Mukesh : निर्मळ मनाच्या मुकेशच्या प्रेमाचा भावस्पर्शी किस्सा!
Prathmesh Mugdha ‘अशा’ प्रकारे मिस्टर अँड मिसेस लघाटे यांनी साजरा केला लग्नाचा पहिला वाढदिवस
पण काहीही म्हणा.. सा रे ग म प लिटिल चॅम्प्स (Sa Re Ga Ma Pa Little Champs) मधील अंतिम पाच स्पर्धकांनी महाराष्ट्रावर जी जादू केली ती आजही इतक्या वर्षांनी कायम आहे. सा रे ग म प लिटिल चॅम्प्स हा शो संपून जवळपास १६ वर्ष (16 Years) झाले. हे सर्व लिटिल चॅम्प्स आता मोठे झाले आणि आपापल्या कामात यशस्वी देखील झाले. मात्र आजही त्यांची क्रेझ आणि लोकप्रियता कायम आहे. (Prathmesh Mugdha)
याच सा रे ग म प लिटिल चॅम्प्समधील दोन प्रसिद्ध आणि लोकप्रिय स्पर्धक म्हणजे प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन (Mugdha Vaishampayan And Prathamesh Laghate). या दोघांना आजही अमाप फॅन फॉलोविंग आहे. या दोघांनी त्यांच्या फॅन्सला २०२३ साली ते रिलेशनशिपमध्ये असल्याचा आणि लवकरच लग्न करत असल्याचा सुखद धक्का दिला. (Entertainment mix masala)
त्यानंतर २१ डिसेंबर २०२३ रोजी मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांनी लग्न केले. मोठ्या थाटामाटात आणि पारंपरिक पद्धतीने या दोघांचा लग्न सोहळा संपन्न झाला. त्यांच्या लग्नातले फोटो, व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाले होते. या वर्षी अर्थात नुकताच त्यांनी त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस (First Anniversary) साजरा केला. हा खास दिवस दोघांनी एकमेकांबरोबर साजरा आहे. सोशल मीडियावर त्यांनी त्यांच्या लग्नाच्या सेलिब्रेशनचे अनेक फोटो शेअर केले आहे. (Social News / Updates)
A post shared by Mugdha Bhagawan Vaishampayan (@mugdhabhagawan5)
मुग्धा वैशंपायनने त्यांच्या सेलिब्रेशनचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. “अशाप्रकारे आम्ही आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला”, असे कॅप्शन लिहित तिने हे खास फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून त्यांनी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस सुंदर अशा रिसॉर्टवर साजरा केल्याचे दिसत आहे. अतिशय सुंदर अशा रिसॉर्टवर निसर्गाच्या सान्निध्यात त्यांनी एकमेकांसोबत वेळ घालवत त्यांचा हा खास दिवस साजरा केला.
याशिवाय मुग्धाने त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्यांच्या लग्नातले अनेक अनसीन फोटो शेअर केले आहेत. सध्या या दोघांच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव करत त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान मुग्धा आणि प्रथमेश यांच्या लव्हस्टोरीबद्दल सांगायचे झाले तर, या दोघांची पहिल्यांदा भेट ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्येच झाली. याच शोचा निमित्ताने त्यांची ओळख झाली आणि हळूहळू त्यांच्यात एक छान मैत्रीचे नाते निर्माण झाले. शो संपल्यानंतरही मुग्धा आणि प्रथमेश यांनी एकत्र अनेक कार्यक्रम केले. या गाण्यांच्या कार्यक्रमामुळे मुग्धा आणि प्रथमेशच्या सतत भेटी होत होत्या.
===========================
हे देखील वाचा: ‘फसक्लास दाभाडे’मधील धमाल ‘यल्लो यल्लो’ गाणं प्रदर्शित
===========================
याच काळात त्यांना दोघांना एकमेकांविषयी प्रेम जाणवायला सुरुवात झाली होती. पुढे काही दिवसांनी प्रथमेशने एका कार्यक्रमाच्या तालीमच्या वेळी सहज गप्पा झाल्यानंतर मुग्धाला थेट लग्नाबद्दल विचारले. प्रथमेश तिला असा प्रश्न विचारणार याची मुग्धाला कल्पना होतीच. मुग्धाचे उत्तर काय असेल,याची प्रथमेशलाही माहिती होती. मात्र तरीही त्याला थोडे दडपण आले होते.
प्रथमेशने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर द्यायला मुग्धाने तीन – चार दिवस घेतले. मग एके दिवशी तिने त्याला भेटायला बोलवून तिचा होकार सांगितला. त्यानंतर काही दिवस दोघांनी एकमेकांना डेट केले आणि काही काळाने मुग्धा प्रथमेशने त्यांच्या नात्याबद्दल एकत्र घरच्यांना सांगितले. घरच्यांना देखील याची कल्पना आलीच होती. पुढे घरच्यांच्या संमतीने मुग्धा आणि प्रथमेशने २१ डिसेंबरला लग्नगाठ बांधली.