Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss 19: बिग बॉसच्या घरात लोकप्रिय स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे ची

Nashibvan Marathi Serial: ‘रुद्र प्रताप घोरपडे’ च्या भूमिकेत आदिनाथ कोठारेची मालिका विश्वात पुन्हा एंट्री होणार?

Parineeti Chopra आणि राघव चढ्ढा यांच्या घरी येणार चिमुकला पाहुणा!

लहानग्या Hrithik Roshan याने डान्स करून जितेंद्रची छुट्टी करून टाकली

Bahubali To KGF; साऊथच्या हिट चित्रपटांना ‘या’ मराठी कलाकांनी दिला

Inspector Zende :  मराठमोळ्या पोलिसाचं कर्तृत्व मोठ्या पडद्यावर मांडणाऱ्या चित्रपटाचा

Akshay Kumar तब्बल १७ वर्षांनंतर ‘या’ अभिनेत्यासोबत चित्रपटात एकत्र झळकणार!

जेव्हा Nagraj Manjule यांचा राष्ट्रीय पुरस्कार चोरीला गेला होता…

मराठी नाटक पाहून भारावली Tabu, कलाकारांचं केलं तोंडभरून कौतुक!

Karishma Kapoor ने ‘दिल तो पागल है’ मध्ये माधुरी दीक्षितसोबत

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Kiran Mane किरण मानेंना निळू फुलेंच्या नावाने पुरस्कार जाहीर, पोस्ट करत व्यक्त केल्या भावना

 Kiran Mane किरण मानेंना निळू फुलेंच्या नावाने पुरस्कार जाहीर, पोस्ट करत व्यक्त केल्या भावना
टीव्ही वाले

Kiran Mane किरण मानेंना निळू फुलेंच्या नावाने पुरस्कार जाहीर, पोस्ट करत व्यक्त केल्या भावना

by Jyotsna Kulkarni 26/12/2024

प्रत्येक कलाकाराला त्याच्या कामाची पोचपावती म्हणून पुरस्कार (Award) प्रदान करण्यात येतो. आपल्या कामाचे चीज आणि पाठीवरील शाबासकीची थाप म्हणून, हे पुरस्कार सतत कलाकारांना अधिक उत्तम काम करण्याची प्रेरणा देतात. त्यामुळे प्रत्येक पुरस्कार कलाकारांसाठी खासच असतो. (Kiran Mane)

असाच एक अतिशय मोठा आणि खास पुरस्कार अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांना जाहीर झाला आहे. मराठी चित्रपट आणि खासकरून मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेते असलेल्या किरण माने यांना यंदाचा अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये (Annabhau Sathe International Movie Festival) ‘निळूभाऊ फुले कलाकार कार्यकर्ता’ (Nilu Phule Kalakar Karyakrta) पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. (Entertainment mix masala)

यंदा हे पुरस्काराचे पहिलेच वर्ष (First Year) आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने किरण माने यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांची ही पोस्ट आणि या पोस्टमधून त्यांनी नाव न घेता इतर कलाकारांवर खोकच शब्दात टीका केली आहे. सध्या त्यांची ही पोस्ट खूपच गाजत आहे.

“हॅलो किरण माने सर… संदीप ससाणे बोलतोय. अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यावर्षीपासून ‘निळूभाऊ फुले कलाकार कार्यकर्ता पुरस्कार’ सुरू करतोय…पहिलाच पुरस्कार तुम्हाला द्यायचा यावर आमच्या निवड समितीचं एका क्षणात एकमत झालं. तुमच्या होकाराची अपेक्षा आहे.

काय उत्तर द्यावं सुचेनाच. आनंदानं मन भरून आलं, डोळे पाणावले. ‘अण्णाभाऊ-निळूभाऊ’ म्हणजे कलाकार म्हणून आणि माणूस म्हणून मला समृद्ध करणारे माझे आदर्श. निळूभाऊंना तर मायणीच्या तंबूत पाहिलेल्या ‘पिंजरा’पासून परिवर्तनाच्या चळवळीतल्या भाषणांपर्यंत मी वेड्यासारखं ‘फॉलो’ केलं…नंतरच्या काळात मला अल्पकाळ का होईना सहवास लाभला. चक्क सातारच्या माझ्या घरीही ते आले!

निळूभाऊंच्या नावानं पुरस्कारासारखं दुसरं सुख नाही…हे समजल्यापासून हवेत तरंगतोय…आजपर्यंत ज्या-ज्या अ‍वार्डमधून कारस्थानानं माझा पत्ता कट झाला त्या सगळ्या ट्रॉफ्यांची किंमत एका फटक्यात शून्य करून टाकणारा हा बहुमान आहे. मराठी कलाक्षेत्रात सर्वोच्च स्थानावर जे नाव आहे, त्या नावानं असलेला पुरस्कार हा मी तेवढ्याच रुबाबात आणि टेचात स्वीकारणार…कारण माझा संघर्ष मला सांगतोय… अभिनयासाठी मी खाल्लेल्या खस्ता मला सांगतायत… शिव, शाहू, फुले, आंबेडकरी विचारांचा प्रसार करतो म्हणून इंडस्ट्रीतल्या वर्चस्ववाद्यांनी माझ्या पोटावर मारलेली लाथ मला सांगतेय… त्यावेळचे माझ्या आईवडिलांच्या डोळ्यांतले अश्रू मला सांगतायत… की हो, मी हा पुरस्कार डिझर्व करतो.

निळूभाऊ, तुमच्यासमोर मी कायम नतमस्तक आहे. तुम्ही दाखवलेल्या मार्गावरून प्रवास करत राहीन…तुम्ही आणीबाणीच्या काळात नागपूरच्या चौकात निडरपणे केलेलं भाषण असो… परिवर्तनाच्या चळवळीत केलेली व्याख्यानं असो…तथाकथित धर्मांध संस्कृतीरक्षकांना झुगारून केलेले ‘सखाराम बाईंडर’चे प्रयोग असोत…’कोण म्हणतं टक्का दिला’ सारखं दलित चळवळीच्या विचारांचं नाटक प्रोड्यूस करणं असो…’अभिनेत्याला समाजभान नसेल आणि भवताली घडणार्‍या अराजकावर बोलण्याचा निडरपणा नसेल, तर त्याची कला पोकळ आणि क्षुद्र ठरते’, हे तुम्ही मला शिकवलंय आणि मी ते शंभर टक्के अंगीकारलंय. सलाम निळूभाऊ.”

किरण माने यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत त्यांचे भरभरून अभिनंदन केले आहे. दरम्यान किरण माने यांच्याबद्दल सांगायचे झाले तर त्यांनी अनेक मालिकांमध्ये भूमिका केल्या आहेत. सोबतच अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले असून, काही नाटकांमध्ये देखील ते झळकले आहेत.

काही महिन्यांपूर्वीच किरण माने यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गट (Shivsena Udhav Thackery Gat ) या पक्षात प्रवेश करत त्यांच्या राजकीय प्रवासाला (Political Journey) सुरुवात केली आहे. किरण माने हे सोशल मीडियावर कमालीचे सक्रिय असून, ते सतत विविध पोस्ट शेअर करत लोकांच्या संपर्कात राहतात.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Celebrity Celebrity News Entertainment Marathi Movie अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव किरण माने किरण माने पुरस्कार किरण माने पोस्ट निळूभाऊ फुले कलाकार कार्यकर्ता पुरस्कार
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.