Gurmeet Choudhary फिटनेससाठी अभिनेता गुरमीत चौधरीने केला दीड वर्षापासून भात,
Sajid Khan: ‘MeToo आरोपानंतर अनेकदा आत्महत्येचा विचार केला’ साजिद खानचा खुलासा
बॉलिवूडच्या (Bollywood) झगमगाटामुळे आपल्याला नेहमीच या क्षेत्राची भुरळ पडते. नेम, फेम, मनी, आलिशान जीवन आदी अनेक गोष्टींमुळे हे क्षेत्र अनेकांना खुणावत असते. मात्र यापलीकडे जाऊन या क्षेत्राची एक काळी बाजू देखील आहे. जी आपल्यासमोर असून देखील आपल्याला ती दिसत नाही, किंवा आपण ती दुर्लक्षित करतो. (Bollywood Tadka)
या बॉलिवूडमध्ये अनेकदा मुलींना किंबहुना मुलांना देखील खूपच वाईट अनुभव येतात. या क्षेत्रात लोकांचे होणारे लैंगिक शोषण खूपच मोठा मुद्दा आहे. अनेक लोकांनी पुढे येत इंडस्ट्रीमधील मोठमोठ्या लोकांवर आरोप केले आहेत. आता ते खरे की खोटा हा वादाचा मुद्दा आहे. (Ankahi Baatein)
अशा घटनांच्या विरोधात मनोरंजनविश्वात ‘मीटू‘ (#MeToo) ही मोहीम सुरु झाली. या मोहिमेअंतर्गत अनेक अभिनेत्रींनी समोर येते सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकार, दिग्दर्शक, निर्माते आदी अनेक मोठ्या लोकांवर लैंगिक शोषणाचे आरोप केले. ज्यांच्यावर आरोप झाले, त्यांच्यापैकी एक नाव म्हणजे दिग्दर्शक साजिद खान.( Sajid Khan)
अनेक मोठ्या गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन केलेल्या साजिदवर २०१८ मध्ये ‘हाउसफुल ४’चे शूटिंग करताना अनेक महिलांनी #MeToo मोहिमेंतर्गत लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. या आरोपांमुळे मनोरंजनविश्वात एकच खळबळ उडाली. या आरोपांमुळे साजिदचे जीवन पूर्णपणे बदलून गेले आहे. नुकतेच साजिदने एका मुलाखतीमध्ये तब्बल सहा वर्षे नंतर यावर भाष्य केले आहे. (Sajid Khan reacts on #metoo Allegations)
‘मी टू’ मोहिमेअंतर्गत साजिद खानविरोधात झालेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर त्याचे जीवन तर बदलले आणि त्याच्या करियरवर देखील मोठा परिणाम झाला. जेव्हा हे आरोप झाले तेव्हा तो ‘हाऊसफुल 4’ या चित्रपटाचे शूटिंग करत होता. एका रात्रीत त्याला प्रोजेक्ट्समधून काढून टाकण्यात आले होते.
या सर्व आरोपांवर तब्बल सहा वर्षे मौन बाळगल्यानंतर अखेर साजिद खान आता व्यक्त झाला आहे. त्याने ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत एका मुलाखतीमध्ये मागील काही वर्षांत त्याच्या आयुष्यात काय कसे बदल झाले. यावर मनमोकळेपणे भाष्य केले आहे.
साजिदने सांगितले की, मागील सहा वर्षांचा काळ हा त्याच्यासाठी सर्वच बाजूने मानसिक, भावनिक, शारीरिकदृष्ट्या खूप कठीण होता. तो पुढे म्हणाला, “अनेक वेळा मला वाटायचे की मी हे सर्व सोडून दूर कुठे तरी निघून जावे. लोकांच्या टीकेमुळे आणि त्यांच्या नजरांमुळे मी खूप एकटा आणि निराश झालो होतो.
इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशन (IFTDA) कडून क्लीन चिट मिळाल्यानंतरही, मला या इंडस्ट्रीमध्ये पुन्हा येणे आणि माझे स्थान मिळवणे किंवा तयार करणे अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक झाले. त्याला लोकांच्या टीकेचा सामना करत पुन्हा उभे राहायला खूप वेळ लागत आहे.”
