Idli Kadai : धनुषच्या ‘इडली कडाई’चं नवं पोस्टर न्या प्रदर्शनाच्या

सासूच्या निधनानंतर अभिनेत्री पूर्वा कौशिकची भावनिक पोस्ट
आपले लाडके कलाकार नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसतात. हेच एक माध्यम आहे ज्यामुळे कलाकार आणि फॅन्स एकमेकांच्या संपर्कात राहतात. सोशल मीडियावर कलाकार त्यांच्या भावना व्यक्त करतात आणि त्यांच्या पोस्ट व्हायरल देखील होतात. आता नुकतीच मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री असलेल्या पूर्व कौशिकने देखील तिच्या इंस्टाग्रामवरून एक पोस्ट शेअर केली आहे. तिच्या सासुबाईंसाठी पूर्वाने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. सध्या ही पोस्ट कमालीची व्हायरल होत आहे.
पूर्वा अर्थात शिवा मालिकेतील शिवाने तिच्या सासूबाईंच्या निधनानंतर त्यांच्यासाठी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये पूर्वाने लिहिले, “एक नातं जन्माने परिस्थिती ने तयार होतं ते रक्ताच नातं त्याला आपण नातेवाईक नाव देतो.. हे सर्वसामान्य आहेच… पण एखादं नातं हे आपण नैसर्गिक पणे,समजून उमजून सांभाळतो त्या नात्याला काय नाव द्यायचं हे कधी मुळात मला कळलंच नाही….तसच नातं आहे हे आई तुमचं आणि माझं…खूप मन भरून आलंय डोकं जड झालंय… काय बोलावं काय करावं कळत नाहीये… मग एक जाणवलं तुम्ही आता असं काही झालं असतं तर काय केलं आता तर लिहिलं असतं! तर तसच काहीस वाटतंय….
आई मी आयुष्यात खरंच खूप काहि चांगलं केलं असावं की तुम्ही आई म्हणून माझ्या आयुष्यात आलात…. २५शी नंतर माझ्या आयुष्याच्या नवीन पर्वाला सुरुवात झाली…. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा तुमच्यासारखी स्त्री पहिली ,अनुभवली जी माझी मैत्रीण, आई , सासू ,बहीण सगळं होतं… मी खूप कधी व्यक्त झाले नाहीये … माणूस अनुभवाने समृद्ध होत जातो असं म्हणतात .. मला माझं माणूसपण जपण्यात तुमचीच साथ होती आहे आणि आयुष्यभर असेल… आता ह्या क्षणाला कसं काय कुठून बोलावं तेही कळत नाहीये…. डोळ्यासमोरून ६ वर्षांचा काळ एकदम एखाद्या एक्स्प्रेस सारखा जातोय …. खुप जास्त heavy feel होतंय… पण तुम्ही जिथे कुठे आहात तिथे एकदम छान शांत मनमोकळेपणाने रहा…
तुमच्या आवडीचे बटाट्याचे चिप्स खा … Ice cream Amul च kha… आता अडवायला येणार नाही .. हे खा ते खाऊ नका असं नाही म्हणणार…तुमच्या मझ्यासोबत च्या आठवणी कायम माझ्यासोबात ठेवणार आहे मी… माणूस म्हणून प्रवास सुरूच राहणार आहे… कळत नकळत तुमच्यासारखी होण्याचा असण्याचा प्रयत्न होत असतो.. तो करत राहणार आहे आयुष्भर…. माझ्यासोबत रहा बस….. एवढंच ….तुमची पूर्वा..”
दरम्यान पूर्वाच्या सासूबाईंचे निधन झाले असून, तिने या पोस्टच्या माध्यमातून तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी देखील कमेंट्स करत तिला धीर दिला आहे.