Kiran Mane किरण मानेंची क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीदिनी खास पोस्ट
Rajesh Khanna राजेश खन्ना यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया त्यांचे काही गाजलेले किस्से
जगातील सर्वात मोठ्या फिल्म इंडस्ट्रीपैकी एक म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीला (Hindi Movies) ओळखले जाते. ११० पेक्षा अधिक वर्ष जुन्या या या क्षेत्राला मोठा आणि जाज्वल्य इतिहास (History) लाभला आहे. एवढ्या मोठ्या काळात या इंडस्ट्रीने अनेक सुपरस्टार (Superstar) पाहिले. मात्र या इंडस्ट्रीला पहिला सुपरस्टार (First Superstar) म्हणून ओळख मिळवलेला कलाकार म्हणजे दिवंगत राजेश खन्ना (Rajesh Khanna).
राजेश खन्ना हे हिंदी सिनेमाचे पहिले सुपरस्टार म्हणून ओळखले जातात. (First Superstar Of Indian Cinema) जो नावलौकिक त्यांनी कमावला, जे लोकांचे प्रेम त्यांना मिळाले ते आजही जास्त लोकांना मिळवता आले नाही. राजेश खन्ना यांनी आपल्या करियरमध्ये अनेक ब्लॉकबस्टर (Blockbuster) सिनेमे दिले आणि अफाट यश मिळवले. आज याच राजेश खन्ना यांचा ८३ वा वाढदिवस (Rajesh khannas Birthday) आहे. याच निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी. (Bollywood Tadka)
बॉलिवूड अभिनेते राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांचा जन्म २९ डिसेंबर १९४२ मध्ये पंजाबमधील अमृतसर येथे झाला. त्यांचे खरे नाव जतीन खन्ना असे होते. मात्र ते राजेश खन्ना आणि ‘काका’ याच नावाने प्रसिद्ध झाले. त्यांनी त्यांच्या सिनेसृष्टीतील प्रवासात एका पेक्षा एक सिनेमांत काम केले आणि यश मिळवले. (Ankahi Baatein)
राजेश खन्ना त्यांच्या आई-वडिलांचे दत्तक पुत्र होते. अभिनेता होण्यासाठी जेव्हा राजेश खन्ना ऑडिशनला जायचे तेव्हा ते मोठमोठ्या गाड्यांमधून प्रवास करायचे. राजेश खन्ना हे उत्तम अभिनेते असण्यासोबतच दिसायला देखील स्मार्ट होते. (Entertainment mix masala)
राजेश खन्ना यांनी तब्बल १८० सिनेमांत काम केले आणि त्यातील १२८ सिनेमांत ते मुख्य भूमिकेत झळकले. हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये १५ बॅक टू बॅक हिट चित्रपट दिले आणि एक नवा इतिहास रचला. (Rajesh khannas Box Office Record) नमक हराम, आनंद, अमर प्रेम, आराधना, कटी पतंग, दाग, परेश आणि सफर यांसारख्या चित्रपटांमधील त्याच्या अफाट यशामुळे तो रुपेरी पडद्यावरचा खऱ्या अर्थाने सुपरस्टार बनला. (Bollywood Masala)
सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना तीन वेळा फिल्मफेअर पुरस्काराने (Filmfeyar Awards) सन्मानित करण्यात आले आहे. बंगाल फिल्म जर्नलिस्ट असोसिएशनद्वारे (Bengal Film Journalists’ Association Awards) हिंदी सिनेमांतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार त्यांना चार वेळा मिळाला. तर याच पुरस्कारासाठी ते २५ वेळा नामांकित झाले होते.
राजेश खन्ना यांची प्रेक्षकांमध्ये खासकरून तरुणींमध्ये कमालीची क्रेझ होती. याचे देखील अनेक किस्से इंडस्ट्रीमध्ये आणि मीडियामध्ये सांगितले जातात. राजेश खन्ना यांना रोमँटिक हिरो म्हणून अमाप लोकप्रियता मिळाली.
राजेश खन्ना यांची डोळ्यांची पापणी हलवणे आणि मान झुकवण्याच्या स्टाईलचे लोकं वेडे होते. तरुणी तर त्यांना रक्ताने पत्र लिहायच्या, तर काहींनी त्यांच्या फोटोबरोबरच लग्न केले होते. काही तरुणींनी आपल्या हातावर राजेश यांचे नाव गोंदवून घेतले होते. त्यांची गाडी गर्दीमधून वाट काढायची तेव्हा त्यांची गाडी लिपस्टिकने भरलेले असायची.
महमूद (Mehmood) यांनी त्यांच्या ‘जनता हवलदार‘ (Janta Hawaldar) या चित्रपटासाठी राजेश खन्ना यांना साइन केले होते. राजेश खन्ना त्याकाळातील सुपरस्टार होते आणि त्यांचे एक वेगळेच स्टारडम होते. महमूद यांनी त्यांच्या फार्म हाऊसवर चित्रपटाचे शूटिंग व्हायचे. मात्र राजेश खन्ना हे सिनेमाच्या सेटवर खूप उशिरा यायचे. त्यामुळे शूटिंग तासंतास खोळंबायचे. यामुळे खूप नुकसान होत होते. जेव्हा मेहमूद यांनी राजेश खन्ना यांना वेळेत येण्याबद्दल सांगितले तेव्हा त्यांच्यात वाद झाला आणि मेहमूद यांनी राजेश यांच्या कानाखाली मारली होती.
राजेश खन्ना यांचे अफेयर्स देखील खूप गाजले. त्यांनी १६ वर्षे वय असलेल्या डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) यांच्याशी लग्न केले होते. दोघांच्या वयामध्ये १५ वर्षाचे अंतर होते. १९७४ मध्ये डिंपल आणि राजेश यांना पहिली मुलगी ट्विंकल झाली. त्यानंतर १९७७ मध्ये रिंकीचा जन्म झाला. खास गोष्ट म्हणजे राजेश खन्ना यांच्या वाढदिवसाच्याच दिवशी मथु मुलगी ट्विंकल हीच वाढदिवस असतो.
राजेश खन्ना यांनी एकदा मान्य केले होते की, सलीम- जावेद (Salim – Javed) आणि त्यांच्यात मतभेद होते. दीवार सिनेमासाठी राजेश यांना साइन करण्यात येणार होते. मात्र काही दिवसांनी त्यांना अमिताभ बच्चन या सिनेमाठी जास्त योग्य असल्याचे जाणवले. आणि त्यांनी अमिताभ यांना साइन केले.
===============
हे देखील वाचा : Dev anand: देव आनंदला सुपर हिट सिनेमाची आयडिया कुठे मिळाली?
===============
राजेश खन्ना यांनी चित्रपटांमध्येच नाही तर राजकारणाच्या मैदानातही यश मिळवले होते. १९९२ ते १९९६ दरम्यान ते नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून १० व्या लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले होते.
मात्र दुर्दैवाने या पहिल्या सुपरस्टार राजेश खन्ना यांचे १८ जुलै २०१२ रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. आज ते आपल्यात नसले तरी त्यांचे चित्रपट, त्यांच्या आठवणी कायम आपल्यात आहे आणि राहतील.