Kishore Kumar शत्रुघ्न सिन्हावर चित्रित किशोर कुमारने गायलेलं पहिले गाणे
Maine Pyar Kiya मैंने प्यार किया सिनेमाची यशस्वी ३५ वर्ष
बॉलिवूडच्या आजवरच्या इतिहासात खूप कमी असे सिनेमे आहेत, ज्यांना अफाट लोकप्रियता मिळाली आणि त्यांची नोंद ऑल टाईम ब्लॉकबस्टर (Blockbuster) म्हणून करण्यात आली. यातलाच एक सिनेमा म्हणजे सलमान खान आणि भाग्यश्री (Salman khan and Bhagyashree) यांचा ‘मैंने प्यार किया‘ (Maine Pyar Kiya). २९ डिसेंबर १९८९ रोजी प्रदर्शित झाला होता. (Maine Pyar Kiya)
मैंने प्यार किया या सिनेमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या सिनेमाचे दिग्दर्शक सुरज बडजात्या (Sooraj Barjatya) यांचा पहिलाच दिग्दर्शकीय सिनेमा, सलमान खान आणि भाग्यश्री यांचा देखील हा पहिलाच सिनेमा होता. या सिनेमाने कल्पनेपलीकडे जाऊन लोकप्रियता मिळवली. सिनेमातील गाणी, संगीत, कलाकार, कलाकारांचे अभिनय, कथा, सिनेमातील संवाद आदी सर्वच गोष्टी कमालीच्या लोकप्रिय झाल्या.
मैंने प्यार किया या सिनेमाने सलमान खानचे संपूर्ण जीवनच बदलवले. त्याला किंबहुना सिनेमातील सर्वच कलाकारांना न भूतो न भविष्यती अशी मोठी प्रसिद्धी या सिनेमाने मिळवून दिली. आजही हा सिनेमा टीव्हीवर मोठ्या आवडीने पाहिला जातो. आज मैंने प्यार किया सिनेमाला प्रदर्शित होऊन तब्बल ३५ वर्ष पूर्ण झाले. मात्र अजूनही सिनेमाची क्रेझ लोकांमध्ये कायम आहे. सिनेमातील गाणी आजही सुपरहिट आहे. आज सिनेमाला ३५ वर्ष पूर्ण होत असल्याचे औचित्य साधत जाणून घेऊया सिनेमाशी संबंधित काही रंजक किस्से. (Maine Pyar Kiya Completes 35 Years)
भाग्यश्रीला सूरज बडजात्या यांनी एका कार्यक्रमात पाहिले होते. त्याचवेळी त्यांना तिच्यामध्ये त्यांची ‘सुमन‘ दिसली. बडजात्या यांनी भाग्यश्रीला सिनेमाची कथा ऐकवली आणि तिला ती आवडलीही परंतु, तेव्हा भाग्यश्रीला केवळ तिच्या शिक्षणावर लक्ष द्यायचे होते. त्यामुळे तिने बडजात्या यांना नकार दिला. मात्र सुरज बडजात्या हार न मानता तिला तयार करण्याचे प्रयत्न सुरु ठेवले, अखेर तिने ७ वेळा त्यांना नकार दिल्यानंतर आठव्यांदा तिने सूरज यांना तिचा होकार कळवळा होता. (Bollywood Tadka)
आज मैंने प्यार किया सिनेमा बघताना आपण सलमान खान शिवाय सिनेमाची कल्पनाच करू शकत नाही. मात्र सिनेमातील ‘प्रेम’च्या भूमिकेसाठी सलमान हा बडजात्यांची पहिली पसंती नव्हता. त्याच्याआधी या भूमिकेसाठी त्यांनी त्यावेळी अनेक नवीन अभिनेत्यांची ऑडिशन घेतली होती. यात विंदू दारासिंग, दिपक तिजोरी, फराज खान यांचा समावेश होता. यात फराज खानला बडजात्या यांनी फायनलही केले होते. मात्र त्याच्या हेल्थ इश्यूमुळे सलमानकडे ही भूमिका चालून आली. (Ankahi Baatein)
सलमान खान जेव्हा या सिनेमाच्या ऑडिशनला गेला होता तेव्हा तो फेल झाला. त्यानंतर त्याने अनेकांना सुरज बडजात्या यांच्याकडे या सिनेमाच्या ऑडिशनसाठी पाठवले होते. मात्र जेव्हा सुरज यांनी सलमान खानचे फोटो पाहिले ते पाहून त्यांना सलमान हाच त्यांचा ‘प्रेम‘ असल्याचे जाणवले आणि त्यांनी सलमानलाच या भूमिकेसाठी फायनल केले. (Entertainment mix masala)
मराठी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) याचा देखील हा पहिलाच हिंदी सिनेमा होता. हा सिनेमा हिट होताच लक्ष्मीकांत बेर्डे यालाही हिंदीत मागणी वाढली. त्या साली बेस्ट कॉमेडियन फिल्मफेअर पुरस्कारासाठी लक्ष्मीकांत बेर्डे यांना नॉमिनेशन देखील मिळाले होते.
