Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ramayana Movie : बॉलिवूडचा ८३५ कोटींचा पहिला बिग बजेट Mythological

Housefull 5 : अक्षय कुमारचा चित्रपट फ्लॉप की हिट?; काय

Vidyadhar Joshi यांचं रंगभूमीवर दमदार पुनरागमन; ‘सुंदर मी होणार’ मधून

Samsaara Movie Trailer: समसारा ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; रहस्य, भय

चक्र: Smita Patil यांची एक अद्वितीय कलाकृती!

Shraddha Kapoor : ‘छावा’च्या दिग्दर्शकासोबत श्रद्धाची हातमिळवणी; साकारणार मराठमोळी भूमिका?

Bahubali : भारताचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट थिएटरमध्ये नव्या ट्विस्टसह

पहिला क्रमांक पांडू हवालदार, दुसरा क्रमांक Samana; रंगली फारच चर्चा!

Madhubala मुंबईच्या  मुसळधार पावसात ४ कि.मी चालत कोणत्या स्टुडीओत गेली

Kishori Shahane यांना बुरखा का घालावा लागला होता?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Sayaji Shinde हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टी गाजवणारे मराठमोळे नाव सयाजी शिंदे

 Sayaji Shinde हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टी गाजवणारे मराठमोळे नाव सयाजी शिंदे
कलाकृती विशेष

Sayaji Shinde हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टी गाजवणारे मराठमोळे नाव सयाजी शिंदे

by Jyotsna Kulkarni 13/01/2025

आपल्या मराठी मनोरंजनविश्वात असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी मराठीसोबतच हिंदीमध्ये देखील आपल्या कामाचा आणि प्रतिभेचा डंका वाजवला आहे. कधी कधी तर आपल्याला देखील आपले मराठी कलाकार हिंदी वाटायला लागतात इतके ते आपल्या कामात समरस होतात. (Marathi Actor)

मात्र तुम्हाला माहित आहे का? की असे खूप कमी कलाकार आहेत ज्यांनी मराठी, हिंदीसोबतच दाक्षिणात्य सिनेविश्वात देखील आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. यातलेच एक मोठे उदाहरण म्हणजे दिग्गज अभिनेते सयाजी शिंदे. मराठीमध्ये बहुतकरून नकारात्मक भूमिका साकारलेल्या सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांनी हिंदीसोबतच साऊथ इंडस्ट्रीमध्ये देखील मोठे नाव कमावले आहेत. (Sayaji Shinde)

अनेकांना तर आता सयाजी शिंदे हे मराठी नाही तर साऊथचेच असल्याचे वाटते. हिंदीपेक्षा देखील जास्त काम सयाजी यांनी दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये केले आहे, किंबहुना अजूनही करत आहे. आज याच सयाजी शिंदे यांचा ६६ वा वाढदिवस आहे. सयाजी शिंदे हे मनोरंजनविश्वासोबतच राजकारणामध्ये देखील सक्रिय आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला आहे. आज आपण सयाजी शिंदे यांचबद्दल काही रंजक गोष्टी जाणून घेऊया. (Sayaji Shinde Birthday)

Sayaji Shinde

सयाजी शिंदे यांचा जन्म १३ जानेवारी १९५९ रोजी सातारा (Satara) जिल्ह्यातील वेळे-कामती नावाच्या छोट्याशा गावात शेतकरी कुटुंबात झाला आहे. सयाजी शिंदे यांचे बालपण खूपच हलाखीचे होते. घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे सयाजी यांनी त्यांचे गाव सोडून सातारा शहरात राहायचे ठरवले. इथेच त्यांनी मराठी भाषेत पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. (Entertainment Masala)

आपला खर्च भागवण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागामध्ये (Irrigation Department) ‘नाईट वॉचमन’ची नोकरी देखील त्यांनी केली. तेव्हा सयाजी शिंदे यांचा १६५ रुपये महिन्याला पगार होता. याच काळात सयाजी शिंदें यांची साताऱ्यातील सुनील कुलकर्णी (Sunil Kulkarni) या रंगकर्मीशी भेट झाली आणि सयाजी हे अभिनयाच्या जगात पोहचले. इथेच त्यांना अभिनयाबद्दल प्रेम निर्माण झाले.