साजिद खानने या सहा वर्षांच्या संघर्षाच्या काळावर बोलताना सांगितले, “या काळात मला मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. मला माझे घर विकून भाड्याच्या घरात राहावे लागले. मी वयाच्या १४ व्या वर्षापासून कुटुंबासाठी कमावत आलो आहे. वडिलांच्या निधनानंतर, माझ्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट आले. ते जाताना माझ्यावर आणि फराहवर कर्जाचा मोठा डोंगर ठेऊन गेले. (Entertainment mix masala)
आज मी माझ्या पायांवर पुन्हा उभा असल्याचे पहायला माझी आई जिवंत हवी होती. माझं आयुष्य खूप कठीण होते. गेल्या सहा वर्षांत मी अनेकदा माझे आयुष्य संपवण्याचा विचार केला. हा काळ माझ्यासाठी अत्यंत वाईट होता.”
साजिद खानने ‘हाऊसफुल 4’ (Houseful 4) सिनेमा का सोडला? यावर तो म्हणाला, “मी ‘हाऊसफुल 4’ हा प्रोजेक्टच सोडला. निर्माते साजिद नाडियादवाला यांनी १०-१५ कलाकारांसाठी मोठा सेट बनवला होता. त्यांच्या तारखा बदलाव्या लागल्या असत्या आणि हा चित्रपट बनायला वर्षे लागली असती. माझ्यासोबत मीडियाचा पूर्णपणे एकाच बाजूने ट्रायल (Media Trial) झाला होता. (Bollywood Masala)
मी माझ्या आक्षेपार्ह अश्लील विनोदासाठी ओळखला जायचो. पण मी कधीच कोणत्या महिलेचा अपमान केला नव्हता आणि करणारही नाही. माझ्या आईने मला नेहमीच स्त्री-पुरुष समानता शिकवली. मला कधीच वाटले नाही की मला माझ्या शब्दांची किंमत इतकी मोठ्या न केलेल्या गोष्टीसाठी चुकवावी लागेल.”
जेव्हा ‘मी टू’चे आरोप साजिदवर झाले तेव्हा त्याच्या कुटुंबाची कशी प्रतिक्रिया होती यावर तो म्हणाला, “हे सर्व होण्याच्या दहा दिवस आधी मी राजस्थानमधील जैसलमेरमध्ये शूटिंग करत होतो. जेव्हा हे सर्व सुरु झाले तेव्हा माझ्या आईची तब्येत ठीक नव्हती. मी चित्रपट सोडल्याचे कळताच तिला हार्ट अटॅक येईल की काय, अशी मला भीती वाटत होती.
मी माझ्या बहिणीला फराहला सांगितले की आईपासून सर्व वर्तमानपत्रे लपवून ठेव. दहा दिवसांपर्यंत मी असेच दाखवत होतो की सर्वकाही ठीक आहे. रोज सेटवर जाण्यासाठी घराबाहेर पडत होतो, त्याच वेळी घरी खूप फोन देखील येत होते.
=============
हे देखील वाचा : Amit Kumar : ‘ही’ गाणी अमित कुमारकडून कुमार सानूकडे कशी गेली?
=============
‘मी टू’ मोहिमेत आतापर्यंत ज्यांची नावे समोर आली होती, ते सर्वजण काही काळाने कामावर परतले, पण मला कामच मिळत नव्हते. याचेच मला खूप वाईट वाटत होते. मला फक्त माझं आयुष्य बदलण्याची नाही तर लोकांशी कसे बोलायचे, तेही बदलण्याची गरज असल्याचे वाटले. मी आता स्वत:ला खूप मर्यादित केले आहे. मी सहा वर्ष यावर बोलो नाही कारण मला बोलायचे नव्हते. माझी आई म्हणायची की, मौन हे सोन्यासारखं असते आणि समज ही धुक्यासारखी असते, ती साफ करावी लागते.”
दरम्यान २००६ मध्ये ‘डरना जरूरी है’ या चित्रपटातून साजिदने दिग्दर्शनात पदार्पण केले. त्यानंतर त्याने ‘हे बेबी’ (2007), ‘हाऊसफुल’ (2010), ‘हाऊसफुल 2’ (2012), ‘हिम्मतवाला’ (2013) आणि ‘हमशकल्स’ (2014) आदी अनेक लोकप्रिय, प्रसिद्ध कॉमेडी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. मागच्या वर्षी तो बिग बॉसमध्ये देखील झळकला होता.