या सिनेमात रिमा लागू (Reema Lagoo) यांनी सलमानच्या आईची भूमिका केली होती. खऱ्या आयुष्यात पाहिले तर सलमान आणि रिमा लागू यांच्या वयात अजिबातच जास्त अंतर नव्हते. सलमानपेक्षा रीमा लागू या केवळ ५ वर्षांनी मोठ्या होत्या. परंतु, या सिनेमामुळे त्यांची भूमिका रतकी हिट झाली की नंतर त्या सलमानच्या आई म्हणूनच ओळखल्या जाऊ लागल्या. तसेच पुढे अनेक सिनेमांमध्ये त्यांनी सलमानच्या आईचीच भूमिका केली होती.
या सिनेमाच्या शुटिंगवेळी भाग्यश्री केवळ १८ वर्षांची होती आणि ती हिमालय दासानीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. ही गोष्ट खूप लोकांना माहित नव्हती. जेव्हा सिनेमाचे शुटिंग चालू होते तेव्हा सलमान सारखा तिच्याजवळ जाऊन बसायचा आणि कानात दिल दीवाना बिन सजना के… हे गाणं गात होता. (Bollywood Masala)
यामुळे तिची थोडी चिडचिड व्हायची मात्र नंतर तिने त्याला विचारले, हे सर्व काय आहे, तो असे का करतोय? तेव्हा सलमानने सांगितले की त्याला हिमालयबद्दल माहिती आहे. ‘दिल दीवाना बिन सजना के’ गाणे गाऊन सलमान तिला वारंवार चिडवत होता. अभिनेत्रीने सांगितले की तो खूप खोडकर होता.
अनेकांना माहीत नाही की मैंने प्यार किया हा सिनेमा दोन परदेशी भाषांमध्येही डब केला गेला होता. इंग्रजीमध्ये या सिनेमाचे टायटल होते, ‘When Love Calls’. हा सिनेमा गयाना, त्रिनिदाद अँड टोबॅगो येथे सुपरहिट गेला होता. नंतर हा सिनेमा ‘Te Amo’ या नावाने स्पॅनिशमध्येही डब करण्यात आला होता.
===========
हे देखील वाचा : B. R. Chopra : ‘गुमराह’चा आणि दिलीप कुमारच्या या प्रेम प्रकरणाचा काय संबंध?
===========
मोहनिश बहल (Mohnish Bahal) याची आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री नूतन (Nutan) या त्यांच्या मुलाला अर्थात मोहनिश यांना मिळालेल्या निगेटिव्ह रोलवर खूश नव्हत्या. त्यांनी बडजात्या यांच्याशी बोलणी देखील केली होती. मोहनिश या भूमिकेसाठी योग्य नसल्याचे त्यांना वाटत होते. मात्र बडजात्या यांनी त्यांना समजून सांगत म्हटले होते की, मोहनिशला या भूमिकेसाठी लोकं ओळखतील. आणि तसेच घडले. मोहनिश यांची नकारात्मक भूमिका देखील कमालीची हिट झाली आणि ते प्रसिद्ध झाले.