Mukesh : निर्मळ मनाच्या मुकेशच्या प्रेमाचा भावस्पर्शी किस्सा!
Tejashree Pradhan सिनेमा हाऊसफुल असूनही थिएटर नसल्याने तेजश्री प्रधानने व्यक्त केली खंत
आपण अनेकदा एक वाद ऐकला आहे की, महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपटांना थियेटरच मिळत नाही. हा तसा जुना, कायम गाजणार आणि अजूनही उपाय न निघालेला वाद आहे. अनेक हिट, चांगले सिनेमे केवळ त्यांना थियेटर मिळत नाही म्हणून फ्लॉप ठरतात आणि प्रेक्षकांपर्यंत पोहचतच नाही. यावर अनेकदा आंदोलनं झाली, नेते मंडळींनी देखील यामध्ये हस्तक्षेप केला. मात्र आजही हा प्रश्न जैसे थे आहे. (Tejashree Pradhan)
आता अचानक हा मुद्दा येण्याचे कारण म्हणजे अभिनेत्री तेजश्री प्रधान. नुकताच तेजश्री आणि सुबोध यांचा बहुचर्चित असा ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ (Hashtag Tadev Lagnam) हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. उत्तम कथा, कसलेले कलाकार, प्रभावी अभिनय आदी अनेक सकारात्मक बाबींमुळे सिनेमाला प्रेक्षकांनी देखील डोक्यावर घेतले आहे. (Social News / Updates)
मात्र असे असूनही मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी या सिनेमाला थियेटरच मिळत नाही. त्यामुळे तेजश्री प्रधानाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून याबद्दल एक पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात मराठी सिनेमावर होणार हा अन्याय पाहून तेजश्रीने पोस्ट केली असून, ती सध्या खूपच गाजत आहे. तिच्या पोस्टमुळे पुन्हा एकदा मराठी चित्रपटांना थियेटर मिळत नसल्याचा मुद्दा समोर आला आहे. (Latest Marathi Movies)
तेजश्रीने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले, “मराठी सिनेमांना महाराष्ट्रात थिएटर मिळत नसल्याची खंत व्यक्त करत लिहिलं आहे की, ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ हा आमचा सिनेमा हाऊसफुल आहे पुणे आणि मुंबईमध्ये…( मिळालेल्या मोजक्या सिनेमागृहांमध्ये ) पण, महाराष्ट्रात मराठी सिनेमासाठी थिएटर्स उपलब्ध नाहीत हे दुर्दैवी आहे.” (Box Office Collection)
दरम्यान वर म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये हिंदी, दाक्षिणात्य सर्वच चित्रपटांना प्राईम टाइम दिला जातो. पाहिजे त्या वेळेत या सिनेमांचे शो उपलब्ध असतात. मात्र महाराष्ट्रात राहून मराठी चित्रपटांना थिएटर न मिळण्याची नामुष्की सहन करावी लागत आहे. इथे चित्रपटांना प्राईम शो तर सोडा साधे थियेटर देखील मिळत नाही.
यासाठी यापूर्वी अनेक वाद झाले, आंदोलनं झाले, मात्र त्यावर काहीही उपाय निघाला नाही. पूर्वी मराठी सिनेमे तुफान चालायचे. मात्र आता मराठी सिनेमे एक आठवडा देखील चित्रपट गृहांमध्ये दिसत नाही. कारण आपल्या मराठी चित्रपटांना थियेटरच नाही. त्यामुळे हे सिनेमे प्रेक्षकांपर्यंत पोहचतच नाही.
============
हे देखील वाचा : ‘गीत गाता हूं मै…’ गाण्याच्या रेकोर्डिंगचा अफलातून किस्सा!
============
तत्पूर्वी ‘हॅशटॅग तदेव लग्नम‘ सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर सिनेमाच्या टिझर आणि ट्रेलरने कमालीची लोकप्रियता मिळवल्यानंतर या सिनेमाची प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता होती. विशिष्ट वयानंतर लग्न इच्छुक असलेल्या दोन व्यक्तींचा प्रवास या सिनेमातून दर्शवला आहे.
तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांच्यासोबतच या चित्रपटात प्रदीप वेलणकर, मानसी मागिकर, संजय खापरे, शर्मिष्ठा राऊत या कलाकारांच्या सुद्धा यामध्ये महत्त्वाच्या भूमिका आहेत. २० डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित झाला. प्रदर्शित झाल्यापासून काही हाऊसफुल शोला तेजश्री आणि सुबोध यांनी स्वत: थिएटरमध्ये जाऊन प्रेक्षकांची भेट घेतली होती.