Kiran Mane किरण मानेंची क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीदिनी खास पोस्ट
Siddharth Jadhav : सिद्धार्थ जाधवने ‘या’ कारणासाठी प्रेक्षकांचे आभार मानत शेअर केली भावुक पोस्ट म्हणाला…
मराठीसोबतच हिंदीमध्ये देखील आपल्या अभिनयाने आणि स्टाइलने सगळ्यांची मने जिंकणारा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav). अतिशय लोकप्रिय आणि प्रसिद्ध असणारा सिद्धार्थ अर्थात आपला सगळ्यांचा लाडका सिद्धू. चित्रपट गाजवणारा सिद्धू सध्या चांगलाच चर्चेत आहे.
सिद्धू गाजतोय त्याचे कारणही खूपच खास आहे. सिद्धू स्टार प्रवाहावरील (Star Pravah) ‘होऊ दे धिंगाणा‘ (Hou De Dhingana) या कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालक म्हणून आपल्याला बऱ्याच काळापासून दिसत आहे. हा शो प्रेक्षकांमध्ये तुफान गाजत आहे.
‘होऊ दे धिंगाणा’ या शोमध्ये विविध मालिकांमधील कलाकार स्पर्धक म्हणून येतात आणि सिद्धू त्यांच्याकडून भन्नाट मजेशीर खेळ खेळून घेतो. हे खेळताना येणारी मजा, मस्ती आणि सिद्धार्थचे खुमासदार सूत्रसंचालन (Host) यांच्या जोरावर या शो ने प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन केले किंबहुना अजूनही करत आहे.
या शोची प्रेक्षकांमधील लोकप्रियता पाहून बंद झालेला हा शो पुन्हा सुरु करण्यात आला. नुकतेच ‘होऊ दे धिंगाणा’ या शो चे तब्बल १०० भाग पूर्ण झाले. (aata hou de dhingana show completed 100 Episode) संपूर्ण आठवड्याचा कामाचा शीण घालवणारा हा शो तुफान गाजत आहे. या शो ला मिळणारे प्रेक्षकांचे प्रेम पाहून सिद्धार्थ भावुक झाला. प्रेक्षकांचे आभार मानण्यासाठी त्याने एक खास पोस्ट शेअर केली आहे. सध्या त्याची ही पोस्ट खूपच गाजत आहे.
सिद्धूने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, “काय आणि कसे आभार मानू ‘स्टार प्रवाह’ टीमचे…मला कळतं नाही…’आता होऊ दे धिंगाणा’चा शंभरावा एपिसोड…बापरे मी या कार्यक्रमाचा भाग होईन किंवा हा कार्यक्रम मला होस्ट करायला मिळेल आणि महाराष्ट्राचे मायबाप रसिक प्रेक्षक एवढं प्रेम करतील हे कधीच वाटलं नव्हतं.
मी खूप वेळा पाहायचो की, या मालिकेने शंभर भाग पूर्ण केले…या मालिकेने २०० भाग पूर्ण केले…या मालिकेने ३०० भाग पूर्ण केले. पण आता मी त्या एका कार्यक्रमाचा भाग आहे ज्यांनी शंभर एपिसोड पूर्ण केले.”
पुढे सिद्धार्थ लिहितो, “हा एक कथाबाह्य कार्यक्रम आहे आणि गेले तीन वर्ष मी हा शो होस्ट करतोय. पण याचं सगळंच श्रेय आहे सतीश राजवाडे सर, श्रीप्रसाद क्षीरसागर, सुमेध, चिन्मय, अद्वैत दादा, निखिल, दीप सर, स्टार प्रवाह, फ्रेम्स कंपनी आणि ‘आता होऊ दे धिंगाणा’च्या संपूर्ण टीमला जातं… बापरे शब्दात मांडू शकणार नाही असा हा विषय आहे.
============
हे देखील वाचा : सचिनदा यांनी भांडून ‘या’ गायकाकडूनच गाणे गाऊन घेतले!
============
पण येस…मी पण अशा एका कलाकृतीचा भाग आहे ज्यांनी शंभर एपिसोड पूर्ण केलेत आणि हे शक्य झाले तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे…सो थँक्यू . असंच प्रेम ठेवा आणि खूप भारी फिलिंग आहे…खरं सांगतो. खूप भारी फिलिंग आहे…लव्ह यू ऑल…पाहायला विसरु नका ..आता होऊ दे धिंगाणा ३,”
सिद्धार्थने या पोस्टमध्ये चॅनेलच्या सर्वच लोकांचे आणि प्रेक्षकांचे आभार मानत हा शो नियमित बघण्यासाठी विनंती देखील केली आहे. दरम्यान त्याच्या या पोस्टवर नेटकऱ्यांसोबतच अनेक कलाकारांनी देखील कमेंट्स करत त्याचे आणि त्याच्या सूत्रसंचालनाचे कौतुक केले आहे.