आर.के.च्या ‘हीना’ सिनेमाचे संगीत रवींद्र जैन यांना कसे मिळाले?
वाढदिवस खास : हँडसम आणि फिटनेस फिक्र जॉन अब्राहमचा मॉडेलिंग ते चित्रपट प्रवास
बॉलिवूडमधील अतिशय हँडसम, फिटनेस फिक्र अभिनेता म्हणजे जॉन अब्राहम. जॉनने त्याच्या अभिनयाने, त्याच्या फिटनेसने आणि त्याच्या कमालीच्या गुड लुक्सने अमाप लोकप्रियता मिळवली. बॉलिवूडमध्ये फिटनेसची क्रेझ जॉनने आणली असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. कारण जॉन त्याच्या अभिनयावर काम करतांना फिटनेसकडे देखील खूपच कटाक्षाने लक्ष देतो.
जॉनने त्याच्या २० वर्षांच्या कारकिर्दीमध्ये अनेक प्रकारच्या ताकदीच्या भूमिका साकारल्या. नायक, खलनायक, विनोदी भूमिका अशा सर्वच प्रकारच्या भूमिका लीलया साकारल्या. तो नेहमीच त्याच्या व्यावसायिक जीवनासोबतच वैयक्तिक जीवनामुळे देखील गाजला किंबहुना आजही गाजत असतो. आज जॉन त्याचा ५२ वा वाढदिवस साजरा करत आहे.
१७ डिसेंबर १९७२मध्ये जॉन अब्राहम याचा जन्म केरळमध्ये झाला होता. जॉन अब्राहम याचे वडील मल्याळी ख्रिश्चन, तर आई पारशी होती. त्यामुळे तो लहानाचा मोठा दोन्ही धर्म आणि संस्कृती शिकतच झाला. जॉनने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात मॉडेलिंगमधून केली होती. महेश भट्ट यांच्या ‘जिस्म’ या चित्रपटातून जॉनने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. या सिनेमाने त्याला अफाट लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवून दिली.
जॉन अब्राहम आज त्याचा ५२ वा वाढदिवस साजरा करत आहे. मात्र त्याचायकडे पाहून आपल्याला कोणालाच त्याच्या वयाचा अंदाज लावता येणार नाही. कारण या वयातही त्याने त्याचा फिटनेस कमालीचा जपला आहे. जॉन अब्राहमने त्याच्या करियरची सुरुवात मॉडलिंगने केली. सुरुवातीला त्याने मॉडेल म्हणून काम केले. सोबतच त्याने नोकरी देखील केली. जॉन अब्राहमने एमबीएचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी करण्यास सुरुवात केली होती. त्याला मॉडेलिंगची आवड होतीच. या दरम्यान नोकरी सांभाळून, जॉन मॉडेलिंग करत होता. तो एका मीडिया कंपनीत तो ‘मीडिया प्लॅनर’ म्हणून काम करत होता. या ठिकाणी त्याला ६५०० रुपये इतका पगार मिळायचा.
जॉनने मॉडेलिंग करत असताना काही म्युझिक व्हिडीओमध्ये देखील काम केले. यानंतर त्याला परदेशातूनही मॉडेलिंगच्या ऑफर येऊ लागल्या होत्या. हाँगकाँग, न्यूयॉर्क, लंडनसारख्या शहरांमध्ये त्याने मॉडेलिंग केली. एकीकडे त्याचे मॉडेलिंग करियर दिवसेंदिवस यशाच्या शिखरावर पोहचत होते. तर दुसरीकडे त्याला अनेक म्युझिक व्हिडीओच्या ऑफर देखील येऊ लागल्या. गायक पंकज उधास, हंसराज यांसारख्या प्रसिद्ध गायकांच्या म्युझिक अल्बममध्ये जॉनने काम केले.
मॉडेलिंग करत असतानाच त्याला अभिनयाचे क्षेत्र खुणावू लागले आणि त्याने अभिनय क्षेत्रात काम करण्याच्या दृष्टीने नमित कपूरच्या अभिनय शाळेत प्रवेश घेतला. या शाळेत त्याने अभिनयाचे धडे गिरवले. त्यानंतर दिग्गज दिग्दर्शक असलेल्या महेश भट्ट यांनी ‘जिस्म’ चित्रपटाची ऑफर दिली आणि जॉनने ती स्वीकारली. या चित्रपटानंतर जॉनचा अभिनय प्रवास सुरु झाला.
जॉनने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. २००४ मध्ये आलेल्या ‘धूम’ या चित्रपटाने त्याच्या कारकिर्दीला एक वेगळी दिशा मिळवून दिली. ‘गरम मसाला’, ‘टॅक्सी नंबर ९२११’, ‘काबुल एक्सप्रेस’, ‘सलाम-ए-इश्क’, ‘न्यूयॉर्क’, ‘शूटआउट अॅट वडाळा’, ‘मद्रास कॅफे’ असे अनेक हिट चित्रपट त्याने दिले. जॉनचा दिग्दर्शक म्हणून ‘विकी डोनर’ हा चित्रपट सुपरहिट होता. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. व्यायसायिक आयुष्यासोबतच त्याचे वैयक्तिक आयुष्य देखील कमालीचे गाजले.
जॉन अनेक अभिनेत्रींसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या मीडियामध्ये खूपच येत होत्या. त्यातही त्याचे आणि बिपाशा बसू यांचे नाते खूपच गाजले. या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. मात्र पुढे त्यांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर जॉनने प्रिया रांचल या एका बँकरसोबत गुपचूप लग्न केले.
जॉनची पत्नी प्रिया रांचलशी लव्हस्टोरी साधी मात्र रंजक आहे. जागतिक बँकेत काम केलेल्या प्रिया रुंचलची आणि जॉन अब्राहमची पहिली भेट मुंबईमधील एका जिममध्ये झाली होती. पुढे ते दोघं चांगले मित्र झाले. असे म्हणतात की, बिपाशासोबत नात्यात असताना प्रियाशी त्याची मैत्री घट्ट झाली होती. त्याचमुळे त्याचे बिपाशाशी ब्रेकअप झाले. या ब्रेकअपनंतर तेव्हा जॉन आणि प्रियामधली जवळीक अधिक वाढली.
प्रिया आणि जॉनच्या अफेअरची चर्चा असतानाच जॉनने थेट लग्न करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. जॉन अब्राहमला प्रियाचा साधेपणा आणि समजूतदारपणा खूप आवडला, म्हणूनच त्याने २०१४ मध्ये प्रियाशी गुपचूप एका खाजगी सोहळ्यात लग्न केले.
जॉन अब्राहम हा कोट्यवधींचा मालक आहे. तो जरी त्याचे आयुष्य साधे गट असला तरी त्याची संपत्ती कोट्यवधींची आहे. एका माहितीनुसार जॉन अब्राहमची एकूण संपत्ती २७० कोटी रुपये आहे. याशिवाय तो एका चित्रपटासाठी १० ते २० कोटी रुपये घेतो. पठाण या चित्रपटासाठी त्याने १० कोटी रुपये घेतल्याच्या चर्चा होत्या.
जॉन अब्राहमला आलिशान कारचे आणि बाईकचे प्रचंड वेड आहे. त्याला महागड्या कार चालवण्याची खूप आवड आहे. त्याच्या कार कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर त्यात लॅम्बोर्गिनी गॅलार्डो, R5 निसान GT-R ब्लॅक एडिशन आणि ऑडी Q3 आणि Q7 यांचा समावेश आहे. यासोबतच त्याच्याकडे अनेक मोठ्या आणि महागड्या बाइक देखील आहेत.