Mukesh : निर्मळ मनाच्या मुकेशच्या प्रेमाचा भावस्पर्शी किस्सा!
Yogita Chavan योगिता चव्हाणने सांताला केला खास नवस पोस्ट शेअर करत दिली माहिती
मराठी (Marathi) मालिकाविश्वातील अतिशय प्रसिद्ध जोडी म्हणजे योगिता चव्हाण आणि सौरभ चौगुले. (Yogita Chavan and Saurabh Chaugule) ‘जीव माझा गुंतला’ (Jeev Maza Guntala) या मालिकेमुळे योगिता आणि सौरभ ही जोडी संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झाली. मालिकेने बना दी जोडी असलेल्या योगिता आणि सौरभला नेहमीच प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळताना दिसते. (Yogita Chavan)
मालिकेमध्ये एकत्र काम करताना हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. मालिका संपल्यावर पुढे काही महिन्यांनी अचानक त्यांनी लग्न करत फॅन्सला आश्चर्याचा सुखद धक्काच दिला. अतिशय गुपचूप पद्धतीने त्यांनी लग्न केले आणि सोशल मीडियावर थेट फोटो शेअर केले. त्यांच्या लग्नाचे व्हिडिओ, फोटो तुफान व्हायरल झाले. (Entertainment mix masala)
त्यानंतर मराठी बिग बॉसच्या (Marathi Big Boss) पाचव्या पर्वामध्ये योगिता चव्हाण सहभागी झाली. या घरात जाणे तिच्या फॅन्ससाठी एक सुखद धक्काच होता. या घरामध्ये ती जास्त दिवस राहिली नाही. मात्र जेवढे दिवस राहिली तेवढे दिवस तिने उत्तम खेळ खेळला. तिने अर्ध्यातच मानसिक तणावामुळे हा शो सोडण्याचा निर्णय घेतला होता.
आता अचानक योगिता आणि सौरभ चर्चेत येणायचे कारण म्हणजे योगिता चव्हाणने सोशल मीडियावर शेअर केलेला एक खास व्हिडिओ. आजच्या तरुण पिढीची आदर्श जोडी म्हणून योगिता आणि सौरभ यांना ओळखले जाते. सौरभने देखील ख्रिसमस (Christmas) या सणाचे (Festival) औचित्य साधत त्याच्या बायकोसाठी योगितासाठी एक खास सरप्राईज (Surprise) प्लॅन केले होते. त्याबद्दलच योगिताने एक व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या तिचा हा व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहे.
योगिताला ख्रिसमसचा सण खूप आवडतो. त्यामुळे लग्नानंतर पहिल्यांदाच साजऱ्या होणाऱ्या या सणाच्या निमित्ताने बायकोसाठी काहीतरी खास करावे या उद्देशाने सौरभने योगितासाठी खास सरप्राईज प्लॅन केले. योगिता तिचे शूटिंग संपवून जेव्हा घरी गेली, तेव्हा सौरभने त्यांचे संपूर्ण घर ख्रिसमसच्या थीम प्रमाणे सजवले होते.
योगिताला घरी आल्यावर, दार उघडताच ही संपूर्ण सजावट पाहून एक प्रकारचा सुखद धक्काच मिळाला. ही संपूर्ण ख्रिसमसची सजावट पाहून ती खूपच खुश झाली. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि आश्चर्य आपल्याला तिने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. हे संपूर्ण सरप्राईज तिच्यासाठी खूपच खास होते. म्हणूनच योगीने सौरभचे भरभरून कौतुक करत सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.
“Christmas मला किती आवडतो हे सौरभला माहीत होतं म्हणून, मी शूटिंगसाठी बाहेर गेलेले असताना त्याने घरात असा उद्योग केला.
उद्योग म्हणजे एक मोठं सरप्राईज दिलं, ९ फुटांचं मोठं ख्रिसमस ट्री आणि इतकंच नाही तर ख्रिसमसचं डेकोरेशन (ज्यातलं खरंतर त्याला काही कळत नाही) पण मित्रांची मदत घेऊन खूप सुंदर असं डेकोरेशन घरभर केलं. आपला पार्टनर आपल्या आवडीनिवडींची (unreasonable आवडीनिवडींचा )किती काळजी घेतो हे बघून कोणालाही आनंदच होईल… आणि तो मला इतका ओळखतो की हे कॅप्शन लिहायला पण त्यानेच मदत केली
==============
हे देखील वाचा : वहिदा रहमानने संजीव कुमारला शिकवला चांगलाच धडा!
==============
PS- आता मी Santa ला नवसच करणार आहे की, पुढच्या सातजन्मात हाच नवरा मिळूदेत.”
योगिताच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत सौरभचे आणि सोबतच त्यांच्या जोडीचे देखील कौतुक केले आहे.