सयाजी शिंदे यांनी अनेक नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी अनेक नाटकांमध्ये काम केले. १९८७ मध्ये ‘झुल्वा’ नावाच्या मराठी नाटकातील त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. सयाजी शिंदे यांनी नाटकांमधून भूमिका करायला सुरूवात केली. त्यांची भूमिका असलेले नाटकं गाजत देखील होती. मात्र अभिनयात अधिक काम करण्यासाठी त्यांना साताऱ्यामध्ये राहून चालणार नव्हते. (Ankahi Baatein)

Sayaji Shinde

सयाजी शिंदे यांनी त्यांच्यात असणाऱ्या अभिनयगुणांना अधिकाधिक वाव मिळावा, या हेतूने मुंबई गाठली. मुंबईत येणे हे सयाजी यांच्यासाठी सोपे नव्हते. मोठ्या संघर्षाने त्यांनी मुंबई गाठली. इथे आल्यावर त्यांनी अनेक वर्कशॉप करत अभिनयाचे शिक्षण घेत बारकावे जाणून घेतले. थिएटर करत असतानाच त्यांना त्यांचा ‘अबोली‘ हा पहिला चित्रपट मिळाला. अबोलीमधील त्यांची भूमिका प्रचंड गाजली. या सिनेमासाठी त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले.

पुढे सयाजी शिंदे यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यांनी एकापाठोपाठ एक अनेक प्रोजेक्ट्स मध्ये काम केले. मराठी नाटकं, चित्रपट करण्यात ते व्यस्त होते. दुसरीकडे राम गोपाळ वर्मा (Ram Gopal Varma) हे त्यांच्या ‘शूल’ (Shool) या सिनेमासाठी कास्टिंग करत होते. या चित्रपटाचा मुख्य अभिनेता होता मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee). मात्र सिनेमातील ‘बच्चू यादव‘ या महत्वाच्या भूमिकेसाठी त्यांना अभिनेताच मिळत नव्हता. (Bollywood Tadka)

Sayaji Shinde

असेच एकदा मनोज बाजपेयी प्रवास करताना त्यांचे लक्ष एका नाटकाच्या पोस्टरकडे गेले. त्यांनी जवळ जाऊन पाहिल्यावर त्यांना सयाजी शिंदे यांना पाहून बच्चू यादव आठवला. लगेच त्यांनी त्यांची माहिती काढली आणि सयाजी यांना राम गोपाळ वर्मा यांच्या ऑफिसमध्ये बोलवले. (Bollywood Masala)

सयाजी शिंदे यांची एन्ट्री पाहूनच राम गोपाळ वर्मा यांनी ‘बच्चू यादव’ मिळाला असे म्हटले. या सिनेमातून सयाजी यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर पुढे त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. यानंतर त्यांनी कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलुगू आदी साऊथ भाषांतील चित्रपटांमध्येही दमदार अभिनय केला.

====================================

हे देखील वाचा: Fussclass Dabhade Teaser: ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज…

====================================

सयाजी यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये मोठा नावलौकिक कमावला. आजही ते अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. त्यांनी अनेक मोठमोठे पुरस्कार आपल्या नावावर केले आहेत. सयाजी शिंदे यांनी अभिनयासोबतच सामाजिक कार्यामध्ये देखील आपले योगदान दिले आहे. पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी आणि वृक्षतोड थांबवण्यासाठी त्यांनी ‘सयाजी उद्यान’ या उपक्रमातून राज्यभरात वृक्षरोपण मोहिम राबवत आहेत. सयाजी शिंदे यांनी अलिकडेच सह्याद्री देवराई हा नवा उपक्रम सुरू केला आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor actress Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity News Entertainment Featured hindi actor Marathi Actor marathi actor in south Marathi Movie saouth actor sayaji shinde Sayaji Shinde Birthday Sayaji Shinde information Sayaji Shinde journey Sayaji Shinde movie shool actor Sayaji Shinde सयाजी शिंदे सयाजी शिंदे प्रवास सयाजी शिंदे माहिती सयाजी शिंदे वाढदिवस सयाजी शिंदे सामाजिक काम
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.