कारांबद्दल काहीही बोलताना लक्षात ठेवा की याच संस्कारांमुळे तुम्ही माझ्या आणि माझ्या संगोपनाबद्दल केलेले चुकीचे घाणेरडे वक्तव्य असूनही, मी त्यांच संस्कारांमुळे तुमच्याशी आदराने बोलत आहे.”
तत्पूर्वी २०१९ साली ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये सोनाक्षीला ‘हनुमानाने संजीवनी बुटी कुणासाठी आणली होती?’ असा प्रश्न विचारला होता. त्याचे चार पर्याय देऊनही तिला उत्तर देता आले नव्हते. यावर अमिताभ बच्चन यांनीही सोनाक्षीला वडिलांचे नाव शत्रुघ्न आणि घराचे नाव रामायण असून उत्तर माहीत नाही, असे म्हटले होते.