Deepika Padukon : यशस्वी मॉडेल ते सुपरस्टार अभिनेत्री असा प्रवास
Top Indian Web Series: २०२४ मधील टॉप १० गाजलेल्या वेबसिरीज
२०२४ हे वर्ष चित्रपटांसाठी जरी सरासरी असले तरी ओटीटी माध्यमासाठी हे वर्ष खूपच मस्त आणि जोरदार गेले. अनेक प्रतिक्षीत अशा उत्तम सिरीज या वर्षी प्रदर्शित झाल्या तर अनेक जुन्या वेबसिरीजचे पुढचे भाग आले. एकूणच काय तर ओटीटी माध्यमासाठी २०२४ हे वर्ष भरभराटीचे गेले. (Top Indian Web Series)
यावर्षी ओटीटीवर थ्रिलर, कॉमेडी, सायकॉलॉजिकल थ्रिलर, हॉरर कॉमेडी अशा विविध आशयाच्या सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. यावर्षी चित्रपटांपेक्षा जास्त या वेबसिरीजचाच बोलबाला पाहायला मिळाला. आता आज आपण २०२४ ला निरोप देताना जाणून घेऊया २०२४ मधील सर्वोत्तम आणि गाजलेल्या वेब सीरिज कोणत्या होत्या. (Webseries)
हीरामंडी (Heeramandi)
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘हिरामंडी’ (Heeramandi) ही वेब सीरिज (Webseries) २०२४मध्ये कमालीची गाजली. संजय लीला भन्साळी यांनी या वेब सीरिजच्या माध्यमातून ओटीटी विश्वात पदार्पण केले. या सिरीजमध्ये मनीषा कोईराला, अदिती राव हैदरी, सोनाक्षी सिन्हा, संजीदा शेख यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ही सीरिज नेटफ्लिक्सवर (Netflix) उपलब्ध आहे.
मिर्झापूर सीझन ३ (Mirzapur Season 3)
‘मिर्झापूर सीझन ३’ (Mirzapur Season 3) ही बहुप्रतीक्षित अशी सिरीज खूपच लोकप्रिय झाली. अली फजल, पंकज त्रिपाठी, रसिका दुग्गल यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या सिरिजला पहिल्या दोन भागांप्रमाणे प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ही सीरिज तुम्हाला प्राईम व्हिडीओवर (Prime Video) पाहता येईल.
पंचायत सीझन ३ (Panchayat Season 3)
‘पंचायत सीझन ३’ (Panchayat Season 3) या वेब सीरिजला देखील पंचायतच्या पहिल्या दोन भागांप्रमाणे प्रेक्षकांची पसंती मिळाली. जितेंद्र कुमार, नीना गुप्ता आणि रघुबीर यादव या कलाकारांनी यात मुख्य भूमिका साकारली आहे. ही सीरिज तुम्हाला प्राईम व्हिडीओ (Prime Video) वर पाहता येईल.
ग्यारह ग्यारह (Gyarah Gyarah )
‘ग्यारह ग्यारह’ (Gyarah Gyarah) ही एक क्राईम थ्रिलर वेब सीरिज असून यात, राघव जुयाल, क्रितीका कामरा आणि धैर्य करवा यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. ही सीरिज तुम्हाला झी ५ वर (Zee 5) बघता येईल.
सिटाडेल : हनी बनी (Citadel Honey Bunny)
वरूण धवन आणि समांथा रुथप्रभू यांची मुख्य भूमिका असलेली सिटाडेल हनी बनी (Citadel Honey Bunny) ही स्पाय थ्रिलर सीरिज आहे. यात असणारी वरूण धवन आणि समांथाची फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. ही सीरिज प्राईम व्हिडीओवर (Prime Video) उपलब्ध आहे.
मामला लीगल है (Mamla Legal Hai)
अभिनेते रवी किशन (रवी किशन) यांची ‘मामला लीगल है’ (Mamla Legal Hai) ही कोर्टरूम कॉमेडी ड्रामा वेब सीरिज आहे. या सीरिजमध्ये रवी किशन यांच्यासह नायला गरेवाल, निधी बिश्त, अनंत जोशी यांच्या मुख्य भूमिका आहेत.ही सीरिज नेटफ्लिक्सवर (Netflix) उपलब्ध आहे.
ताजा खबर २ (Taza Khabar 2)
भुवन बामची मुख्य भूमिका असलेल्या ‘ताजा खबर’ या वेब सीरिजचा पहिला सीझन खूप गाज ला होता. त्यामुळे प्रेक्षकांना या सिरीजच्या दुसरी भागाची आतुरतेने प्रतीक्षा होती. ताजा खबर २ (Taza Khabar 2) या सिरिजला देखील प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. या सीरिजमध्ये भुवन बामसह (Bhuvan Baam), श्रिया पिळगांवकर, प्रथमेश परब हे मराठी कलाकार आहेत. ही सीरिज डिस्ने प्लस हॉटस्टारवर (Disney+ Hotstar) पाहू शकता.
मर्डर इन माहिम (Murder In Mahim)
आशुतोष राणा आणि विजय राज यांची मुख्य भूमिका असलेल्या क्राइम थ्रिलर मर्डर इन माहिम (Murder In Mahim) ही सिरीज देखील या यादीत आहे. या सीरिजमध्ये शिवानी रघुवंशी, शिवाजी साटमदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ही सीरिज जिओ सिनेमावर (Jio Cinema) पाहता येईल.
शेखर होम (Shekhar Home)
‘शेखर होम’ (Shekhar Home) ही एक स्पाय ड्रामा सीरीज आहे. यात केके मेनन यांनी गुप्तहेराच्या भूमिकेत दिसत आहे. या सीरीजमध्ये रणवीर शौरी, कीर्ती कुल्हारी, रसिका दुग्गल देखील महत्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. ही सीरीज जिओ सिनेमावर (Jio Cinema) उपलब्ध आहे.
द ग्रेट इंडियन कपिल शो (The Great Indian Kapil Show)
टीव्हीवर प्रसारित होणारा हा शो आता ओटीटीवर येतो. द ग्रेट इंडियन कपिल शो (The Great Indian Kapil Show) हा कॉमेडी शो दर शनिवारी रात्री ८ वाजता नेटफ्लिसवर (Netflix) प्रसारित होतो.या शोने प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळवली आहे.