Kiran Mane किरण मानेंची क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीदिनी खास पोस्ट
Meera Joshi शूटिंग करूनही कामाचा मोबदला न मिळाल्याने अभिनेत्री मीरा जोशीने पोस्ट शेअर करत मागितली दाद
जी व्यक्ती काम करते तिला त्या कामाचा मोबदला म्हणून पैसे दिले जातात. नोकरी करणारे माणसं असो किंवा कलाकार प्रत्येकालाच त्यांच्या कामाचे पैसे मिळतात. मात्र आपल्याला एकदा तरी असा अनुभव येतो की काम करूनही त्याचे आपल्या हक्काचे पैसे कोणी देत नाही. मग अशावेळेस अनेकदा मागूनही जर पैसे दिले जात नसतील तर ते सोडून द्यावे लागतात. किंवा पैसे मिळवण्याचे अजून कोणते मार्ग असतील तर त्याचा वापर केला जातो. (Meera Joshi)
कलाकरांना देखील अनेकदा अशा अनुभवांना सामोरे जावे लागते. काम करूनही त्यांना त्यांचे पैसे मिळत नाही. अशा अनेक घटना अनेक प्रसिद्ध कलाकारांसोबत घडल्या आहेत. ज्या खूप गाजल्या देखील आता पुन्हा अशीच एक घटना एका मराठी अभिनेत्रींसोबत घडली आहे.
‘तुझं माझं ब्रेकअप’ फेम अभिनेत्री मीरा जोशीला (Meera Joshi) देखील तिच्या कामाचे पैसे मिळाले नाही. शेवटी वैतागून तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दाद मागितली आहे. सोबतच तिने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत काही महत्वपूर्ण खुलासे केले आहेत. शेअर केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये, मीराने चित्रपटात काम करूनही मानधन मिळाले नसल्याचा खुलासा केला आहे.
सोबतच चित्रपटाच्या निर्मात्यांनी तिचे पैसे थकवल्याची पोस्ट केली आहे. शिवाय या पोस्टमध्ये मीरा जोशीने चित्रपटाच्या नावाचाही खुलासा केला आहे. तिने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात केलेल्या एका चित्रपटाच्या शुटींगचे पैसे तिला अद्याप मिळालेले नाहीत. याबद्दल् तिने तक्रारही दाखल केली. मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. आता तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
मीराने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “मी नोव्हेंबर २०२३ मध्ये ‘जिद्दी सनम’ नावाचा एक चित्रपट केला होता आणि तेव्हापासून मी पैशांची वाट बघतेय. आता एक वर्षाहून अधिक काळ झाला आहे. मी त्या प्रोडक्शन हाऊससोबत बोलतेय. मी याबद्दल सिने अँड टीव्ही आर्टिस्ट ऑर्गनायझेशनमध्ये देखील बोलली आहे. मराठी सिनेसृष्टीतमध्ये सुद्धा काही व्यक्तींसोबत बोलले, मात्र कुणीच मदत केली नाही.”
पुढे मीरा लिहिते, “सिने अँड टीव्ही आर्टिस्ट ऑर्गनायझेशनने मला तक्रार दाखल करण्यासाठी पैसे भरायला सांगितले. मी तिथे पैसे सुद्धा भरले. माझे पैसे मिळवण्यासाठी मी शक्य असलेली प्रत्येक गोष्ट केली पण तरीही मला अजूनही माझे पैसे मिळालेले नाहीत. मी या चित्रपटाचे पहिले शेड्यूल पूर्ण शूट केले होते.
हे शूट मी २०२३ मध्ये ४ नोव्हेंबर, ५ नोव्हेंबर आणि ६ नोव्हेंबर असे तीन दिवस केले. पहिल्या शेड्युलनंतर एका आठवड्यात पैसे दिले जातील, असे देखील मला सांगण्यात आले होते. मी त्यांच्यासाठी ३ वेळा शूट केले. एक तर माझे कास्टिंग घाईघाईत झाल्यामुळे त्यांच्याकडे ऍग्रिमेंट बनवण्यासाठी वेळ नव्हता आणि व्हाट्सअप चॅट्स पोलीस पुरावा म्हणून ग्राह्य धरत नाहीत. त्यामुळे पोलीस देखील माझी काहीच मदत करत नाहीये.”
“मला आता कुठलाच पर्याय दिसत नसल्याने हा मुद्दा मी इथे मांडण्याचे ठरवले. त्यांनी मला मेलमध्ये सांगितल्याप्रमाणे मी त्यांची परिस्थिती समजून घेत १ वर्ष वाट पाहिली. माझ्याप्रमाणेच टीममधील आणखी काही जणांनाही त्यांच्या कामाचा मोबदला मिळालेला नाही.”
पुढे मीरा जोशीने लिहिले, “हो, ही माझीच चूक आहे की, मी तुमच्यावर विश्वास ठेवला. त्यांनी मला ३ नोव्हेंबरला कास्टिंगसाठी रात्री उशिरा कॉल केला होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी शूटिंगला गेले. त्यांचा प्रॉब्लेम समजून घेतला, याचा आता मला पश्चाताप होत आहे.
===============
हे देखील वाचा : Dev anand: देव आनंदला सुपर हिट सिनेमाची आयडिया कुठे मिळाली?
===============
त्यांच्याकडे ॲग्रिमेंट बनवायला वेळ नव्हता. पण, पहिल्या शेड्युलनंतर ॲग्रिमेंट बनवतील असा विश्वास मी त्यांच्यावर ठेवला आणि हीच मोठी चूक केली.” मात्र आता खूपच अति झाल्याने मीराने शेवटचा पर्याय म्हणून सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. मीराने तिच्या या पोस्टसोबतच तिच्या इमेलचा स्क्रीनशॉट आणि निर्मात्यांचा आणि प्रॉडक्शन हाऊसचे नाव आणि नंबर देखील शेअर केला आहे.