Mukesh : निर्मळ मनाच्या मुकेशच्या प्रेमाचा भावस्पर्शी किस्सा!
Vivek Oberoi ‘या’ कारणासाठी विवेक ओबेरॉयने नाकारला ‘ओम शांती ओम’ सिनेमा १७ वर्षांनी झाला खुलासा
एखादा सिनेमा फक्त एकाच कलाकाराला ऑफर होतो आणि तो करतो असे अजिबातच नसते. एखादा सिनेमा अनेक कलाकारांना ऑफर होतो. काही कलाकार सिनेमाला नकार देखील देतात आणि ज्याला शक्य आहे तो कलाकार सिनेमाला होकार देतो. असे अनेक सिनेमे आहेत जे अनेक कलाकारांना ऑफर होतात आणि चांगले, चांगले कलाकार विविध कारणांमुळे त्यांना नकार देखील देतात. (Vivek Oberoi)
सध्या असाच एक किस्सा मीडियामध्ये आणि इंडस्ट्रीमध्ये कमालीचा गाजत आहे. हा किस्सा आहे फराह खानचा (Farah Khan) ब्लॉकबस्टर सिनेमा (Blockbuster Cinema) ‘ओम शांती ओम‘शी (Om Shanti Om) संबंधित. शाहरुख खान, अर्जुन रामपाल आणि दीपिका पदुकोण (Shaharukh Khan, Arjun Rampal And Deepika Padukon ) यांच्या या सिनेमाने अफाट लोकप्रियता मिळवली. सध्या हा सिनेमा आणि याचा एक किस्सा खूपच चर्चेत आला आहे. (Ankahi Baatein)
ओम शांती ओम सिनेमात खलनायकाची अर्थात अर्जुन रामपालची भूमिका सर्वात आधी विवेक ओबेरॉयला ऑफर करण्यात आली होती. बॉलिवूडमधील (Bollywood) एक नावाजलेला, प्रतिभावान आणि वादांशी संबंधित अभिनेता म्हणून विवेकला ओळखले जाते. सध्या विवेक चित्रपटांपासून दूर दुबईमध्ये (Dubai) शिफ्ट झाला आहे. विवेकने कायमचा मुंबईला (Mumbai) रामराम म्हटलं असून तो आता दुबईमध्येच राहणार आहे. (Bollywood Tadka)
नुकतीच विवेकने एक मुलाखत (Interview) दिली आहे. त्यात त्याने अनेक खुलासे केले. अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलेल्या विवेकने त्याच्या करियरमध्ये अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे करण्यास नकार दिला होता. यात ‘हम तुम’, ‘मुन्नाभाई MBBS’, ‘ओम शांती ओम’ अशा अनेक चित्रपटांचा समावेश होता. त्याने नकार दिलेले सर्वच सिनेमे तुफान चालले.
विवेकने ओम शांती ओमला सिनेमाला नकार का दिला हे सांगताना तो म्हणाला, “मला फराह खानने ओम शांती ओम सिनेमाची ऑफर आली होती. पण तेव्हा मी शूटआउट अॅट लोखंडवाला (Shootout At Lokhandwala) सिनेमाला आधीच होकार दिला होता आणि दोन्ही सिनेमांच्या तारखा एकच होत्या. म्हणून मी त्या सिनेमाला नकार दिला.”
पुढे विवेक म्हणाला, “दोन्ही सिनेमांच्या तारखा क्लॅश होत होत्या. दोन्ही सिनेमांमध्ये माझ्या नकारात्मक भूमिका होत्या. शूटआउट अॅट लोखंडवाला सिनेमातली भूमिका मला आवडली होती आणि मी त्या भूमिकेसाठी रिसर्च आणि अभ्यास देखील सुरु केला होता. जेव्हा मला फराह खानने या भूमिकेसाठी संपर्क केला तेव्हा मला नाइलाजाने नकार द्यावा लागला होता.”
============
हे देखील वाचा : ‘गीत गाता हूं मै…’ गाण्याच्या रेकोर्डिंगचा अफलातून किस्सा!
============
विवेक म्हणाला, “जर दोन्ही चित्रपटांच्या शूटिंगच्या तारखा वेगळ्या असत्या, तर मी नक्कीच ओम शांती ओम सिनेमाला होकार दिला असता. या सिनेमाच्या निमित्ताने मला शाहभाईंसोबत ( शाहरुख खान ) काम देखील करता आले असते. माझ्या पूर्ण करियरमध्ये मला त्यांच्याबरोबर फक्त ‘साथिया’ (Saathiya) चित्रपटाच्या निमित्ताने काम करण्याची संधी मिळाली होती. त्या चित्रपटात शाहभाईंनी कॅमिओ भूमिका साकारली होती.”
सध्या विवेक चित्रपटांपासून लांब त्याच्या व्यवसायामध्ये व्यस्त आहे. तो आता एक प्रसिद्ध बिजनेसमॅन झाला आहे. काही दिवसांपूर्वीच तो रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) ‘इंडियन पोलीस फोर्स‘मध्ये झळकला होता.