किसना सिनेमा फेम अभिनेत्री सांगितला तिचा कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव
बॉलिवूडमध्ये काम करावे, मोठ्या मोठ्या चित्रपटांमध्ये मुख्य कलाकार म्हणून दिसावे असे अनेकांचे स्वप्न असते. हे स्वप्न उराशी बाळगून अनेक लोकं मुंबई नावाच्या मायानगरीत येतात मात्र येतेच आल्यानंतर लगेच काम मिळेल याची अजिबातच शाश्वती नसते. अनेक वर्ष वाट पाहिल्यानंतरही काहींना यश मिळत नाही तेव्हा अनेकांना हताश होऊन पुन्हा माघारी जावे लागते.
काहींना ना तर या क्षेत्रात काम मिळवताना अनेक वाईट अनुभव देखील येतात. खासकरून मुलींना, महिलांना या बॉलिवूडमध्ये काम मिळवताना कास्टिंग काऊचचे अनेक वाईट अनुभव येतात. हे अनुभव फक्त बाहेरच्या महिलांनाच येतात असे नाही, तर इंडस्ट्रीमध्ये काम करत असलेल्या अभिनेत्रींना देखील अशा वाईट अनुभवांना सामोरे जावे लागते. असा काहीसा अनुभव अभिनेत्री ईशा शर्वानीला आला होता. नुकतेच तिने एका मुलाखतीमध्ये याबद्दल सांगितले.
अभिनेता विवेक ओबेरॉयच्या ‘किसना’ या सिनेमातील क्यूट हिरोईन तुम्हाला लक्षात असेलच. हीच अभिनेत्री ईशा शर्वानी. सध्या ईशा शर्वानी कमालीची चर्चेत आली आहे. ईशाने अनेक सिनेमात प्रमुख भुमिका साकारली होती. मात्र तिला म्हणावे तसे यश मिळाले नाही आणि ती हळूहळू इंडस्ट्रीपासून दूर झाली. एक हिट सिनेमा देऊनही ईशाला जास्त सिनेमे मिळाले नाही. नंतर ती इंडस्ट्रीतून गायब झाली. तिने स्वतःला चित्रपटापासून दूर केले. तिने असे का केले याचा खुलासा नुकताच केला. सोबतच तिने तिला आलेल्या अतिशय वाईट अशा कास्टिंग काउचचा अनुभव देखील सांगितला.
एका मुलाखतीमध्ये ईशाने सांगितले की, तिला एका अभिनेत्याने चित्रपटात काम देण्याच्या बदल्यात शरीरसुखाची ऑफर दिली होती. हे ऐकून ईशाला मोठा धक्का बसला होता. पुरुष अभिनेत्याकडून अशी अट ऐकून ती आश्चर्यचकित झाली होती आणि खूप घाबरली देखील. त्यांनतर तिने तिथून हळूहळू बाहेर पडत पळ काढला. या गोष्टीचा तिला मोठा धक्का बसला. या ऑफरवर ईशाने तेव्हा काहीच भाष्य केले नाही.
ईशाला जाणवले की आता जर नकार दिला तर त्या अभिनेत्याची प्रतिक्रिया काय असेल हे तिला लक्षात येत नव्हते. कदाचित नकार ऐकून तो बळजबरी करू शकतो असा विचार तिने केला. त्यामुळे ईशाने सावधानता बाळगत तिने तिथून निघणेच योग्य असल्याचे बघितले आणि नंतर दुसऱ्या दिवशी त्या अभिनेत्याला फोन केला आणि तिचा नकार कळवला.
या मुलाखतीमध्ये ईशा शरवानीनेही ‘किस्ना’ चित्रपट तिला कसा मिळाला हे देखील सांगितले. ती म्हणाली, ‘मी माझी आई दीक्षा सेठ हिच्यासाठी सिनेमाच्या सेटवर डीव्हीडी प्ले करण्यासाठी गेले होते. तेव्हा दिग्दर्शक सुभाष घई यांनी मला पाहिले. तेव्हा त्यांनी माझ्याबद्दल विचारणा केली. सुभाष घई माझ्या नृत्य कौशल्याने खूप प्रभावित झाले आणि त्यानंतर त्यांनी मला मुख्य भूमिका दिली.
आज ईशा अभिनयात सक्रिय नसली तरी ती सोशल मीडियावर सक्रिय आहे. ती केरळमधील तिच्या आईच्या दीक्षा सेठ यांच्या डान्स अकादमीमध्ये ती लीड डान्सर आहे.