‘त्या’ घटनेनंतर अल्लू अर्जुन मौन सोडत त्याच्यावर होणाऱ्या आरोपांचे केले
‘त्या’ घटनेनंतर अल्लू अर्जुन मौन सोडत त्याच्यावर होणाऱ्या आरोपांचे केले खंडन
काही दिवसांपूर्वी अल्लू अर्जुनाचा (Allu Arjun) बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित असा ‘पुष्पा 2: द रुल’ (Pushpa 2) हा सिनेमा मोठ्या दणक्यात प्रदर्शित झाला. मात्र या सिनेमाच्या प्रदर्शनाला गालबोट लागले आणि एक मोठी दुर्दैवी घटना घडली.
‘पुष्पा 2: द रुल’ या चित्रपटाच्या (Movie) प्रीमिअरदरम्यान हैदराबादच्या (Hyderabad) संध्या थिएटर (Sandhya Theatre) मध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत श्वास गुदमरून एका ३९ वर्षीय महिलेचा मृत्यू (Death) झाला असून, असून तिच्या ८ वर्षीय मुलाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर अभिनेता अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली. मृत महिलेच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल करत कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार थिएटरचे व्यवस्थापक, अल्लू अर्जुन आणि त्याच्या टीमविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
या संपूर्ण प्रकरणानंतर तेलंगणाचे (Telangana) मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी (CM Revanth Reddy) यांनीही अल्लू अर्जुनावर काही आरोप केले आहेत. तर एमआयएम (MIM) पक्षाचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी (Akbaruddin Owaisi) यांनी देखील अल्लू अर्जुनवर त्याचे नाव न घेता गंभीर स्वरुपाचे आरोप केले.
चेंगराचेंगरीत ३९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याचे अल्लू अर्जुनला सांगण्यात आले होते. तरीही तो चित्रपट पाहात बसला. ही घटना घडल्यानंतर आता चित्रपट चांगलाच हिट होणार, असेही अल्लू अर्जुन म्हणाला असल्याचा दावा, अकबरुद्दीन ओवैसी यांनी विधानसभेत केला. आता या सर्व आरोपवर, प्रश्नांवर अल्लू अर्जुनने मौन सोडले आहे.
अर्जुनने त्याच्या हैदराबादमधील जुबली हिल्स (Jubilee Hills) येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्याने त्याच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले. “चित्रपटाच्या प्रिमियरवेळी झालेली घटना हा एक दुर्दैवी अपघात होता. यात माझा काहीही दोष नाही. माझ्यासाठी चित्रपटगृह (Theatre) एक मंदिर आहे.” असे म्हणत त्याने त्याची बाजू मांडली आहे.
अल्लू अर्जुनने पुढे पत्रकार परिषदेमध्ये (Press Conference) सांगितले की, “हा एक अपघात होता, मी त्या महिलेच्या कुटुंबाप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो. मला कोणाला दोष द्यायचा नाही. माझे चारित्र्य खराब केले जात आहे. शिवाय माझ्याबद्दल खूप चुकीची माहिती पसरवली जात आहे. जे घडले त्याबद्दल मी माफी मागतो. तो रोड शो नव्हता, याबाबत चुकीची माहिती पसरवली जात आहे.”
अल्लू अर्जुन पुढे म्हणाला, “माझ्यावर अपमानजनक (Insult) आरोप करण्यात आले आहेत. लोकं मला मागील २० वर्षांपासून ओळखतात. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर चित्रपट हिट होईल, असे मी म्हणूच शकत नाही. मी सध्या माझे कामही करु शकत नाहीये. आणि ही वस्तुस्थिती आहे.” अल्लू अर्जुन हे सर्व बोलत असतानाच त्याला त्याच्या भावना अनावर झाल्या आणि त्याचा कंठ देखील दाटून आला होता. या पत्रकार परिषदेमध्ये तो भावनावश होऊन रडू लागला.
हे देखील वाचा : बॉक्स ऑफिसवर ‘पुष्पा’चाच ‘रूल’!
अल्लू अर्जुन त्याच्या फॅन्सबद्दल बोलताना म्हणाला, “माझे माझ्या चाहत्यांवर खूप प्रेम आहे. मृत झालेल्या महिलेच्या कुटुंबाची आणि तिच्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलाची मला काळजी घ्यायची आहे. त्यांच्यासाठी मला जे काही करता येईल ते मी नक्कीच करेन.”
दरम्यान ‘पुष्पा २ द रुल’ चित्रपटाबाबत सांगायचे झाले तर देशात या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर (Box Office) आणि संपूर्ण जगभरात कमाईचे अनेक विक्रम मोडले आहे. ‘पुष्पा २ द रुल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली असून, हा आकडा सतत वाढताना दिसत आहे. या चित्रपटाने १६ दिवसांत भारतीय बॉक्स ऑफिसवर १००० कोटींच्या (1000 crore) क्लबमध्ये प्रवेश केला आहे.